मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
अजुनि तारि नरा करी सुविचा...

मानसगीत सरोवर - अजुनि तारि नरा करी सुविचा...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


अजुनि तारि नरा करी सुविचार ॥

त्यागुनि दुष्ट विचार ॥अजु०॥धृ०॥

आयुष्य सारे पळ पळ गेले ॥

गर्दभापरि व्यर्थ जाहले ॥

मृत्यु जरी करि ठार ॥अजु०॥१॥

कामा झाडी क्रोधा तोडी ॥

अहंकार तो उलथुनि पाडी ॥

देउ नको त्या थार ॥अजु०॥२॥

अज्ञानाचे भस्म करावे ॥

ज्ञानस्वरूपी मन विचरावे ॥

सोडुनि माया नार ॥अजु०॥३॥

लक्षचौर्‍याशी फिरुनी आला ॥

दुर्लभ नरतनु ब्राह्मण झाला ॥

पशुसम करि व्यवहार ॥अजु०॥४॥

भव हा अपुला व्यर्थ न जावा ॥

म्हणुनी कृष्णा प्रार्थी देवा नमुनी वारंवार ॥अजु०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 31, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP