मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ६

संकेत कोश - संख्या ६

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


षट्‌‍‍कर्में ( उपजीविकेचीं )- १ असि , २ मसि , ३ कृषि , ४ वाणिज्य ’ ५ शिष्य आणि ६ पशुपालन . ( जैनधर्मादर्श )

षट्‌‍कर्में ( गृहिणीचीं )- १ देवपूजन , २ अतिथिपूजन ( आल्यागेल्यांचा समाचार ), ३ तुलसीपूजन , ४ गोग्रास देणें , ५ अर्ध्यदान देणें , आणि ६ दीपदान .

देव - अतिथि - तुलसी पूजां गौओंके हितग्रासप्रधान ।

अर्ध्यदान और दीपदान ये गृहिणीके षट्‌‍कर्म प्रधान ॥

षट्‌‍कर्में ( नित्याचीं )- १ स्नान , २ संध्योपासना , तथा जप , ३ दान , ४ देवपूजा , ५ अतिथिसत्कार आणि ६ वैश्वदेव .

संध्यास्नानं जपो होमः देवतानां च पूजनम् ‌‍ ।

आतिथ्यं वैश्वदेवं च षट्‌‍कर्माणि दिनेदिने ॥ ( प . स्मृति १ - ३९ )

षट्‌कर्में ( ब्राह्मणाचीं )- १ अध्ययन , २ अध्यापन , ३ यजन , ४ याजन , ५ दान आणि ६ परिग्रह . ( मनु . १० - ७५ )

षट्‌‍कर्में ( मंत्रतंत्र विद्येंतील )- १ जारण , २ मारण , ३ उच्चाटन , ४ मोहन , ५ स्तंमन , व ६ विध्वंसन .

षट्‌‍कर्में ( वैश्याचीं )- १ पशूंचें रक्षण , २ दान , ३ यज्ञ , ४ अध्ययन , ५ व्यापार आणि ६ व्याजबट्टा व शेती . ( मनु , १ - ९० )

षट्‌‍कर्में ( जैनधर्म )- १ देवपूजा , २ गुरुउपासना , ३ स्वाध्याय , ४ संयम , ५ तप आणि ६ दान .

षट् ‌‍ कर्में ( संन्यास मार्गाचीं )- १ मिक्षाटन , २ जप , ३ शौच , ४ स्नान , ५ ध्यान आणि ६ देवतार्चन .

षट्‌‍कर्में ( हठयोग )- १ धौति , २ बस्ति , ३ नेति , ४ नौलि , ५ कपालमाति आंणि ६ त्राटक . ( ह . प्र . )

षट्‌‍कोष - १ त्वचा , २ रुधिर , ३ मांस , ४ मज्जा , ५ अस्थि आणि ६ मेद .

षट्‌‍चक्रें ( शरीरांतील ) व त्यांचीं स्थानें - ( अ )

१ मूलाधार चक्र अथवा पृथ्वीचक - गुदद्वार व वृषण यांच्या मध्यावर .

२ स्वाधिष्ठानचक्र अथवा आपचक्र - जननेंद्रियांच्यावर व बेंबीच्या खालीं .

३ मणिपूरचक्र अथवा अग्निचक्र - नाभिस्थान .

४ अनाहतचक्र अथवा वायुचक्र - ह्रदयस्थान .

५ विशुद्धिचक्र अथवा आकाशचक्र - कंठस्थान .

६ आज्ञाचक्र अथवा मनश्चक्र - भरुमध्यावर .

मानवदेहास आधारभूत अशीं हीं चक्रें सुषुम्नानामक नाडीवर असतात . ( शिवसंहिता ) या चक्रांना कमलें असेंहि म्हणतात . खेरीज अथर्व वेदांत आणखी दोन - ७ ललनाचक्र - जिव्हेच्या मुळाशीं . ८ सहस्त्रारचक्र - मस्तकांत , अशी आठ असल्याचें वर्णन आहे . ( अथर्व - अनु - मरठी ) ( आ ) १ त्रिकुट , २ श्रीहाट , ३ गोल्हाट , ४ औटपीठ , ५ अमरगुंफां व ६ ब्रह्मरंध्र . ( ज्ञानेश्वराचे अभंग )

षट्‌प्रज्ञ - १ धर्म , २ अर्थ , ३ काम , ४ मोक्ष , ५ व्यवहार व ६ तत्त्वज्ञान . हीं सहा जाणणारा .

षट्‌‍शक्ति - १ पराशक्ति , २ ज्ञानशक्ति , ३ इच्छाशक्ति , ४ क्रियाशक्ति , ५ कुंडलिनीशक्ति आणि ६ मातृकाशक्ति , या सहा शक्ति मानव शरिरांत आहेत ( कल्याण शक्ति अंक )

षट्‌‍शास्त्रें - १ धर्मशास्त्र , २ सांख्यशास्त्र , ३ वेदान्तशास्त्र , ४ न्यायशास्त्र , ५ कामशास्त्र , आणि ६ योगशास्त्र ( दर्शनप्रकाश ); १ कापालिक , २ लौकायतिक , ३ दिगंबर , ४ शून्यवादी , ५ निरीश्वरवादी आणि ६ चार्वाक . ( वाचस्पतिमिश्र )

षट्‌‍संपत्ति - १ शम - मनोनिग्रह , २ दम - इंद्रियनिग्रह , ३ तितिक्षा - शीतोष्णादिक द्वंद्वें सहन करणें , ४ उपरति - स्वधर्मानुष्ठान , ५ श्रद्धा आणि ६ समाधान . या अध्यात्मविषयांतील संपत्ति होत . ( कल्यान योगांक ). या सहा साधनांस शमादिषट्‌‍क म्हणतात .

षट्‌स्थल - १ भक्त , २ महेश , ३ प्रसादि , ४ प्राणलिंगी , ५ शरण ६ ऐक्य . सहा षट्‌‍स्थल किंवा मोक्षाच्या सहा पायर्‍या . ( वीरशैव प्र . )

षड्‌‍ऊर्मि - १ शोक , २ मोह , ३ जरा , ४ मृत्यु , ५ क्षुघा व ६ पिपासा . या सहा ऊर्मि म्हणजे संसाररूपी समुद्राच्या लहरी होत .

षडुष्ण - १ पिंपळीं , २ पिंपळमूळ , ३ चवक , ४ चित्रक , ५ सुंठ ६ मिरी . ( नूतनामृतसागर )

षड्‌‍ऋतु - १ वसंत - चैत्र , वैशाख ; २ ग्रीष्म - ज्येष्ठ , आषाढ ; ३ वर्षाश्रावण , भाद्रपद ; ४ शरद् ‌‌- आश्चिन , कार्तिक ; ५ हेमंत - मार्गशीर्ष , पौष व ६ शिशिर - माघ , फाल्गुन .

" षड्‌‍वा ऋतवः संवत्सरस्य । " ( शतपथ )

षड्‌‍गया - १ गया - गयाक्षेत्र , २ गय - देशवाचक अथवा गय नांवाचा राजा होऊन गेला - ज्यानें शंभर अश्वमेध केले , ३ गयादित्य , ४ गायत्री , ५ गदाधर व ६ गयेंतील गयासुर - याचा देह ब्रह्मानें यज्ञाकरितां मागितला व तो त्यानें लोकोपकारार्थ दिला म्हणुन , अशी सहा गया स्थानें भुक्तिदायक होत .

गया गयो गादित्यो गायत्री च गदाधरः ।

गयागयासुरश्चैवं षड्‌‍गया मुक्तिदायकाः ॥ ( वायु . उत्तरार्ध ५० - ७३ )

षडंगें ( कला साधनेचीं )- नैपुण्य , २ योजकता , ३ लोकसंग्रहा , ४ लोकमत , ५ काळ आणि ६ उपासना ( माऊली विशेषांक )

षडंगें ( दानाचीं )- १ दाता , २ प्रतिगृहीता ( घेणारा ), ३ पवित्रता , ४ वस्तु , ५ देश ( स्थान ) आणि ६ काल .

दाता प्रतिगृहीता च शुद्धिर्देयं च धर्मयुक् ‌‌ ।

देशकालौ च दानानामङ्‌‍गान्येतानि षड् ‌‍ विदुः ॥ ( स्कंदमाहेश्वर ३ - ५० )

षडंर्गे ( योगाचीं )- १ आसन , २ प्राणायाम , ३ प्रत्याहार , ४ धारणा , ५ ध्यान व ६ समाधि .

आसनं प्राणसंरोधः प्रत्याहारश्च धारणा ।

ध्यांन समाधिरेतानि योगाङ्‌‌गानि भवन्ति षट् ‌‍ ॥ ( स्कंद काशी ४१ - ५९ )

षडंगें ( वेदाचीं )- १ शिक्षा - उच्चार शास्त्र ( वेदाचें घ्राणेंद्रिय ), २ कल्प सूत्र - यंत्रशास्त्र ( वेदाचे हात ), ३ व्याकरण - शब्दशास्त्र ( वेदाचें मुख ) ४ निरुक्त - कोश ( वेदाचे कान ), ५ छंद - वृत्त , ( वेदाचे चरण ) आणि ६ ज्योतिष , ( वेदाचे नेत्र ). तत्त्व - निज - बोध )

शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छंदसामिति ।

ज्योतिषं नयनं चैव षडंगो वेद उच्यते ॥ ( सु )

षडंगें ( सैन्याचीं )- १ रथ , २ हत्ती , ३ घोडे , ४ पायदळ ५ गाडे आणि ६ उंट . अशीं महाभारत काळीं , सेनेचीं सहा अंगें होतीं .

षड्‌‍गुण - ( अ ) १ ऐश्वर्य , २ धर्म , ३ यज्ञ , ४ श्री , ५ ज्ञान व ६ वैराग्य . हे सहा ईश्वरी गुण मानले आहेत .

ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशसः श्रियः ।

ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भग इतीरणा ॥ ( बृहन्नारदीय पूर्वखंड ) ( आ ) १ कर्तुत्व , २ नियंतृत्व , ३ भोक्तृत्व , ४ विभुत्व , ५ साक्षित्व आणि ६ सर्वज्ञत्व ( वज्रकोश ); ( इ ) १ सर्वज्ञता , २ तृप्ति , ३ अनादिज्ञान , ४ स्वातंत्र्य , ५ शक्तिप्रकाशन आणि ६ अनंतशक्तित्व . असे सहा गुण श्रीकृष्णाचे ठिकाणीं होते . ( हरिवंश - विष्णुपर्व अ . ६५ )

षड्‌गुण गायनांतील - १ सुस्वर , २ सुरस , ३ सुराग , ४ मधुराक्षर , ५ सालंकार आणि ६ प्रमाण .

सुस्वरं सुरसं चैव सुरागं मधुराक्षरम् ‌‍ ।

सालंकारं सप्रमाणं षड्‌‍विधं गीतलक्षणम् ‌‍ ॥ ( रागविलास )

षड्‌‍गुण ( राजनीतिशास्त्र )- १ संधि - प्रसंगीं एकमेकांस मदत करणें , २ विग्रह - युद्ध , ३ यान - शत्रूवर चाल करून जाणें , ४ आसन - शत्रूची उपेक्षा करणें , ५ द्वैधीमाव - केव्हां संधि केव्हां विग्रह करणें ( दुटप्पी धोरण ) आणि ६ संश्रय - दुसर्‍याचा आश्रय घेणें - बलिष्ठ सत्तेशीं स्पर्धा न करणें . ( मुन . ७ - १६० )

षड्‌‍दर्शनें - ( अ ) १ न्याय , २ विशेषिक , ३ वेदान्त , ४ बौद्धमत , ५ सांख्य आणि ६ पूर्वमीमांसा .

’ बौद्धमतसंकेतु बार्तिकांचा ’ ( ज्ञानेश्वरी १ - १२ ) ( आ ) १ सौर , २ शाक्त , ३ गाणपत्य , ४ शैव , ५ विष्णव ६ स्कांद .

षड्‌‍दर्शनें व षड्‌‌दर्शनप्रणेते - १ सांख्य - कपिलमुनि , २ योगपतंजलि , ३ न्याय - गौतम , ४ वैशेषिक - कणाद , ५ पूर्वमीमांसा - जैमिनि आणि ६ वेदान्त - बादरायण ( व्यास )

सांख्यस्य कर्ता कपिलो न्यायसूत्रस्य गौतमः ।

पतजलिस्तु योगस्य कर्ता योगीश्वरो महान् ‌‍- ॥

वैशेषिकस्य काणादो मीमांसायाश्च जैमिनिः ।

वेदान्तशास्त्रस्य कर्ता व्यासो नारायणः स्वयम्‌ ॥ ( सु . )

षड्‌‍दोष - १ झोंप , २ जडत्व , ३ भीति , ४ क्रोध , ५ आळस व ६ चेंगटपणा . षड्‌‌दोषाः पुरुषेणैव हातव्या भूतिमिच्छता । ( हितो . )

षड्‌‌द्रव्यें ( जैनधर्म )- १ जीवद्रव्य , २ पुद्नलद्नव्य , ३ धर्मद्रव्य , ४ अधर्मद्रव्य , ५ कालद्र्व्य आणि ६ आकाशद्वव्य .

षडधिप - १ राजा , २ मंत्री , ३ अग्रधान्येश , ४ मेधेश , ५ रसेश व ६ पश्चाद्धान्येश . ( पचांग )

षडक्षरी मंत्र - ( अ ) ॐ नमःशिवाय . " सर्वमंत्राधिकश्चायं ओंकाराद्यः षडक्षरः " ( शिवपुराण ) ( आ ) ॐ विष्ण्वे नमः ( इ ) राम - कृष्ण - हरि हा मंत्र भगवद्भक्त तुकाराम यांस त्यांचे गुरुकडून स्वप्रांत मिळाला त्या दिवशीं माघ शु . १० गुरुवार होता . ( इ ) " ॐ मणिपद्मे हूँ " हा मंत्र बौद्धांचा .

षड्‌‍भिषक् ‌‍ संहिता - १ अग्निवेश , २ भेड , ३ जातुकर्ण , ४ पराशर , ५ हारीत व ६ क्षारपाणि , या अत्रिपुत्र पुनर्वसूनें पढविलेल्या सहा शिष्यांनीं लिहिलेल्या आयुर्वेदावरील ग्रंथास म्हणतात . ( विज्ञान उदय आणि विकास )

षड्‌‍भुज गणेश देवतोची सहा आयुधें व विषय - १ परशु - तर्क ( न्याय ), २ अंकुश - नीतिभेद ( वैशेषिक ), ३ मोद्क - वेदान्त ( उत्तर - मीमांस ) ४ भग्नदंत - बौद्धमत ( पूर्वमीमांसा ), ५ कमल - सत्कारवाद ( सांख्या ), आणि ६ अभय - धर्मप्रतिष्ठा ( योग ) ज्ञानेश्वरी अ . १ ला विवरण .

षण्मुखीमुद्रा - २ दोन कानाचीं दोन भोके , २ डोळे व २ नाकपुडया , हीं सहा हातांच्या बोटांनीं दाबून करावयाची एकमुद्रा .

षण्मुद्रा - १ भूचरी , २ चाचरी , ३ अगोचरी , ४ खेचरी , ५ उन्मनी व ६ अलक्ष्य . ( ह . प्र . )

षड्‌योग कपिलाष्टी - १ भाद्रपद मास , २ कृष्णपक्ष , ३ मंगळवार , ४ षष्ठी , ५ रोहिणी नक्षत्र व ६ व्यतिपात . असे सहा योग एकत्र आल्यास त्यास कपिलाषष्ठी म्हणतात . हा योग , प्रायः साठ वर्षांनीं येतो . ( धर्मसिंधु )

षड्रस - १ गोड , २ आबंट , ३ तिखट ; ४ कडू , ५ खारट , आणि ६ तुरट .

" षड्रस जीवन चालवी । षड्रिपु माया प्रसवी "

मधुराम्लकटुतिक्तक्षारकषायाः षड्रसाः ॥ ( च . सं . )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP