मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ११

संकेत कोश - संख्या ११

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


अकरा अंगें उपासनेचीं - १ श्रवण , २ कीर्तन , ३ नामस्मरण , ४ सेवा , ५ अर्चन , ६ वंदन , ७ दास्य , ८ सख्य , ९ आत्मनिवेदन , १० प्रेमभक्ति व ११ पराभक्ति .

अकरा अर्थ उपनिषत् ‌ शब्दाचे - १ आत्मबल , २ उत्थान , ३ ब्रह्मचर्य , ४ गुरुसेवेंत देह झिजविणें , ५ गुरु ( ह्रदय ) सांनिध्य , ६ जीवन - निरीक्षा , ७ श्रवण , ८ मनन , ९ अवबोधन , १० आचरण व ११ अनुभूति . ( ईशावास्य वृत्ति )

अकरा अक्षौहिणी सैन्याचे अकरा सेनापति ( कौरव पक्षीय )- १ कृपाचार्य , २ द्रोणाचार्य , ३ शल्य , ४ जयद्र्थ , ५ सुदक्षिण , ६ काम्बोज , ७ कृतवर्मा , ८ अश्वत्थामा , ९ भूरिश्रवा , १० शकुनि व ११ बाल्हिक . ( म . भा . उद्योग १५५ - ३२ ) भीष्माचार्य सर सेनापति होते आणि कर्णानें भीष्म असेपर्यंत मी लढणार नाहीं असेंज ठरविलें होतें .

अकरा आनंद - १ मानुष आनंद , २ मानुष्य - गंधर्वांचा आनंद , ३ देव - गंधर्वांचा आनंद , ४ पितृ लोकांचा आनंदा , ५ आजान - ज नामक देवांचा आनंद , ६ कर्म - देवांचा आनंद , ७ देवांचा आनंद , ८ इंद्राचा आनंद , ९ बृहस्पतीचा आनंद , १० प्रजापतीचा आनंद आणि ११ ब्रह्मानंद , ( तैत्तिरीय उपनिषद् ‌‍ आनंदवल्ली )

अकरा इंद्रियें - १ पंचकर्मेंद्रियें , ५ ज्ञानेंद्रियें व १ मन , हीं मिळून अकरा . " इंद्रियाणि दशैकं च " ( भ . गी . १३ - ५ )

अकरा करण - तिथीच्या अर्धास करण म्हणतात . १ बव , २ बालव , ३ कौलव , ४ तैतिल , ५ गर , ६ वणिज , ७ भद्रा , हे सात करण चल आणि ८ शकुनि , ९ चतुष्पाद , १० नाग व ११ किंस्तुघ्न हे चार करण स्थिर , असे मिळून अकरा करण आहेत . ( ज्योतिष )

अकरा कला ( अग्नीच्या )- १ दीपिका , २ रजिका , ३ ज्यालिनी , ४ विस्फुलिंगिनी , ५ प्रचंडा , ६ पाचिका , ७ रौद्री , ८ दाहिका , ९ रागिणी , १० शिखावती आणि ११ ज्वाला , या अग्नीच्या अकरा कला असून ज्योति ही स्वःची बारावी कला होय . ( दर्शन - संग्रह )

अकरा कौरवपक्षीय रथी - १ दुर्योधन , २ दुःशासन , ३ दुःसह , ४ दुर्मर्षण , ५ विकर्ण , ६ चित्रसेन , ७ विविंशति , ८ जय , ९ सत्यव्रत , १० पुरुमित्र व ११ युयुत्सु , ( म . भा . आदि ६३ - १२० )

अकरा गंधर्व गण - १ स्वात , २ भ्राज , ३ अंधारी , ४ बंभारी , ५ हस्त , ६ सुहस्त , ७ कृशानु , ८ विश्वावसु , ९ मूर्धन्वान् ‌, १० सूर्यवची व ११ कृति ( म . ज्ञा . कोअ वि . २ )

अकरा गुण दूताचे अंगीं असावेत - १ पटुता , २ धाष्टर्य , ३ इंगिताकारज्ञता , ४ अनाकुलत्व , ५ परमर्मज्ञता , ६ प्रमाणता , ७ प्रतारण , ८ देशज्ञान , ९ कालज्ञान , १० विषह्म ( सहन करण्याजोगा ) बुद्धित्व , आणि ११ लघुप्रतिपत्तिसोपाया ( वात्सायन - कामसूत्रें अधि . १ )

अकरा गुण महंतास आवश्यक ( समर्थ सांप्रदाय )- १ परिभ्रमण , २ चाळणा , ३ विवेक , ४ कष्ट , ५ मरणाविषयीं वेफिकीरपणा , ६ कीतींची चाड ७ निस्पृहता , ८ मृदुवचन , ९ क्षमा शांति सहिष्णुता १० परोपकार आणि ११ उत्कटता .

ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुद्धिवंत ॥ ( दा . बो . ११ - ६ - ७ )

अकरा गोष्टी अनन्य ईश प्रार्थनेनें साध्य - १ श्रद्धा , २ मेघा , ३ यश , ४ प्रज्ञा , ५ विद्या , ६ बुद्धि , ७ . श्री , ८ बल , ९ आयुष्य , १० तेज व ११ आरोग्य ( प्रार्थना मंत्र )

अकरा चर्म वाधें - १ मृदंग , २ तबला , ३ डफ , ४ समेळ , ५ खंजीर ६ नौबत , ७ तास , ८ मर्फा , ९ चौघडा , १० डंका व ११ ढोल .

अकरा पांडवांचे प्रमुख साहाय्यकर्ते - १ सात्यकि , २ धृष्टकेतु , ३ जयत्सेन , ४ पाण्डय , ५ द्रुपद , ६ विराट् ‌ , ७ श्रीकृष्ण , ८ चेकितान , ९ केकेय , १० काशीपति आणि ११ घटोत्कच . ( म . भा . सभापर्व )

अकरा पूजास्थानें - १ सूर्य , २ अग्नि , ३ ब्राह्मण , ४ गाय , ५ वैष्णव , ६ आकाश , ७ वायुअ , ८ जल , ९ भूमि , १० आत्मा व ११ सर्व प्राणिमात्र , हीं परमेश्वरपूजेचीं अकरा पूजास्थानें होत . ( भागवत स्कंध ११ - ११ - ४२ )

इयें अकराहीं अधिष्ठानें । मत्प्राप्तिकर अतिपावनें ।

म्यां सांगितलीं अनुसंधानें । पूजा करणें यथाविधी ॥ ( ए . भा . ११ - १४ ५५ )

अकरा प्रकार भक्तीचे - १ गुणमाहात्म्यासक्ति , २ रूपासक्ति , ३ पूजासक्ति , ४ स्मरणासक्ति , ५ दासासक्ति , ६ सख्यासक्ति , ७ कांतासक्ति , ८ वात्सल्यासक्ति , ९ आत्मनिवेदनासक्ति , १० तन्मयासक्ति आणि ११ परमविरहासक्तित . ( नारदभक्ति सूत्रें ८२ )

अकरा प्रमुख कुलें सपुष्ष वनस्पतीचीं - १ ज्वारीकुल , २ तूरकुल , ३ कोबीकुल , ४ वांगीकुल , ५ हळदकुल , ६ कर्दळकुल , ७ लिंबुकुल , ८ कापूसकुल , ९ तुळसीकुल , १० कारळाकुल आणि ११ मिरिकुल , ( आमची शेती )

अकरा मागण्या ( अग्निदेवतेजवळ मागावयाच्या )- १ श्रद्धा , २ मेधा , ३ यश , ४ प्रज्ञा , ५ विद्या , ६ बुद्धि , ७ श्री , ८ बल , ९ आयुष्य , १० तेज आणि ११ आरोग्य . ( वैश्वदेव मंत्र )

अकरा मारुती ( समर्थस्थापित कालानुक्तमें )- १ शहापूर , २ मसूर , ३ व ४ चाफळ येथें , ५ शिंगणावाडी , ६ माजगांव , ७ जंब्रज , ८ बत्तीस शिराळें , ९ पारगांव , १० मनपाडळें व ११ बाहेबोरगांव . हीं अकरा समर्थस्थापित मारुतिस्थानें सातारा जिल्ह्मांत आहेत .

( दासायन )

अकरारुद्र - शरीरांत असणारीं १० इंद्रियें , व ११ वा आत्मा मिळून अकरारुद्र . ( योगी - याज्ञवल्क्य )

अकरा वानर सेनापति - १ गज , २ गवाक्ष , ३ गवय , ४ शरम , ५ गंधमादन , ६ मैंद , ७ द्विविद , ८ सुषेण , ९ जांबुवंत , १० नळ व ११ सुनीळ . सुग्रीवाच्या वानर - सैन्यांत हे अकरा प्रमुख सेनापति होते . ( भा . रा . किष्किंधा . ).

अकरा विद्या ( भगवान् ‌ शंकरापासून आविर्भूत )- १ व्याकरण , २ गांधर्ववेद , ३ सामुद्रिक , ४ वैद्यक , ५ अस्त्र - विद्या , ६ योगशास्त्र , ७ भक्तिशास्त्र , ८ रुद्रयामल आदि तंत्रशास्त्र , ९ सावर आदि मंत्रशास्त्र , १० स्वरोदय आणि ११ सर्व प्रकारच्या कथा , ( कल्याण शिवांक )

अकरा शुद्ध आहार - १ मैक्ष्य , २ यवागू ( भाताची पेज ), ३ ताक , ४ दूध , ५ सातूचा पदार्थ , ६ फल , ७ मूल , ८ राळे , ९ कण , १० पेंड व ११ सातु , हे अकरा आहार योग्यांना सिद्धि देणारे आहेत . ( मार्केडेय , ३८ - ११ ).

अकरा स्त्री - पुरुष स्वभाव अथवा गुणवैशिष्टयें - स्त्री - १ सौंदर्य , २ कोमलता , ३ धर्मनिष्ठा , ४ साहस , ५ कलनिपुणता , ६ सहनशीलता , ७ लज्जाशीलता , ८ तेजस्विता , ९ चातुर्थ , १० वत्सलता व ११ त्यागवृत्ति , पुरुष - १ मामर्थ्य , २ सुद्दढता , ३ तर्कनिष्ठा , ४ घैर्य , ५ कल्पकता , ६ काटकपणा , ७ उच्छृंखलपणा , ८ मानीपणा , ९ बुद्धिमत्त , १० न्यायनिष्टुरता व ११ उपभोगवृत्ति , ( गृहसौख्य )

अकरा सर्वप्रसिद्ध पतिव्रता - १ सुवर्चला , २ शची , ३ अरुंधती , ४ रोहिणी , ५ लोपामुद्रा , ६ सुकन्या , ७ सावित्री , ८ श्रीमती , ९ मदयंती , १० केशिनी व ११ दमयंती . ( वा . रा . ५ - २४ - १२ ).

अकरा स्थानें व त्यांचे मंत्री ( मानव शरीराचे )- १ मेंदू - पंत - प्रधान , २ लहानमेंदू - उपपंतप्रधान , ३ कान - नमोवाणीमंत्री , ४ त्वचा - संरक्षणमंत्री , ५ पाय - दळणवळणमंत्री , ६ पोट - अन्नमंत्री , ७ मस्तक - जंगलमंत्री , ८ बुद्धि - शिक्षणमंत्री , ९ ह्रदय - अर्थमंत्री , १० नाक - आरोग्यमंत्री , आणि ११ फुप्फुस - गृहमंत्री . ( नवशक्ति दि . २८ - ७ - ६१ )

अकरा ज्ञान साधनें - १ विवेक , २ वैराग्य , ३ षट्‌‍संपत्ति , ४ मुमुक्षता , ५ गुरुसंपत्ति , ६ श्रवण , ७ तत्त्वज्ञानाभ्यास , ८ मनन , ९ निदिध्यास , १० मनोनाश व ११ वासनाक्षय . ( तत्त्व - निज - विवेक )

अकराजण गुरूप्रमाणें होत - १ उपाध्याय , २ पिता , ३ माता , ४ ज्येष्ठबंधु , ५ राजा अथवा शासनाधिकारी , ६ मामा , ७ सासरा , ८ मातेचे वडील , ९ पित्याचे वडील , १० ब्राह्मण व ११ चुलता . " वर्णज्येष्ठः पितृव्यश्च सर्वे ते गुरवः स्मृताः " ( कूर्म पुराण )

अकराजण ब्रह्मसूत्रावरील भाष्यकार - १ श्रीमदाद्यशंकराचार्य , २ यादव प्रकाशाचार्य , ३ भास्कराचार्य , ४ विज्ञानमिक्षु , ५ रामानुजाचार्य , ६ ६ नीलकंठाचार्य , ७ श्रीपति आचार्य , ८ निंवार्काचार्य , ९ श्रीमध्वाचार्य , १० बल्लमाचार्य आणि ११ बलदेवाचार्य ( पुरुषार्थ सप्टेंबर १९६० )

एकादशाक्षरी मंत्र - जय जय रघुवीर समर्थ ( रामदासी सांप्रदाय )

एकादश गति ( संगीत )- १ भानवी , २ मीनवी , ३ गजगति , ४ तुरंगिणी , ५ हंसिनी , ६ हरिणी , ७ खंजनी , ८ लावकी , ९ मयूरगति , १० तित्तिरीगति आणि ११ कुक्कटी . ( संगीत मकरंद नृत्त्याध्याय )

एकादश गीता रामचरित मानसांतर्गत - १ श्रीशिवगीता , २ लक्ष्मणगीता , ३ पतिव्रतागीता , ४ रामगीता , ५ शबरीगीता , ६ सुग्रीवगीता , ७ बिभीषणगीता , ८ धर्मगीता , ९ श्रीराम - भक्तिगीता , १० श्रीभुशुडीगीता व ११ सप्तप्रश्नगीता . ( गूढार्थमंद्रिका )

एकादश गंधर्व गण - १ स्वान , २ भ्राज , ३ अंधारी , ४ बंभारी , ५ हस्त , ६ सुहस्त , ७ कृशानु , ८ विश्वावसु , ९ मूर्धन्वान् ‌ , १० सूर्यवर्चा व ११ कृति . ( ऋग्वेदाचे - म . भाषांतर )

एकादश द्वारें ( शरीर संज्ञक नगरीचीं )- १ मुख , २ - ३ नासिकेचीं , ४ - ५ दोन डोळे . ६ - ७ दोन कान , ८ नाभि , ९ शिश्न , १० गुद व ११ मस्तकाच्या ठिकाणीं असलेलें ब्रह्मारंध्र . " पुरमेकादशद्वारमजस्यावक्रचेतसः " ॥ ( काठकोपनिषद् ‌‍ २ - ५ - १ )

एकादश रुद्र - अकरा रुद्रांचीं नांवें निरनिराळ्या पुराणांत निरनिराळीं आढळतात . त्यांत एकवाक्यता नाहीं , सामान्यतः ( अ ) १ वीरभद्र , २ शंभु , ३ गिरीश , ४ अजैकपाद , ५ अहिर्बुध्न्य , ६ पिनाकी , ७ अपराजित , ८ भुवनाधीश्वर , ९ कपाली , १० स्थाणु व ११ भव ;

( आ ) १ मन्यु , २ मनु , ३ महिनस् ‌‍, ४ महान् ‌‍ , ५ शिव , ६ ऋतुध्वज , ७ उग्ररेता , ८ भव , ९ काल , १० वामदेव व ११ धृतव्रत . ( भागवत स्कंध ३ - १२ - १२ ); ( इ ) ( कलियुगांतलीं नांवें ) १ भूतेश , २ नीलरुद्र , ३ कपाली , ४ वृजवाहन , ५ त्र्यंबक , ६ महाकाल , ७ भैरव , ८ मृत्युंजय , ९ कामेश , १० योगेश आणि ११ शंकर .

एकादश रुद्राणी - १ धृ , २ वृत्ति , ३ उशना , ४ उमा , ५ नित्युत्सर्पि , ६ इला , ७ अंबिका , ८ इरावती , ९ सुधा , १० दीक्षा व ११ रुद्राणी . हीं अकरा रुद्रदेवतेच्या स्त्रियांचीं नांवें . ( भा . स्कंध ३ - १२ - १३ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP