मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या १०८

संकेत कोश - संख्या १०८

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


एकशें आठ उपनिषदे - ऋग्वेदाच्या २१ शाखा , यजुर्वेदाच्या १०९ सामवेदाच्या १००० आणि अथर्ववेदाच्या ५० अशा एकूण ११८० शाखागणिक असलेल्या उपनिषदांपैकीं प्रमुख उपनिषदें १०८ आहेत तीं :- १ ईशावास्य , २ केन , ३ कठ , ४ प्रश्न , ५ मुण्ड , ६ माण्डुक्य , ७ तैत्तिरीय , ८ ऐतरेय , ९ छांदोग्य , १० बृहदारण्य , ११ ब्रम्ह , १२ कैवल्य , १३ जाबाल , १४ श्वेताश्वेतर , १५ हंस , १६ आरुणि , १७ गर्म , १८ नारायण , १९ परम , ( हंस ) २० ( अमृत ) बिंदु , २१ ( अमृत ) नाद , २२ ( अथर्व ) शिरस् ‌. २३ ( अथर्व ) शिखा , २४ मैत्रायिणी , २५ कौषीतकी , २६ बृहज्जाबाल , २७ नृसिंहतापिनी , २८ कालाग्निरुद्र , २९ मैत्रेयी , ३० सुबाल , ३१ क्षुरि ( का ) ३२ मन्त्रिका , ३३ सर्वसार , ३४ निरालंब , ३५ शुक ( रहस्य ), ३६ वज्रसूचिका , ३७ तेजो -( बिन्दु ), ३८ नाद - ( बिन्दु ३९ ध्यान - बिन्दु , ४० ब्रह्मविद्या , ४१ योगतत्व , ४२ आत्मबोधक , ४३ ( नारद )- परिव्राज्जक , ४४ त्रिशिखि - ( ब्राह्मण ) ४५ सीता , ४६ ( योग ) चूडा - ( मणि ), ४७ निर्वाण , ४८ मण्डल -

( ब्राह्मण ) ४९ दक्षिणा - ( मूर्ती ) ५० शरम , ५१ स्कंद , ५२ महानारायण , ५३ अद्वय - ( तारक ) ५४ राम - ( रहस्य ) ५५ रामतपन , ५६ वासुदेव , ५७ मुद्र्ल , ५८ शाण्डिल्य , ५९ पिङगल , ६० भिक्षुक , ६१ महा , ६२ शारीरक , ६३ ( योग )- शिखा , ६४ तुर्यातीत , ६५ संन्यास , ६६ ( परमहंस )- परिव्राजक , ६७ अक्षमालिका , ६८ अव्यक्त , ६९ एकाक्षर , ७० ( अन्न )- पूर्णा , ७१ सूर्य , ७२ अक्षिक , ७३ अध्यात्म , ७४ कुण्डिका , ७५ सावित्री , ७६ आत्म , ७७ पाशुपत , ७८ परव्रह्म , ७९ अवधूतक , ८० त्रिपूर तापन , ८१ देवी , ८२ त्रिपुर , ८३ कठ ( रुद्र ) ८४ भावना , ८५ रुद्र -( ह्रदय ) ८६ ( योग )- कुण्डली , ८७ भस्म -( जाबाल ), ८८ रुद्राक्ष , ८९ गण - ( पति ) ९० ( श्री जाबाल )- दर्शन , ९१ तारसार , ९२ महावाक्य , ९३ पञ्चब्रह्म , ९४ प्राण - ( अग्निहोत्र ), ९५ गोपाल ( पूर्वतापिनी - उत्तरतापिनी ), ९६ कृष्ण , ९७ याज्ञवल्क्य , ९८ वराह , ९९ शाठयानीय , १०० हयग्रीव , १०१ दत्तात्रेय , १०२ गुरुड , १०३ कलि ( संतराण ), १०४ जाबालि , १०५ सौभाग्यलक्ष्मी , १०६ सरस्वती

( रहस्या ), १०७ बव्ह्रच आणि १०८ मुक्तिकोपनिषद . " अष्टोत्तरशतस्यादौ प्रामाण्यं मुख्यमीरितम ‌‍. " ( रा . गी . १८ - ३ )

या १०८ उपनिषदांव्यतिरिक्त अडया ( मद्रास ) वाचनालय संस्थेमार्फत आणखी ७१ उपनिषदें प्रसिद्ध झालीं आहेत . यांत दशोपनिषदें

( दहा अंका - खालीं पाहा ) हीं मुख्य होत .

एकशें आठ मणी जपमाळेस - ( अ ) सूर्य परव्रह्म आहे . सूर्याला सर्व ग्रह प्रदक्षिणा घालतात . ही प्रदक्षिणा सत्तावीस नक्षत्रांतून होत असते . प्रत्येक नक्षत्राचे चार पाद म्हणजे नक्षत्र चक्राचे १०८ भाग होत असल्यानें जपासाठीं ही नक्षत्रमाला - शास्त्रानें निश्चित केली आहे ( ज्ञानेश्वर मासिक श्रावण शके १८७३ ( आ ) जप माळेचे प्रमाणः - २५ तत्त्वें , १० पवन पिंडीचे व ब्रह्मांडीचे , २० प्रकृति पुरुष लक्षणें , ५२ मातृका ( ५० क . पासून क्ष पर्थंत ) ३४ व्यंजनें आणि १६ स्वर , ॐ नामाचीं मिळून २ गुप्त गुप्तगुरुघरचीं ) आणि १ ॐ कार मिळून १०८ ( दु . श . को . )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP