मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
परिशिष्ट ५ वे

संकेत कोश - परिशिष्ट ५ वे

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


कविसंकेत

( निसर्गांत नसलेल्या पण प्राचीन कवींनीं कल्पिलेल्या कविकल्पना ) १ . चक्रवाक आणि चक्रवाकी यांच्यामध्यें फक्त एक कमळाचें पान असतें . पण तीं एकमेकांस दिसत नाहींत . सारी रात्र दोघांना विरहावस्थेंत कंठावी लागते . सूर्योदयीं त्यांचें मीलन होतें .

२ . स्त्रीच्या विविध हावभावांनीं पुढील वृक्ष बहरतात असा कविसंकेत आहे .

स्त्रीच्या स्पर्शें प्रियंगू प्रति आणि बकुला मद्य गंडूषकांनीं ।

पादाघातें अशोका , तिलक - कुरबकांज वीक्षणालिंगनांनीं ॥

मंदारा नर्मवाक्यें , सुरुचिर हंसनें चंपका येई बार ।

आम्रा फुंकें ; नमेरू फुलति कलरवें नर्तनें कर्णिकार

३ , मृगाचे किडे आषाढांत दिसते कीं , पृथ्वी ऋतुस्नात झाली असें समजतात .

४ . ग्रीष्मऋतूच्या ( पावसाळ्याच्या ) आरंमीं हंस मानस सरोबराकडे जातात .

५ . फक्त मेघजल पिऊनच चातक आपली तहान भागवितो .

६ . अतिशयोक्तींतच कविप्रतिमेचा विलास आहे . असा प्राचीन संकेत आहे .

७ . चंद्रकांत मणि चंद्रकिरणांच्या संयोगानें पाझरतो .

८ . कामधेनु ही स्वगींय धेनु . चिंतामणि हें स्वागींय रत्न व कल्पतरु हा स्वर्गीय वृक्ष हे ईप्सितांची परीपूर्ति करणारे आहेत असा कविसंकेत आहे .

९ . पावसाळ्याच्या आरंमीं पहिली मेघगर्जना झाली कीं कदंव फुलतात .

१० . लोहाला परिस मण्याचा स्पर्श झाला कीं लोखंडाचें सोनें होतें .

११ . राजहंस हा दूध आणि पाणी वेगळे करतो .

१२ . सत्तावीस तारकांपैकीं कलंकित चंद्राबद्दल एकनिष्ठा ठेवणारी रोहिणीच होती असा कविसंकेत आहे . ( रोहिणी , जून १९६१ )

१३ . ढेकणाच्या रक्तानें हिरा भंगतो . ढेकणाच्या संगें । हिरा तो मंगला । कुसंगें नाडळ । साधु तैसा ॥ ( तुकाराम )

१४ . स्वाती नक्षत्राच्या पावसानें शिंपल्यांत मोती उत्पन्न होतात .

१५ . संध्याकाळची वेळ व पाणवठयाचें स्थळ प्रणयलीलांना अनुकूल मानण्याचा कविसंकेत आहे .

१६ . मोती हा पाण्यापासून बनतो त्याचें पुन्हा जर पाणी करावयाचें असेल तर त्याला हंसाची चोंच लागावी असा कविसंकेत आहे . ( गीतेच्या श्लोकांवरील प्रवचनें )

१७ . हत्तीच्या गंडस्थळांतून स्त्रवणार्‍या मदाचा विशिष्ट सुगंध सेवन करण्याकरितां भ्रमर लुब्ध होतात .

१८ . हेमाम्भोज नांवाचीं सुवर्ण कमलें फक्त मानस सरोवरांत फुलतात .

१९ . अमृताच्या सेवनानें वस्तुमात्राला चैतन्य व चिरजीवन प्राप्त होतें असा संकेत आहे . ( गाथा सप्तशती )

२० . शेफालिकेची फुलें मध्यरात्रीनंतर दरवळूं लागतात .

२१ . सूर्यकांत मणि सूर्यकिरणांच्या संयोगानें पेट घेतो .

२२ . सर्व अलंकार असून कपाळी कुंकू नसलें तर खरी शोभा नाहीं असा कविसंकेत आहे .

२३ . घनगर्जितामुळें बगळ्या गर्भवती होतात .

२४ . चंपक कलिका रम्य असली व भ्रमर रसिक असला तरी तिच्याजवळ भ्रमर जात नाहीं .

२५ . आज्ञाभंग करणारा व विश्वासघातकी अशाचा काव्यारंमीं नामोल्लेख करूं नये .

भर्तुराज्ञां न कुर्वन्ति ये च विश्वासघातकाः ।

तेषां नामापि न ग्राह्मं काव्यस्यादौ विशेषतः ॥ ( सु . )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP