मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ७

संकेत कोश - संख्या ७

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


सात उपाय - १ साम , २ दाम , ३ भेद , ४ दंड , ५ मंत्र , ६ औषधि व ७ इंद्रजाल . ( मंत्रविद्या )- हे सात उपाय राजनीतिशास्त्रांत सांगितले आहेत . ( म . भा . सभा . ५ - २२ ).

सात कसोटया ( ग्रंथतात्पर्यनिर्णयाच्या )- १ आरंभ , २ शेवट , ३ अभ्यास म्हणजे पुनरुक्ति किंवा वारंवार काय सांगितलें आहे हें पाहणें , ४ अपूर्वता , ५ फल ( ग्रंथाच्या अभ्यासाचा वाचकांवर घडलेला परिणाम ), ६ अर्थवाद ( पोकळ स्तुति ) आणि ७ उपपत्ति ( तर्कशुद्ध विचारसरणी ).

उपक्रमोपसंहारौ अभ्यासोऽपूर्वता फलम् ‌‍ ।

अर्थवादोपपत्ती च लिंगं तात्पर्यनिर्णये ॥ ( गी . र . २१ ).

सात कारणें ( पापाचीं )- १ प्रगतीचा रूढ मार्ग बंद होणें , २ मद्य - पान , ३ क्रोधी स्वभाव , ४ जुगार , ५ कामाकडे लक्ष लागेनासें होणें , ६ हीन माणूस थोर हुद्यावर येणें आणि ७ आळस वाढणें , हीं पापाकडे प्रवृत्ति होण्याचीं सात कारणें आहेत . ( ऋग्वेद ७ - ८६ - ६ )

सात काल विभाग - १ अयन , २ ऋतु , ३ मास , ४ पक्ष , ५ दिन ६ रात्र आणि ७ मुहूर्त .

सात कार्य मर्यादा यज्ञाच्या - १ स्थूल शरीर , २ वासनाशरीर , ३ बहिर्मानस शरीर , ४ अन्तर्मानस शरीर , ५ बुद्धि , ६ परशुद्धि आणि ७ जीव . यज्ञकार्य या सा मर्यादांदध्यें होतें . मनुष्याच्या कार्याच्या याच मर्यादा आहेत . ( पुरुषपूक्त स्पष्टीकरण )

सात कुलीन लक्षणें - १ तप , २ इंद्रियदमन , ३ अध्ययन , ४ अध्यापनादि कर्में , ५ पवित्र विवाह , ६ सतत अन्नदान आणि ७ सदाचरण .

सात कोंकणें ( महाराष्ट्राचीं )- १ लाट , २ डांग , ३ शूर्पारक , ४ अष्टागर , ५ तळकोंकण , ६ गोमांतक आणि ७ वनवासी .

साअ कोंकणें ( सह्याद्रीचीं )- ( अ ) १ कूपक , २ केरळ , ३ मूषक , ४ आळूक , ५ पशु , ६ कोंकण आणि ७ परकोंकण . ( प्रपंच ह्रदय )

( आ ) १ केरळ , २ तुलंग , ३ सौराष्ट्र , ४ कोंकण , ५ करहाट , ६ कर - नाटक व ७ बर्बर .

" इत्येते सप्तदेशा वै कोंकणाः परिकिर्तिताः " ( सह्याद्रि खंड )

सात गुण ऋषींचें - १ दीर्घजीवन , २ मंत्रसाक्षात्कार , ३ शापानुग्रह - शक्तित , ४ दिव्यद्दष्टि , ५ प्रबुद्धता , ६ धर्म प्रत्यक्ष दिसणें आणि ७ गोत्रप्रवर्तन .

सात गुण दूतास आवश्यक - १ कुलीनत्व , २ कुटुंबवत्सलता , ३ भाषणचातुर्य , ४ दक्षता , ५ प्रियभाषित्व , ६ स्मरणशक्ति व ७ सांगितलें असेल तेंच बोलणें .

कुलीनः कुलसंपन्नो वाग्मी द्क्षः प्रियं वचः ।

यथोक्तवादी स्मृतिमान्दूतः स्यात्सप्तभिर्गुणैः ॥ ( म . भा . शांति . ८५ - २९ )

( आ ) १ गुणी , २ शुद्ध ३ चातुर्यनिपुण , ४ अवगुणरहित , ५ क्षमाशील , ६ बुद्धिमान् ‌‍ व ७ शत्रूचें मर्म जाणणारा . ( तुलसी . रामायण - टीप )

सात गुण वक्ता व श्रोता या उभयतांसहि आवश्यक - १ सिंहाव - लोकन , २ वश्यमाण , ३ उपमा , ४ रूपक , ५ विशेषण , ६ उपक्रम व ७ उपसंहरण , ’ हे सप्तगुण उभयांसी ॥ ’ ( हरिवरदा १ - ७७५ )

सात गुण ( वधूचे )- १ कुल , २ शील , ३ शरीर , ४ वय , ५ विद्या , ६ वित्त आणि ७ सनाथता .

सात गुण ( वराचे )- १ कुल , २ शील , ३ पालक , ४ विद्या , ५ द्रव्य , ६ शरीर आणि ७ वय .

कुलं च शीलं च वयश्च रूपं विद्यां च वित्तं च सनाथतां च ।

एतान् ‌‌ गुणान् ‌‍ सप्त परीक्ष्य देया कन्या बुधैः शेषमचिंतनीयम् ‌‍ ॥ ( सु . )

सात गुण ( सन्मित्राचे )- १ प्रामाणिकपणा , २ औदार्य , २ शौर्य , ४ सुखदूःखांत समरसता , ५ प्रेम , ६ दक्षता व ७ खरेपणा .

शुचित्वं त्यागिता शौर्यं सामान्यं सुखदुःखयोः ।

दाक्षिण्यं चानुरक्तिश्च सत्यता च सुहृद्‌‌गुणाः । ( हितो . )

सात गुण ( क्षत्रियाचे )- १ शौर्य , २ तेजस्विता , ३ मनोधैर्य , ४ कर्तव्यजागरुकता , ५ युद्धपराङ्‌‍मुख न होणें , ६ दातृत्व आणि ७ शासन - प्रभुत्व . ( भ . गी . १८ - ४३ )

सात गुरु - १ मातापिता , २ सुईण , ( लेकरू असतांना न्हाऊंमाखूं घालते ), ३ विद्यागुरु , ४ उपाध्याय , ५ ज्योतिषी , ६ मंत्र देणारा आणि ७ मोक्षदाता सद‌‍गुरु . ( सि . बो . ५० - १८ )

सात गोष्टींत अतिरेकानें विनाश - १ व्यायाम , २ जागरण , ३ प्रवास , ४ स्त्रीसमागम , ५ अतिहास्य , ६ अतिबडबड व ७ कोणतेहि अतिरिक्त साहस .

व्यायामजागराध्वस्त्रीहास्यभाष्यातिसाहसम् ‌‍ ।

गजं सिंह इवाकर्षन ‌‌ भजन्नपि विनश्यति ॥ ( वाग्भट अ . २२ - ३ )

सात गोष्टींत अनृत भाषण निंद्य होत नाहीं - १ स्त्रीला वश करतांना , २ विनोदप्रसंगीं , ३ विवाह , ४ उपजीविकेचें साधन मिळवते वेळीं , ५ प्राणसंकट साल्यावेळीं , ६ गोब्राह्मणहितार्थ व ७ एखाद्याची हिंसा टाळण्यासाठीं .

स्त्रीषु नर्म विवाहे च वृत्त्यर्थे प्राणसंकटे ।

गोब्राह्मणहितार्थे हिंसायां नानृतं स्याज्जुगुप्सितम् ‌‍ ॥ ( भा . ८ - १९ - ४३ )

सात गोष्टींत श्रीमद्भागवताचें सार - १ श्रीकृष्णजन्मकथन , २ श्रीकृष्णाचें बालपण , ३ पूतनावध , ४ गोवर्धन पर्वत उचलुन धरिला , ५ कंसवध , ६ कौरबांचा निःपात आणि ७ पांडवांचा प्रतिपाळ . ( भागवत )

सात गोष्टी प्रकट करूं नयेत - १ सिद्धमंत्र , २ औषध , ३ दानधर्म , ४ गृहच्छिद्र , ५ मैथुन , ६ पाकदोष व ७ निंद्यगोष्ट .

सिद्धमन्नौषधं धर्मं गृहच्छिद्रं च मैथुनं ।

कुभूक्तं कुश्रुतं चैव मतिमान् ‌‍ न प्रकाशयेत् ‌‍ ॥ ( बुधभूषणा )

सात गोष्टी विद्यासंपादनांत विध्न आणणार्‍या - १ आळस , २ उद्धटपणा , ३ दुश्चित्तपणा , ४ गप्पेबाजी , ५ घुम्मेपणा , ६ स्वतःला सगळें येतें असा अभिमान आणि ७ दुराग्रह , ( म . भा . उद्योग . ४० - ५ )

सात गोष्टी श्रद्धेय व भावनेप्रमाणें फल देणार्‍या होत - १ मंत्र , २ तीर्थ , ३ ब्राह्मण , ४ देव , ५ ज्योतिषी , ६ औषधी व ७ गुरु .

मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ ।

याद्दशी भावना यस्य सिद्धिर्मवति ताद्दशी ॥ ( पंचतंत्र )

सात गोष्टी सेवेला आवशयक - १ विश्वास , २ पतिव्रता , ३ गौरव , ४ संयम , ५ शुश्रूषा , ६ प्रेम आणि ७ मधुर भाषण ,

सात ग्रामवासी प्राणी - १ गाय , २ शेळी , ३ मेंढी , ४ मनुष्य , ५ घोडा , ६ खेचर आणि ७ गाढव .

गौरजानि मनुष्यश्च अश्चाश्वतरगर्दमः ।

एते ग्राम्याः समाख्याताः पशवः सप्त साधुभिः ॥ ( म . भा . भीषम . )

साती ग्रंथ - १ शिशुपापवध , २ एकादशस्कंद , ३ नरेंद्र - रुविमणी स्वयंवर , ४ वत्सहरण , ५ रिद्धपूरवर्णन , ६ सह्माद्रिवर्णन व ७ ज्ञानप्रबध . महानुभाव सांप्रदायाच्या या सात ग्रंथांना म्हणतात . ( महानुभावीय मराठी वाङमय )

सात तत्त्वें जगाचा आधार असलेलीं - १ पृथ्वी , २ आप , ३ तेज , ४ वायु , ५ आकाश , ६ तन्मात्रा आणि ७ महत्तत्त्व . हें जग या सात तत्त्वांच्या आधारें चाललेलें आहे . ( अथर्व - अनु - मराठी )

सात ताप ( क्लेश ) विद्वानांना होणारे - १ आधिभौतिक , २ आधिदैविक आणि ३ आध्यात्मिक हे तीन सर्व साधारणांसहि होणारे पण ( अपमानाचें मय ) ६ विस्मय ( चूकभूल होण्याची चिंता ) आणि ७ गर्व - विद्वत्तेचा अभिमान ( कल्याण नंवबर १९६२ )

सात तारा वीणेच्या - १ मध्यम ( मध्यसप्तक ), २ - ३ षड्‌‍ज जोड ( मध्यसप्तक ), ४ खर्ज , ५ मध्यम ( तारसप्तक ), ६ पंचम ( तारसप्तक ),

व ७ षड्‌‌ज् ‌‍ ( तारसप्तक ).

सात ताल ( संगीत शास्त्र )- गायनांत तालाला महत्त्व आहे . असे सात ताल आहेत ते - १ ध्रुवताल - आडाचौताल , २ मठय - सुरफाक , ३ रूपक - दादर , ४ झंपा - झपताल , ५ त्रिपुट - तेवरा , ६ अठताल - दीपचंदी व ७ एकताल - धुमाळी - केरवा .

अठतालैकतालौ च सप्त तालाः प्रकीर्तिताः ॥ ( संगीत प्रवेश )

सात तामसी विद्या - १ जारण , २ मारण , ४ मोहन , ४ उच्चाटन , ५ आकर्षण , ६ वशीकरण व ७ स्तंमन ( तत्त्व - निज - विवेक )

सात देवता सिद्धि देणार्‍या - १ नृसिंह , २ राम , ३ विष्णु , ४ शंकर , ५ अंबिका , ६ गजानन आणि ७ गुरु .

नृसिंहरामौ विष्णुश्च शंकर श्वांबिका तथा ।

गजाननो गुरुश्चैव सप्तैते सिद्धमंत्रदाः ॥ ( सु . )

सात दोष ( वधूचे बाबतींत )- १ भुरे केस असलेली , २ अधिक अवयवांची , ३ असाध्य रोगग्रस्त , ४ मुळींच केस नसलेली , ५ अति केस असलेलि , ६ वाचाळ आणि ७ मांजरासारखे डोळे असलेली .

नोद्वहेत् ‌‌ कपिलां कन्यां नाधिकाङ्रीं न रोगिणीम् ‌‍ ।

नालोमिकां नातिलोमां न वाचालां न पङ्रींलाम् ‌‍ ॥ ( मनु . ३ - ८ )

सात दोष ( स्त्रियांच्या बाबतींत )- १ अनृत , २ साहस , ३ माया . ४ मूर्खत्व , ५ अति लोभ , ६ अशुचिता व निदर्यत्व .

अनृतं साहंस माया मूर्खत्वमतिलोभता ।

अशौचं निर्दयत्वं च स्त्रीणां दोषाः स्वभावजाः ॥ ( देवी भाग . )

सात द्वारें ( उच्चार न करितां खोटें सांगण्याचीं )- १ दोन डोळे , २ दोन कान , ३ दोन नाकपुडया व एक मुख . या सात द्वारांनीं मनांतील उद्देश खरा किंवा खोटा सांगता येतो . डोळे मिचकावणे , कानांवर हात ठेवणें , नाक वांकडें करणें , वगैरे प्रकारांनीं खोटें सांगतां अगर कळवितां येतें . ( राम . गी . १५ - ५७ )

सात निसर्गाचीं औधधें - १ अन्न , २ पाणी , ३ हवा , ४ सूर्य किरणें , ५ विश्चांति , ६ स्वच्छता व ७ व्यायाम ( अकं शास्त्र )

सात पद्धति ( द्रव्य मिळविण्याच्या )- १ दाय - वडिलर्जित धन , २ लाभ - निधि प्राप्त होणें , ३ क्रय - व्यापार , ४ जय ( विजय ), ५ प्रयोग - व्याजबट्टा , ६ प्रत्यवरोहण आणि ७ अष्टकाहोम .

सात पाकयज्ञसंस्था - १ स्थालीपाक ( पार्वण ), २ अष्टका - ३ अमाश्राद्ध ( मासिक श्राद्ध ) ४ औपासन होम , ५ श्रावणी , ६ आग्रहायणी व ७ चैत्री ( शूलगव ). या सातपाकयज्ञसंस्था होत . आर्यांचे संस्कार ( पूर्वार्ध )

सात पिण्डफल वृक्ष - १ खजूर , २ ताड , ३ शिंदी , ४ ताल , ५ खजूरी , ६ पोफळ व ७ माड . हे सात पिंडासारखीं फळें असलेले वृक्ष होत .

खर्जूरस्तालहिंतालौ ताली खर्जूरिकास्तथा ।

गुवाका नारिकेलश्च सप्त पिण्डफलद्रुमाः ॥ ( सु . )

सात पूजेचीं अधिष्ठानें - १ प्रतिभा , २ स्थंडिल , ३ अग्नि , ४ सूर्य , ५ उदक , ६ हृदय व ७ ब्राह्मण , ( ब्रह्मज्ञानी ) ( भाग ११ - २७ - ९ )

सात प्रकारचे ऋषि - १ देवर्षि , २ ब्रह्मर्षि , ३ रजर्षि , ४ महर्षि , ५ परमर्षि , ६ श्रुतर्षि आणि ७ कांडर्षि .

सात प्रकार ऋषिगणांचे - १ ब्रह्मर्षि - भृगु , अंगिरा इ ., २ देवर्षि - नारद , पर्वत इ ., ३ महर्षि - व्यास , वसिष्ठ इ ., ४ परमर्षि - पराशर , भेल इ ., ५ तै . सं . च्या पांच कांडाचे द्र्ष्टे ते कांडर्षि , ६ श्रुतर्षि - सुश्रुत , चरक इ . व ७ राजर्षि - ऋतुपर्ण . ( संस्कृति कोश )

सात प्रकार जाणिवेचे - १ क्रोध , २ लोंभ , ३ मोह ४ मद , ५ मत्सर , ६ आनंद आणि ७ दुःख ( ज्ञानेश्वरी अ . १२ )

सात प्रकारचे गुरु - १ गुरु , २ माता , ३ पिता , ४ सूर्य ५ चंद्र , ६ अग्नि आणि ७ मंत्रदाता . हे सात प्रकारचे गुरु होत .

’ मन्त्रदाता गुरुः ख्यातः सप्तमः परिकीर्तितः ॥ ’

सात प्रकारचे जल - १ आसिजल , २ मासीजल , ३ महीजल , ४ अहीजल , ५ पाण्याजल , ६ वंजालजल आणि ७ ? सृष्टीच्या उत्पत्तिकालीं जल उत्पन्न झालें तेव्हां असें सात प्रकारचें जल होतें अशी गोंडी लोककथा आहे . ( प्रतिष्ठान . १९५४ )

सात प्रकार तांडव नृत्याचे - १ आनंद तांडव , २ प्रदोष तांडव , ३ कालिका तांडव , ४ त्रिपुर तांडव , ५ गौरी तांडव , ६ ऊर्ध्व तांडव व ७ संहार तांडव ( शैवागम )

सात प्रकारचे दर्भ - १ दर्भ , २ काश ( एक प्रकारचें गवत ), ३ दुर्वा , ४ सातूचीं पानें , ५ व्रीहि , ६ मोळ व ७ पांढरसाळ .

कुशाः काशास्तथा दूर्वा यवपत्राणि व्रीहयःअ ।

बल्वजाः पुण्डरीकाश्च कुशाः सप्त प्रकीर्तिताः ॥ ( पद्म . सृष्टि , ४९ - ३६ )

सात प्रकारचीं दानें - १ अन्नदान , २ संपत्तिदान , ३ भूदान , ४ बुद्धिदान , ५ श्रचदान , ६ रक्तदान व ७ जीवदान .

सात प्रकार दीक्षेचे - १ क्रियावती , २ कलावती , ३ वर्णमयी , ४ वेधमयी , ५ मंत्री , ६ आणवी व ७ शांमवी . ( प्रसाद )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP