मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
चला जाउ पाहु तया चला जाउ ...

मानसगीत सरोवर - चला जाउ पाहु तया चला जाउ ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


चला जाउ पाहु तया चला जाउ पाहु तया ॥

पंढरिचा देवराया ॥धृ०॥

विप्र पुंडलिका घरी ॥

घेइ धाव वेगे हरी ॥

युगे अठ्ठाविस वरी ॥

तिष्ठे विटे राहुनिया ॥ चला०॥१॥

दोन्हि पाणि ठेउनि कटी ॥

उभा चंद्रभागातटी ॥

पाहे वाट भक्तासाठी ॥

साधु संतांचि माया ॥चल०॥२॥

चरण सुंदर किती ॥

प्रेमे चुरित राधा सती ॥

गळा माळ वैजयंती ॥

भाळि बुका लाउनिया ॥चला०॥३॥

शोभे तुळसिहार गळा ॥

भाळि कस्तुरिचा टिळा ॥

दाव करुनि सगुण लिला ॥

भक्ता साह्य होऊनिया ॥चला०॥४॥

सोसवेना भवव्यथा ॥

ऐक रुक्मिणीच्या नाथा ॥

नेइ माहेरासि अता ॥

कृश झालि बहुत काया ॥चला० ॥५॥

भक्त कितिक उद्धरिले ॥

नाहि गणित कोणि केले ॥

ऐसे पांडुरंग भले ॥

कृष्णा लीन झालि पाया ॥चला०॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP