मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ३३

संकेत कोश - संख्या ३३

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


तेहतीस गुण मंत्र्यास आवश्यक - १ नियंत्रणप्रियता , २ तद्देशीय जन्म , ३ कुलीन , ४ सुशील , ५ सैनिकवृत्तीचा , ६ वाक्‌‍कुशल , ७ निर्मय , ८ शास्त्रज्ञ , ९ उत्साही , १० प्रत्युत्प्न्नमति ( हजर जबाबी ), ११ निरभिमानी , १२ चंचल नसणारा , १३ मैत्रीवर्धक , १४ कष्टसहिष्णु , १५ शुचिअलोभी , १६ सत्यनिष्ठ , १७ नीतिमार्गानुसारी , १८ धीर १९ सुस्थिर , २० प्रतापी , २१ नीरोगी , २२ शिज्पज्ञ , २३ निरलस , २४ बुद्धिमान् ‌ , २५ धारणावान् ‌‍ , २६ निष्ठावंत , २७ विरोध नष्ट करणारा , २८ स्मरणशक्ति तीव्र , २९ राज्यव्यवहारांत तत्पर , ३० त्वरित निर्णय क्षमता , ३१ विचारशील , ३२ अचुक परीक्षा आणि ३३ कार्याचा उरक व रहस्य गुप्ततेविषयीं दक्ष , ( कामन्दकीय नीतिसार )

तेहतीस देव अथवा तेहतीस देवता - ८ वसु , ११ रुद्र , १२ आदित्य , १ इंद्र आणि १ प्रजापति मिळून तेहतीस देवता होत

( शतपथ ). याच एक एका देवतेची एक एक कोटिरूप समुदाय अशी गणना करून पौराणिकांनीं तेहतीस कोटि देवता मानल्या आहेत . ( तत्त्व - निज - विवेक ). वस्तुतः तेहतीसच देव आहेत . या तेहतीसपैकीं स्वर्गांत ११ , पृथ्वीवर ११ , व अन्तरिक्षांत ११ मिळून ३३ असें वर्णन ऋग्वेदांत आढळतें . ( ऋग्वेद १ - १३ - ११ ) ( प्राचीन भारतीय संस्कृति )

तेहतीस वीर्ये - १ ओज , २ तेज , ३ वल , ४ वाणी , ५ सत्ता , ६ श्री , ७ धर्म , ८ ब्रह्मतेज , ९ क्षात्रतेज , १० राष्ट्र , ११ वणिक ‌ वृत्ति , १२ कांति , १३ यश , १४ तपोबल , १५ संपत्ति , १६ आयु , १७ रूप , १८ व्यक्तिमत्त्व , १९ कीर्ति , ५० प्राण २१ अपान , २२ चक्षु , २५ श्रोत्र , २४ दूध , २५ रस , २६ अन्न , २७ अन्नद्यं ( जठराग्नि प्रदीप्त ), २८ ऋतु ( प्रामाणिकपणा ), २९ सत्यु , ३० व्यक्तिगत नित्यकर्में , ३१ सामाजिक कर्तव्यें - विहीर धर्मशाळा वगैरे बांधणें , ३२ प्रजा आणि ३३ पशु . हीं तेहतीस वीर्यें अथवा गुण राष्ट्रीय संपन्नतेस आवश्यक . ( अथर्व वेद १२ - ६७ ) ( भारतीय मानसशास्त्र ).

तेहतीस व्यभिचारी भाव - १ शारीरिक अवस्थांशीं समांतर चौदा - १ मरण , २ व्याधि , ३ ग्ल्नि , ४ श्रम , ५ आलस्य , ६ निद्रा , ७ स्वप्न , ८ सुप्त , ९ अपस्मार , १० उन्माद , ११ मद , १२ मोह , १३ जडता , १४ चपलता ; ज्ञानात्मक मनोवस्थांशीं समांतर तीन - १५ स्मृति , १६ मति , १७ विमर्श ; भावनात्मक मनोवस्थांशीं समांतर सोळा - १८ हर्ष , १९ अमर्ष , २० धृति , २१ उग्रता , २२ आवेग , २२ विषाद , २४ निर्वेद , २५ औत्सुक्य , २६ चिंता , २७ शंका , २८ असूया , २९ त्रास , ३० गर्व , ३१ दैन्य , ३२ अवहित्थ व ३३ क्रीडा . असे एकूण तेहतीस व्यभिचारी अथवा संचारी भाव साहित्यशास्त्रांत मानले आहेत . ( भरतनाटय ६ , १८ ते २१ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP