मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या १४

संकेत कोश - संख्या १४

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


चतुर्दशाक्षरी मंत्र ( अर्वाचीन )- ( अ ) अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त . ( आ ) " स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे . "

( लो . टिळक ).

चतुर्दश प्रयाग - १ प्रयाग राज - गंगा - यमुना - सरस्वती , २ देवप्रयाग - अलकनंदा - भागीरथी , ३ रुद्रप्रयाग - अलकनंदा - मंदाकिनी , ४ कर्णप्रयाग - पिंडारगंगा - अलकनंदा , ५ नंदप्रयाग - अलकनंदा - नंदा , ६ विष्णुप्रयाग - विष्णुगंगा - अलकनंदा , ७ सूर्यप्रयाग - अलसतरंगिणी - मंदाकिनी , १० भास्कप्रयाग - भटवारी , ११ हरिप्रयाग - हरिगंगा - भागीरथी , १२ श्यामप्रागग - श्यामगंगा - भागीरथी , १३ गुप्तप्रयाग - नीलगंगा - भागीरथी व १४ केशवप्रयाग - अलकनंद - सरस्वती . ( कल्याण तीर्थांक )

चतुर्दश भुवनें - १ अतल , २ वितल , ३ सुतल , ४ तलातल , ५ रसातल , ६ महातल , व ७ पाताळ असे सात अधोलोक आणि आपण सर्व वास करतो तो ८ भूलोक ; त्यावर ९ भुवर्लोक , १० स्वर्लोक , ११ महर्लोक , १२ जनलोक , १३ तपोलोक व १४ सत्यलोक असे ऊर्ध्व लोक आहेत . हीं चतुर्दश भुवनें होत . ( वेदांत विचार दर्शन )

चतुर्दशांगलोह - १ रास्ना , २ कापूर , ३ तालीस पत्र , ४ ब्राम्ही , ५ शिलाजित , ६ सुंठ , ७ मिरी , ८ पिंपळी , ९ हिरडा , १० वेहडा , ११ आवळकठी , १२ नागर मोथे , १३ वावडिंग व १४ चित्रकमूळ हीं चौदा औधधें आणि लोहभस्म .

चौदा अंगें ( चर्चेचीं )- १ संशय , २ प्रयोजन , ३ द्दष्टांत , ४ सिद्धांत , ५ अवयव , ६ तर्क , ७ निर्णय , ८ वाद , ९ जल्प , १० वितंडा , ११ हेत्वाभास , १२ छल , १३ जाति व १४ विग्रहस्थान , हीं चचेंचीं चौदा अंगें अथवा विषय न्यायदर्शनांत मानले आहेत .

चौदा अंगें ( शरीराचीं )- १ दोन मिंवया , २ दोन नाकपुडया , ३ दान डोळे , ४ दोन कान ; ५ दोन ओंठ , ६ दोन कोंपरे , ( हाताचे ) ७ दोन मनगटें , ८ दोन गुडघे , ९ दोन घोटे , १० दोन ढोपर , ११ दोन पाय , १२ दोन हात , १३ दोन खांदे आणि १४ दोन गाल हीं प्रत्येकीं दोन दोन अशीं चौदा अंगें आहेत . ( वा . रा . सुंदर , ३५ - १९ )

चौदा अंगें ( ज्ञानाचीं )- १ सत् ‌‍ , २ चित ‌‍ , ३ आनंद , ४ अस्ति , ५ भाति , ६ प्रिय , ७ रूप , ८ नाम , ९ आत्मा , १० ब्रह्म , ११ अनंत , १२ तत् ‌‍ १३ त्वम् ‌‍ व १४ असि .

चौदा अद्वैतमतप्रतिपादक प्रमुख ग्रंथ - १ शारीरकमाष्य , २ पंचपादिका , ३ बृहदारण्याभाष्यावरील वार्तिक , ४ नैष्कर्म्यसिद्धि , ५ भामती , ६ संक्षेपशारीरक , ७ खंडनखंडखाद्य , ८ पंचदशी , ९ वेदांतसार , १० वेदांतपरिभाषा , ११ सिद्धान्तलेश , १२ सिद्धांतबिंदु , १३ अद्वैतसिद्धि आणि १४ अद्वैतामोद . " चतुर्दशात्र रत्नानि शाङ्‌‍करे स्युर्मतार्णवे " ( ब्र . सूत्र , भाष्यप्रस्तावना )

चौदा अन्नामध्यें सांपडणारीं पोषक द्र्व्यें - १ सोडियम् ‌‍ , २ पोटॅशियम् ‌‍ , ३ कॅल्‌‍शियम् ‌‍ , ४ मॅग्नेशियम् ‌‍ , ५ लोह , ६ ताम्र , ७ मँगनीझ , ८ जस्त , ९ क्लोरीन , १० ब्रोमीन , ११ आयोडिन , १२ फ्लोरीन , १३ फॉस्फरस आणि १४ गंधक ,

( Modern Diatory Treatment )

चौदा इंद्र - १ यश , २ रोचन , ३ सत्यजित ‌‍ , ४ त्रिशिख , ५ विभु , ६ मंत्रद्रुम , ७ पुरंदर , ८ बलि , ९ अद्‌‍भुत , १० भारद्वाज , ११ वत्स , १२ वासिष्ठ , १३ विष्णुवृद्ध व १४ शांडिल्य ( म . वा . को . )

चौदा इंद्रियांच्या चौदा देवता - १ अंतःकरण - महाविष्णु , २ अहंकार - रुद्र , ३ मन - चंद्रमा , ४ बुद्धि - ब्रह्मा , ५ कान - दिशा , ६ त्वचा - वायु , ७ नेत्र - सूर्य , ८ जीभ - वरुण , ९ नाक - अश्चिनीकुमार , १० मुख - अग्नि , ११ हात - इंद्र , १२ पाय - उपेंद्र ( वामन ), १३ लिंग - प्रजापति व १४ गुद - यम . ( पंचग्रंथी ).

चौदा इंद्रियांचे चौदा विषय - पंच ज्ञानेंद्रियें - १ श्रोत्र - शब्द , २ त्वाच - स्पर्श , ३ चक्षु - रूप , ४ जिह्ला - रस , ५ घ्रान - गंध ; पंच - कर्मेद्वियें , ६ वाक् ‌‍- वचन , ७ पाणि - आदान , ८ पाद - गमन , ९ उपस्थ - रतिमोग १० गुद - मलत्याग ; चार अंतःकरणें , ११ मन - संकल्पविकल्प , १२ बुद्धि - निश्चय , १३ चित्त - चिंतन व १४ अहंकार - अहंपणा , ( विचारचंद्रोदयदर्शन )

चौदा कामिनी - १ शांति , २ क्षमा , ३ दया , ४ उन्मनी , ५ उपरति , ६ सद्धिद्या , ७ तितिक्षा , ८ स्वरूपस्थिति , ९ मुमुक्षा , १० निष्कामना ,

११ प्रतीति , १२ सुलीनता , १३ समाधि व १४ निर्वाणदीक्षा , ( हरिविजय )

चौदा कुलमातृका - १ गौरी , २ पद्मा , ३ शची , ४ मेघा ५ सावित्री , ६ विजया , ७ जया , ८ देवसेना , ९ स्वधा , १० स्वाहा , ११ मातर , १२ धृति , १३ पुष्टि व १४ तुष्टि . ( पुण्याहवाचन )

चौदा कुलें अप्सरांचीं - १ ब्रह्मदेवाची मानससृष्टि , २ वेदापासून , ३ अग्नि , ४ वायु , ५ अमृतापासून , ६ जलापासून , ७ सूर्यकिरण , ८ चंद्र - किरण , ९ पृथ्वी , १० विद्युत , ११ मृत्यु , १२ मदन , १३ मुनि आणि प्रजापतिकन्या यांपासून व १४ अरिष्टा . यांपासून झालेलीं हीं चौदा अप्सरकुलें होत . ( बाणभट्ट कादंबरी )

चौदा गुण महत्त्वाचे - १ देशकालज्ञता , २ दाढर्य - बळकटपणा , ३ सर्वक्लेशसहिष्णुता , ४ सर्वज्ञता , ५ दक्षता , ६ बल , ७ गुप्तमसलत , ८ मागल्यापुढल्या स्वतःच्या वर्तनाचा मेळ , ९ शौर्य , १० भक्तिज्ञच , ११ कृतज्ञता , १२ शरणागतावर दया , १३ क्रोधराहित्य व १४ स्थैर्य , हे गुण महत्त्वाचे मानले आहेत . वालिपुत्र अंगद हा या चौदा गुणांनीं संपन्न होता . ( वा . रा . किष्किंधा सर्ग , ५४ )

चौदा जागतिक आश्चर्यें - १ विनतारी तारायंत्र , टेलिफोन , २ रेडिओ टेलिव्हिजन व बोलपत , ३ विमान , ४ क्ष - किरणें आणि अल्ट्रा व्हॉयोलेट किरणें , ५ स्पेक्ट्र्म अनॉलिक्सिस , ६ रेडियमचा शोध , ७ ऑटोमोबाईल आणि लोकोमोटिव्ह , ८ रॉकेटपॉपल्‌‍शन , ९ जेट पॉप्ल्‌‍शन , १० पेनसिलीन आणि स्ट्रेप्टो मायसीन , ११ इतर ऍन्टिबॉयाटिक्स , १२ राडरचा शोध , १३ इन्टकॉनिनेंटल बॅलिस्टिक् ‌, १३ मिसिलिज , व १४ ऑटम बाँब , हैड्रोजन बाँब व पृथ्वीचे उपग्रह . ( Bharat year 1960 )

चौदा टाळकरी ( तुकारामाचे )- १ निळोबाराय , २ रामेश्वरभट , ३ गंगाराम मवाळ , ४ महादजी कुलकर्णी , ५ कोंडोपंत लोहकरे , ६ मालजी गाडे , ७ गवरशेट वाणी , ८ मल्हारपत कुळकर्णी , ९ अंबाजीपंत लोहगांवकर , १० कान्होबा , ११ संताजी जगनाडे , १२ कोड पाटील , १३ नावजी माळी व १४ शिववा कासार . ( तुकारामचरित्र )

चौदा तंतु वाद्यें - १ वीणा , २ बीन , ३ रुद्रवीणा , ४ एकतारी , ५ सारंगी , ६ सतार , ७ सारमंडळ , ८ तंबूरी , ९ सरोद , १० कोका , ११ रखब , १२ मदनमंडळ , १३ ताउस व १४ तुणतुणें , ( म . श . को . )

चौदा दानें - १ अन्नदान , २ उदकपान , ३ दीपदान , ४ तांबूलदान , ५ कमंडलुदान , ६ चर्मी जोडादान , ७ छत्रीदान , ८ काठीदान , ९ वस्त्रदान , १० लोहदंडदान , ११ शेगडीदान , १२ तिळदान , १३ चंदनदान आणि १४ पुष्पदान , असे चौदा प्रकार .

चौदा देवनक्षत्रें - १ कृत्तिका , २ रोहिणी , ३ मृग , ४ आर्द्रा , ५ पुर्नवसु , ६ पुष्य , ७ आश्लेषा , ८ मघा , १० उत्तरा , ११ हस्त , १२ चित्रा , १३ स्वाति व १४ विशाखा . ( तै . ब्रा . )

चौदा दोष ( गायनाचे )- १ शंकित , २ भीषण , ३ भीत , ४ उदूदुष्ट , ५ आनुनासिक , ६ काकस्वर , ७ मूर्द्धगत , ८ स्थान - विवर्जित , ९ विस्वर , १० विरस , ११ विश्लिष्ट , १२ विषमाहत , १३ व्याकुल व १४ तालहीन . " व्याकुलं तालहीनंज तालहीनं च गीतिदोषाश्चतुर्दश "

( बृहन्नादीय - पूर्वखंड . ५० - ४५ )

चौदा दोष ( राज्यशासकांस )- १ नास्तिकता - ईश्वर व धर्म नाहीं असें मानणें , २ अनृत , ३ क्रोध , ४ प्रमाद ( लक्ष न ठेवणें ), ५ दीर्घसूत्रता ( चेंगटपणा ), ६ तज्ज्ञांचा सल्ला न घेणें , ७ आळस , ८ इंद्रियसुखाविषयीं आसक्ति , ९ अनावर द्रव्यलोभ . १० मूर्खांशीं मसलत , ११ निश्चय करून तें न करणें , १२ गुप्तता न राखणें , १३ उत्सव वगैरे न करणें व १४ एकाच वेळींज अनेकांशीं शत्रुत्व करणें . ( म . भा . सभा . ५ - ११२ )

चौदा नांवें चांगदेवाचीं - चांगदेव एक महायोगी होते . योग सामर्थ्थानें दर शंभर वर्षांनीं जुना देह टाकून नवा देह धारण केल्यावेळीं घेतलेलीं निरनिराळें चौदा नांवें :- १ चांगदेव , २ वटेश्वर चांगा , ३ चक्रपाणी , ४ चांगासिद्ध , ५ शिवयोगी चांगा , ६ मणी सिद्धचांगा , ७ अनकर चांगा , ८ नाहमा , ९ नागेश , १० मुघेश , १११ सत्यसिद्ध चांगा , १२ निश्चलदास , १३ चिंधादवीचांगा व १४ वुटीचांगा ( निळोवाचा नाथा )

चौदा नांवें चित्रगुप्ताचीं - १ यम , २ धर्मराज , ३ मृत्यु , ४ अन्तक , ५ वैवस्वत , ६ काल , ७ सर्वभूतक्षय , ८ औदुम्बर , ९ दघ्नाय , १० नील , ११ परमोष्ठिन् ‌‍ , १२ वृकोदर , १३ चित्र आणि १४ चित्रगुप्त ( क्षत्रियांचा इतिहास )

चौदा नांवें मूळमायेचीं - १ चैतन्य , २ गुणसाम्य , ३ अर्धनारी - नटेश्वर , ४ षड्‌‍गणेश्वर , ५ प्रकृतिपुरुष , ६ शिवशक्ति , ७ शुद्धसत्त्व , ८ गुण - क्षोमिणी , ९ सत्त्व , १० रज , ११ तम , १२ मन , १३ माया आणि १४ अंतरास्मा .

मन माया अंतरात्मा । चौदा जीनसांची सीमा ।

विद्यमान ज्ञानात्मा । इतुकें ठाई ( दा . बो . २० - ५ - १० )

चौदा पत्री ( अनंत पूजेस )- १ अपमार्ग , २ जाई , ३ मोगरा , ४ जास्वंद , ५ विष्णुक्रांत , ६ शतपत्र , ७ अश्चत्थ , ८ औदुंबर ९ आंबा , १० वड , ११ पारिजात , १२ करवीर , १३ आवळी व १४ केतकी ,

चौदा परम भागवत ( पुराणान्तर्गत )- १ प्रह्लाद , २ नारद , ३ पराशर , ४ पुंडरीक , व्यास , ६ अंबरीष , ७ शुक्र , ८ शौनक , ९ भीष्म , १० दाल्भ्य , ११ अर्जुन , १२ रुक्मांगद , १३ वसिष्ठ व १४ विभीषण ,

चौदा पार्षदगण श्रीविष्णूचे - १ नंद , २ सुनंद , ३ बल , ४ प्रबल , ५ आर्हण , ६ विधाता , ७ जय , ८ विजय , ९ चंड , १० प्रचंड , ११ मद्र , १२ सुमद्र , १३ कुसुद व १४ कुमुदाक्ष ,

चंड प्रचंड सुशीला मद्र सुमद्र , पुण्याशील ।

कुमुद कुमुदाक्ष सकळ हा पार्षदमेळ श्रीहरीचा ॥ ( चतुः श्लोकी भागवत )

चौदा पुष्पें ( अनंत पूजेस )- १ पद्म , २ जाति , ३ चंपक , ४ कल्हार , ५ केतकी , ६ बकुळ . ७ शतपुष्प , ८ पुंनाग , ९ करवीर , १० धत्तुर , ११ कुंद , १२ मल्लिका , १३ मालती व १४ कर्णिका . हीं चौदा पुष्पें अनंत पूजेस लागतात .

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP