मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ५

संकेत कोश - संख्या ५

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


पंच अंगें ( अभ्यासाचीं )- १ अभ्यास , २ लेखन , ३ निरीक्षण , ४ चर्चा व ५ विद्धानाची उपासना ( सु . )

पंच अंगें ( अनुमानाची )- १ प्रतिज्ञा , २ हेतु ३ द्दष्टान्त , ४ उपनय व ५ निगमन .

पंच अंगें ( अभिनयाचीं )- १ डोळे , २ भिंवया , ३ हात , ४ पाय आणि मन ( सर्वांग ). या अवयवांनीं भावदर्शन करणें .

चित्ताक्षिभरूहस्तपादैरंगश्चेष्टादिसाम्यतः ।

पात्राद्यवस्थाकरणं पञ्चाङ्‌‍गोऽभिनयो मतः ॥ ( सु . )

पंच अंगें ( उपासानेचीं )- १ गीता ( त्या त्या देवता विषयक ), २ सहस्त्रनाम , ३ स्तवराज , ४ कवच व ५ ह्रदय .

" हृदयं चेति पञ्चैते पञ्चांगं प्रोच्यते बुधैः । ( योगशास्त्र )

पंच अंगें औषधीचीं ( वैद्यकांत )- १ साल , २ पान , ३ फूल , ४ मूळ आणि ५ फळ . एकाच झाडाचें ! हीं पांच अंगें . यास वृक्षपंचांग म्हणतात .

त्वक्‌‍पत्रं कुसुमं मूलं फलमेकस्य शाखिनः ।

एकत्र मिलितं चैतत् ‌‍ पञ्चाङ्‌‍गमिति संज्ञितम् ‌‍ ( सु . )

पंच अंगें ( कालाचीं )- १ तिथि , २ वार , नक्षत्र , ४ योग आणि ५ करण हीं पांच अंगें ज्यांत मुख्यत्वें सांगितलेलीं असतात त्यास पंचांग म्हणतात .

’ तिथिर्वारश्च नक्षत्रं योगः करणमेव च ।

तत्पञ्चाङ्‌‍गमिति प्रोक्तम् ‌‍ ॥ ’ ( सु . )

पंच अंगें ( पुरश्चरणाचीं )- १ जप , २ होम , ३ तर्पण , ४ मार्जन , आणि ब्राह्मणभोजन .

पंचांगोऽयं महायागः पुरश्चरणसंज्ञकः ( विष्वक्‌‍सेन मंत्रशास्त्र )

पंच अंगें ( मीमांसा पद्धतीचीं )- १ विषय , २ संशय , ३ पूर्वपक्ष , ४ उत्तरपक्ष आणि ५ सिद्धान्त .

पंच अंगें ( यज्ञाचीं )- ( अ ) १ देवता , २ हविर्द्रव्य , ३ मंत्र , ४ ऋत्विज व ५ दक्षिणा ; ( आ ) १ शास्त्रोक्त विधि , २ अन्नसंतर्पण , ३ वेदमंत्र , ४ दक्षिणा व ५ श्रद्धा हीं पांच अंगें मानतात .

देवानां द्र्व्यह विषामृक्‌‍सामयजुषां तथा ।

ऋत्विजां दक्षिणानां च संयोगो यज्ञ उच्यते ॥ ( वा . पु . )

पंच अग्नि ( तेज तत्त्व )- १ जठराग्नि , २ कामाग्नि , ३ मंदाग्नि , ४ प्रकाशाग्नि , ( वडवाग्नि ) आणि ५ ब्रह्माग्नि ( तत्त्व - निज - विवेक )

पंच अवस्था - १ जागृति , २ स्वप्न , ३ सुषुप्ति , ४ तुर्या आणि ५ उन्मनी . ( क . गी . २ - ७ )

पंच अवस्था उन्नतीच्या ( साक्षात्कार भार्गांतल्या )- १ अज्ञाना - वस्था , २ भोगावस्था , ३ त्यागावस्था ४ भक्तावस्था व ५ स्वरूपावस्था ( अथर्व - अनु - भाग १ ला )

पंच अवस्था ( प्राणिमात्रांच्या )- १ जन्म , २ बालपण , ३ तारुण्य , ४ वार्धक्य व ५ मृत्यु .

पंच अणुव्रतें ( जैनांचीं )- १ अहिंसा अणुव्रत , २ सत्य , ३ अचौर्य , ४ स्वस्त्रीसंतोष व ५ परिग्रह प्रमाण अणुव्रत . ( जैनधर्मा तत्त्वार्थ सूत्र )

पंच अहंकार - १ देहाहंकार , २ प्रज्ञाहंकार , ३ जीवाहंकार , ४ आत्माहंकार आणि ५ शिवाहंकार ( साधन - संहिता )

पंचांगुलें - १ अंगुष्ठ , २ तर्जनी , ३ मध्यमा , ४ अनामिका आणि ५ कनिष्ठिका .

पंच आनंद - १ विषयानंद , २ योगानंद , ३ अद्वैतानंद , ४ विदेहानंद आणि ५ ब्रह्मानंद ,

विषययोगानंदौ द्वावद्वैतानंद एव च ।

विदेहानन्दो विख्यातो ब्रह्मानन्दश्च पञ्चमः ॥ ( क . गी . २ - ३४ )

पंच आशास्थानें ( मानवाचीं )- १ जीवित , २ कांता , ३ अपत्य , ४ मान आणि ५ धन . हीं पांच आशास्थानें होत .

पंचाचार्य ( वीरशैव संप्रदाय )- १ रेवणाराध्य - रंभापूरी - बाळी - हळ्ळी , २ मरुळाराध्य - उज्जयिनी , ३ एकोरामाराध्य - हिमवत्‌‍केदार , ४ पंडिताराध्य - श्रीशैल आणि ५ विश्वाराध्य - कोलिपाकी - कशी ( बी . प्र . )

पंच ’ उ ’ कार - १ उद्योग , २ उत्साह , ३ उत्तेजन , ४ उपकारबुद्धि आणि ५ उदारत्व . हे पंच ’ उ ’ कार उच्च प्रतीचे सद‌‌गुण होत .

पंच उपप्राण - १ नाग - ढेकर येणारा , २ कूर्म - निमिषोन्मेष करणारा , ३ कृकल - शिंक येणारा , ४ देवदत्त - जांभई येणारा व ५ धनंजय - मरणानंतर किंचित्काल ब्रह्मरंध्रांत राहणारा . असे पंच वायु . ( रा . गी . ४ - ३७ )

पंच उपविषें - ( अ ) १ रुईचा चीक , २ त्रिधारी निवडुंगाचा चीक , ३ कळलावी , ४ धोत्रा आणि ५ कण्हेर . ( आ ) १ शेर , २ रुई , ३ कण्हेर , ४ लागंली ( नारळ ) व ५ विषमुष्टिका ( काजरा ) ( म . वा . को . )

अर्कक्षीरं स्नुहीक्षीरं तथैव कलिहारिका ।

धत्तूरः करवीरश्च पंच चोपविषाः स्मृताः ॥ ( सु . )

पंच उपविध्नें योगाभ्यासाच्या आड येणारीं - १ दुःख , २ दौर्मनस्य ( नम क्षुब्ध होणें ), ३ अंगमेजयत्व ( कंप सुटणें ), ४ श्वास आणि ५ प्रश्चास ( शरिरांतीत वायु बाहेर सोडणें ) यो . सू १ - ३ १ ).

पंच ’ क ’ कार ( लक्षणात्मक )- १ कच्छ ( आखूड विजार )- विनयदर्शक , २ कडें - सद्‌‍धर्माची आठवण , ३ कृपाण - शक्ति व स्वाभिमान , ४ कंगा - स्वच्छता व ५ केश - परमेश्वरप्राप्ति समर्पण . ( ईश्वरानें ज्या स्थितींत निर्माण केलें तींत समाधान मानावयाचे ) ( शिखांचा इतिहास हे पंच ’ क ’ कार गुरु गोविंदसिंगानें सुरू केले व ते प्रत्येकाजवळ असले पाहिजेत असा शीखपंथांत निर्बंध आहे .

पंचक ( प्रातःस्मरणीय )- ( अ ) १ अहल्या , २ द्रौपदी , ३ सीता , ४ तारा आणि ५ मंदोदरी .

अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा ।

पञ्चकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ‌‍ ॥

( आ ) १ सावित्री , ( आधुनिक ) २ भगिनी निवेदिता , ३ मीरा , ( राजस्थान ), ४ राणी लक्ष्मी झांशी व ५ अहिल्याबाई होळकर .

यमजेत्रीच सावित्री भगिनी च निवेदिता ।

मीरा लक्ष्मीरहल्या च पंचैता पुण्यजीवनाः ॥ ( भगिनी निवेदिता चरित्र )

पंच कर्में शरीरशुद्‌‍ध्यर्थ - १ वमन , २ विरेचन , ३ बस्ति , ४ तैलबस्ति व ५ नस्य . या पांच उपचारपद्धति आयुर्वेदांत सांगितल्या आहेत . ( आयुर्वेद . )

पंचकर्में ( संध्यासमयीं वर्ज्य )- १ आहार ( भोजन ), २ मैथुन , ३ झोप , ४ अध्ययन व ५ मार्गक्रमण , ( भा . प्र . पूर्वखंड ).

पंचकर्मेंद्रियें - १ हात , २ पाय , ३ वाणी , ४ शिश्न व ५ गुद .

पंच कर्मेंद्रियें व त्यांच्या अधिष्ठात्री देवता - १ वाचा - अग्नि , २ हात - इंद्र , ३ पाय - विष्णु , ४ गुद - सूर्य ( मित्र ) व ५ शिश्न - प्रजापति , पंचकर्मेंद्रियें व पंच ज्ञानेंद्रियें यांखेरीज मन हें अकारावें इंद्रिय असून त्याची अधिष्ठात्री देवता इंद्र आहे ( सिद्धांतशिरोमणि )

पंचकर्म चिकित्सा - १ वमन , २ विरेचन , ३ अनुवासन ( स्नेह - बस्ति ) ४ निरुह ( बस्ति क्काथ ) व ५ नस्य अशा पांच प्रकारच्या चिकित्सेला म्हणतात ( आयुर्वेद )

पंचकल्याणी ( घोडा )- गुडव्यापर्यंत चारी पाय पांढरे व तोंडावर पांढरा पट्टा असतो असा घोडा . हा शुभलक्षणी मानतात .

( अश्वपरीक्षा ).

पंचकल्याणिक ( जिनधर्म )- १ गर्मकल्याणिक , २ जन्मकल्याणिक , ३ तपकल्याणिक , ४ केवलकल्याणिक आणि ५ मोक्षकल्याणिक . असे तीर्थंकर भगवानाच्या १ गर्म , २ जन्म , ३ तप , ४ केवळ आणि ५ मोक्ष अशा पांच प्रसंगाच्या उत्सवप्रकारस पंच महाकल्याणिक म्हणतात .

पंचकलि ( कलह - वास्तव्यस्थानें )- १ मिथ्या भाषण , २ उन्माद , ३ काम , ज४ हिंसादि दोष व ५ वैर . परीक्षितानें कलीला प्रयम चार स्थानें नेमून दिलीं ( चारचे अंकांत पाहा ). त्यानंतर कलीनें पुनः प्रार्थंना केल्यावरून परीक्षितानें आणखी पांच स्थानें कलील दिलीं .

( भा . ग . १ . १७ . ३९ )

पंचकषाय - ( अ ) १ हिरडा , २ आमलक , ३ मंजिष्ट , ४ लोध्रव ५ टेंभुरणी ; ( आ ) शमी , २ उंवर , ३ अश्चत्थ , ४ वड आणि ५ पळस .

शम्युदुम्बरमश्चत्थं न्यग्रोधं च पलाशकम् ‌‍ ।

यज्ञं यज्ञे विमन्त्रेण दद्यात्पञ्चकषायिकम् ‌‍ । ( भ . पु . १३५ - ३० ) ( इ ) १ जांभुळ , २ सांवरी , ३ चिकणा , ४ बकुल आणि ५ बोर . हे पंचकषाय देवीला प्रिया आहेत .

जंबूशात्मलिबांटयालं बकुलं बदरं तथा ।

कषाया पञ्च विज्ञेया देव्याः प्रीतिकराः शुभाः ॥ ( दुर्गोत्सवपद्धति )

पंच काशी - १ वाराणशी , २ गुप्तकाशी , ३ उत्तरकाशी , ४ दक्षिणकाशी ( तेन्काशी ) व ५ शिवकाशी .

पंचकुळी - १ भोसले , २ गुजर , ३ शिर्के , ४ मोहिते व ५ महाडीक . हीं महाराष्ट्रांतील पांच प्रसिद्ध क्षत्रिय कुलें .

पंचकेणें - १ मिरीं , २ मोहरी , ३ जिरें , ४ हिंग आणि ५ धोंडफूल . याअ मसल्याच्या पांच जिनसांना म्हणतात .

पंच केदार - १ बदरीकेदार , २ मध्यमहेश्वर , ३ तुंगनाथ , ४ रुद्रनाथ व ५ गोपेश्वर .

पंच क्लेश - १ अविद्या , २ अस्मिता ( आहेपणा , मीपणाची गांठ ), ३ राग , ४ द्वेष आणि ५ अभिमान . या पांचांपासून उद्भवणार्‍या स्थूल वृत्ति , यांस क्लेसादिपंचक म्हणतात . ( पातंजलयोग साधनपाद ३ )

पंच कोश ( आत्म्याचे )- १ जडशरीर , २ चैतन्य , ३ मन - बुद्धि , ४ अतिमानस ( सूक्ष्मज्ञान ) आणि ५ आनंद . ( विज्ञानघन आणि आंनदघन ) ( महायोगी अरविंद )

पंच कोश ( योगशास्त्र )- १ अन्नमय . २ प्राणमय , ३ मनोमय , ४ विज्ञानमय आणि ५ आनंदमय . असे पंचकोश म्हणजे जीवात्म्याची पांच आवरणें .

 

पंचकृष्ण ( महानुभाव संप्रदाय )- १ श्रीकृष्ण , २ दत्तात्रय , ३ चांगदेव राऊळ , ४ गुंडम राऊळ आणि ५ श्रीचक्रधर . ( आ ) १ हंस , २ दत्त , ३ कृष्ण , ४ प्रशांत व ५ चक्रधर . ( म . ज्ञा . को )

पंचाकाश - ( अ ) १ आकाश , २ महाकाश , ३ पराकाश , ४ तत्त्वाकाश आणि ५ सूर्याकाश ( कल्याण योगांक ६२ ); ( आ ) १ घटाकाश , २ मठाकाश , ३ महदाकाश , ४ चिदाकाश आणि ५ निराकाश . ( क . गी . २ - २४ )

पंचीकरण - १ पृथ्वी , २ आप , ३ तेज , ४ वायु आणि ५ आकाश . या पंचमहाभूतांपैकीं प्रत्येकाचा कमी जास्त भाग घेऊन त्या सर्वाच्या मिश्रणानें तयार होणार पदार्थ . याला पंचीकरण अथवा पांच तत्त्वांचें विवरण म्हणतात . ( गी . र . १८१ )

पंचखंडें - १ आशिया , २ युरोप , ३ अमेरिका , ४ आफ्रिका आणि ५ आस्ट्रेलेशिया असे या पृथ्वीचे पांच मोठे भूभाग .

पंचखाद्यें अथवा पंचमेवा - ( अ ) १ खारीक , २ खोबरें , ३ खसखस , ४ वेदाणा व ५ खडीसाखर ; ( आ ) १ खारीक , २ खोबरें , ३ डाळें , ४ लाह्या व ५ पोहे .

पंचख्याति - १ असत् ‌‍ ख्याति - शून्यवाद , २ आत्मख्याति - क्षणिक विज्ञानवाद , ३ अन्यथाख्याति - नैयातिक , ४ अख्याति - सांख्य व प्रभाकरमत , आणि ५ अनिर्वचनीय ख्याति - अद्वैत वेदान्त . या पांच ख्याति म्हणजे पदार्थांची प्रतीति .

अनिर्वचनीय जे ख्याति । तो वादू निश्चिती मी उद्धवा ॥ ( ए . भा . १६ - २०६ ).

पंच ’ ग ’ कार ( गवयाचे )- ( अ ) १ गत , २ गर्व , ३ गांजा , ४ गीता आणि ५ गंगास्नान , हे पंच ’ ग ’ कार वैदिक धर्माचे पंचप्रान होत .

गायत्री गोविन्द गौ गीता गङ्‌‍गास्नान ।

इन पाँचोंकी कृपासे शीघ्र मिले भगवान ॥ ( तत्त्वचिं . भाग २ )

पंच ’ ग ’ कार दुर्लभ - १ गोमती नदी , २ गोमयस्नान , ३ गोदान , ४ गोपीचंदन आणि ५ गोपीनाथदर्शन .

पंच गोदानें - १ पापधेनु , २ उत्क्रांतिधेनु , ३ वैतरणीधेनु , ४ ऋण धेनु आणि ५ कामधेनु ( म . वा . कोश )

पंचगंगा - ( अ ) १ नंदिनी , २ नलिनी , ३ सीता , ४ मालती आणि ५ विष्णुपदा ( ज्वालामुखी पर्वतांत ). ( गदाधर भाष्य ). ( आ ) १ किरणा , २ धूतपापा , ३ सरस्वती , ४ गंगा व ५ यमुना . ( इ ) १ शिवा , २ भद्रा , ३ भोगावती , ४ कुंभी आणि ५ सरस्वती ( करवीर महात्म्य )

गोमती गोमयस्नानं गोदानं गोपिचंदनम् ‌‍ ।

दर्शनं गोपिनाथस्य गकाराः पंच दुर्लभाः ॥ ( स्कंद . नागरखंड . )

पंच गंध - ( अ ) १ कस्तुरी , २ चंदन , ३ कापूर , ४ अगरू आणि ५ मलयागरुचंदन . हीं पांच प्रसिद्ध सुगंधी द्र्व्यें . हीं सर्व कार्यांत शुभदायक होत .

कस्तुरीचंदनं चंद्रमगरु द्वितीयं तथा ।

पचगंधसमाख्यातं सर्वकायेंषु शोभनम् ‌‍ ॥ ( पद्म . पाटाळखंड ). ( आ ) १ कापूर , २ कंकोळ , ३ लवंग . ४ जायफळ आणि ५ सुपारी . ( दु . श . को . )

पंचगव्य - १ गोमूत्र , २ गोमय , ३ दूध , ४ दहीं व ५ तूप . हे पांचहि गाईपासून मिळणारे पदार्थ , सर्व पवित्र , धार्मिक कार्यांत शुद्धिकार्याकडे यांचा उपयोग करतात .

गोमूत्रं गोमयं क्षीरं दधिसर्पिस्तथैव च ।

गवां पञ्च पवित्राणि पुनन्ति सकलं जगत् ‌‍ ॥ ( स्कंद . रेवाखंड )

पंचगीता - १ भगवद्नीता , २ गणेशगीता , ३ भगवतीगीता , ४ सूर्यगीता आणि ५ शिवगीता

पंचगौड - १ सारस्वत , २ कान्यकुव्ज , ३ गौड , ४ उत्कल आणि ५ मैथिल . या पांच उत्तर भारतांतील ब्राह्मणांस पंचगौड म्हणतात .

’ गौडाः पञ्चेति विख्याता विंध्ययोस्तरबासिनः । ’ ( वाराह पुराण )

पंचग्रंथ - १ संहिता , २ ब्राह्मन , ३ आरण्यक , ४ पद आणि ५ क्रम .

पंच ग्रंथी - १ पंचकोश , २ समष्टिसार , ३ मानुष विचार , ४ गुरुबोध आणि ५ सत्यशब्द टकसार या पांच कबीरपंथी ग्रंथास पंचग्रंथी म्हणतात .

पंच " च " कार - १ चहा , २ चिवडा , ३ चिरूट , ४ चंची आणि ५ चलच्चित्रपट या पंच ’ च ’ कारांनीं समाजपुरुषाला ग्रासलें आहे .

पंच ’ ज ’ कार ( दुर्लभ )- १ जननी , २ जन्मभूमि , ३ जाह्लवी , ४ जनार्दन आणि ५ जनक ,

जननी जन्मभूमिश्च जाह्लवी च जनार्दनः ।

जनकः पञ्चमश्चैव जकाराः पञ्च दुर्लभाः ॥ ( सु . )

पंच ’ ज ’ कार तृप्ति न पावणारे - १ जांवई , २ जठर , ३ जाया , ४ जातवेद आणि ५ जलाशय .

जामाता जठरं जाया जातवेदा जलाशयः ।

पूरिता नैव पूर्यन्ते जकाराः पञ्च दुर्भराः ॥ ( सु . )

पंचजन ( वेदकालीन )- ( अ ) १ पुरु , २ अनु , ३ द्रहयु , ४ यदु व ५ तुर्वश . या पांच जमातींना ऋग्वेदकालीं पंचजन म्हणत ; ( आ ) १ ब्राह्मण , २ क्षत्रिय , ३ वैश्य , ४ शूद्र व ५ निषाद , ( इ ) १ गंधर्व , २ पितर , ३ वेद , ४ असुर आणि ५ राक्षस .

पंचजल ( आपतत्त्व )- १ कामजल , २ चंचलजल , ३ आवरणजल , ४ जानीवजल आणि ५ विज्ञानजल . ( तत्व - निज - बोध )

पंचाम्ल - ( अ ) १ अम्लवेतस , २ आमसोल , ३ महाळुंग , ४ डाळिंब व ५ ईडनिंवु , ( आ ) १ आमसोल , २ डाळिंब , ३ बोर , ४ वेतस आणि ५ चिंच . ( इ ) १ बोर , २ डाळिंब , ३ अमसोल किंवा चिंच , ४ चुका व ५ चणकाम्ल - हरभर्‍याची आंब .

कोल - दाडिम - वृक्षाम्ल - चुक्रिका - शुक्तिकारसम् ‌‍ ।

पंचाम्लकं समुद्दिष्टं तच्चोक्त चाम्लपंचकम् ‌‍ ॥ ( रसरत्नसमुच्चय १० - ८४ )

पंचोदन अज ( जीवात्मा )- १ शब्द , २ स्पर्श , ३ रूप , ४ रस आणि ५ गंध हे पांच विषय यांची पांच भोजने म्हणजे उपभोगाचे विषय होत . विषयरूप पांच प्रकारचे अन्न खातो म्हणून त्यास पंचौदन अज अथवा पंचभोजनी असें म्हटलें आहे . ( अथर्व - अनु - मराठी भाग ३ रा )

पंचोपचार ( पूजेचे )- १ ध्यान , २ आवाहन , ३ भक्त्यायुक्त निवेदन , ४ नीराजन व ५ प्रणाम . ( आ ) १ गंध २ पुष्प ३ धूप , ४ दीप आणि ५ नैवेद्य . ( आन्हिक सूत्रावलि )

पंचतरणी ( पंच तरंगिणी )- १ विमल , २ कमल , ३ चक्रसुता ( चाका नदी ), वितस्ता व ५ वैतरणी या पांच नद्यांचे प्रवाह एकत्र येतात असें ठिकाण अमारनाथचे वाटेवर आहे . या पांच धारा म्हणजेच सिंधूचा उगम म्हनतात .

पंच तन्मात्रा - १ शब्द , २ स्पर्श , २ स्पर्श , ३ रस , ४ रूप आणि ५ गंध . या पंचतन्मात्रा - पंचमहाभूतांचीं मूलतत्त्वें .

प्रकृति पुरुष महत्त्वत्व । पंच तन्मात्रा सूक्ष्मस्वभाव ॥ ( ए . भा . १९ - १६८ )

पंच ताल - १ डोली ताल , २ सप्तरुद्रताल , ३ वासुकीताल , ४ लोकताल व ५ सतोपंथ ताल . हीं हिमालयांतील तीर्थें होत .

पंच तिक्त - १ निम्ब , २ गुळवेल , ३ अडुळसा , ४ परवर ( कड् ‌‍ पडवळ ) व ५ भटकटया ( रिंगणा ). या पांच कडू वनस्पतींस म्हणतात .

पंचतीर्थें - १ गंगाद्वार , २ कुशावर्त , ३ बिल्वक , ४ नीलपर्वत आणि ५ कनख . हीं पांच तीर्थें हरिद्वार येथें व त्र्यंबकेश्वरास गोदावरीचे परिसरांत आहेत ; ( आ ) १ वह्लितीर्थ , २ प्रल्हादकुंड , ३ नारदकुंड , ४ कूर्मधारा व ५ लक्ष्मीधारा . बदरीनाथ येथें ,

पंचत्वचा - १ वड , २ पिंपळ , ३ पिंपरी , ४ जांभूळ आणि ५ आंबा . यांच्या सालीं . ( धर्मशास्त्र )

पंचतंत्र - विष्णुशर्मा नामक ब्राह्मणानें रचिलेला प्राचीन संस्कृत ग्रंथ , यांत पांच कथानकें आहेत . या ग्रंथाचे द्वारें पं . विष्णुशर्म्यानें मूर्ख राजपुत्रांस चतुर केलें .

पंच देवपादप - पादप म्हणजे झाड . झाडें पायांनीं ( मुळांनीं ) पाणी शोषितात म्हणून पादप . १ मंदार , २ पारिजातक , ३ संतान , ४ हरिचंदन व ५ कल्पवृक्ष , गे पांच स्वर्गलोकींचे प्रमुख वृक्ष , ( अमर )

पंच देवता ( नित्य उपासनेच्या )- १ सूर्य , २ देवी , ३ विष्णु , ४ गणेश आणि ५ शिव .

आदित्यं अंबिकां विष्णुं गणनाथं महेश्वरम् ‌‍

गृहस्थः पूजयेत्पंच भुक्तिमुक्त्यर्थसिद्धये ॥ ( सु . )

पंचदीर्घ - १ बाहु , २ नाक , ३ डोळे , ४ छाती आणि ५ पोट . हे पांची अवयव लांब असलेल्यास म्हणतात . सामुद्रिकांत शुभलक्षण मानतात . ( म . वा . को . )

पंच देवी - १ दुर्गा , २ पार्वती , ३ सावित्री , ४ सरस्वती व ५ राधिका .

पंच देह - १ स्थूलदेह , २ सूक्ष्मदेह , ३ कारणदेह , ४ महाकारणदेह आणि ५ कैवल्य - ज्ञानदेह , ( क . गी . २ - ८ )

पंच दुःखें - १ गर्मदुःख ., २ जन्मदुःख , ४ व्याधिदुःख ५ मृत्युदुःअख . ( श्वेता - १ - ५ )

पंच द्राविड - १ तेळंग , २ द्राविड , ३ महाराष्ट्रीय , ४ कर्नाटकी व ५ गुर्जर . या पांच दक्षिण भारतांतील ब्राह्मणांस पंचद्राविड म्हणतात . द्वाविडाः पंचविख्याता विंध्यदक्षिणवासिनः ॥ ( वाराह पुराण )

पंच द्राविड भाषा - १ तामिळ , २ तेलगु , ३ मल्याळम् ‌‍,, ४ कन्नड आणि ५ तुळु .

पंच दुर्ग - १ जलदुर्ग , २ पर्वतदुर्ग , ३ वृक्षदुर्ग , ४ ईरिणदुर्ग , ( जेथें कोणत्याहि प्रकारची शेती होत नाहीं असा प्रदेश ) व ५ धन्वदुर्ग

( वालुकामय प्रदेश ), अशीं पांच संरक्षण - साधनें प्राचीन कालीं होतीं .

पंच दोष - १ काम , २ क्रोध , ३ भय , ४ निद्रा आणि ५ श्वास . हे पांच दोष जेवढे म्हणून देहधारी प्राणी आहेत त्यांच्या ठिकाणीं असतात . ( म . भा . शांति )

पंच धातु - १ सोनें , २ रुपें , ३ लोखंड , ४ तांवें आणि ५ जस्त . या पंचधातु . पंचधातूंच्या मिश्रणानें तयार होणारी वस्तु टिकाऊ असते .

पंच धान्यें - १ गहूं , २ जव , ३ तांदूळ , ४ तीळ व ५ मूग . हवन करण्यास उक्त अशीं पांच धान्यें .

पंच धारा ( जलप्रपात )- १ कूर्मधारा , २ प्रल्हाद धारा , ३ इंद्रधारा , ४ वसुधारा आणि ५ भृगधारा , यांतच कोणीकोणी उर्वशी ( उर्वशीचे जन्मस्थान ) धारेचा समावेश करतात . उंच उंच पर्वतावरून पडणारे हे पांच जलप्रपात वद्रीनाथाचे परिसरांत आहेत .

पंचनाथ - १ उत्तर - श्रीवदरीनाथ , २ दक्षिण - श्रींरगनाथ ( श्रींरगम् ‌‍ ), ३ पूर्व - जगन्नाथ , ४ पश्चिम - श्रीद्वारकानाथ व ५ मध्य - श्रीगोवर्धननाथ ( नाथद्वारा - राजस्थान ).

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP