TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
जय जय श्री गुरुदत्ता ॥ ...

मानसगीत सरोवर - जय जय श्री गुरुदत्ता ॥ ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.

दत्ताचे गाणे

जय जय श्री गुरुदत्ता ॥

तुजवाचुनि मजला कोणी न त्राता ॥जय०॥धृ०॥

काय करू समजेना ॥ भवपुरितुनि कशि सुटू हे उमजेना ॥

हे मन भजन भजेना ॥ माझे म्हणुनी धावते विषय त्यजीना ॥

नामामृत पाजी पान्हा ॥ मी चातक तू मेघ अत्रिनंदना जय०॥१॥

तोषविले स्वजनासी ॥ नाही शांती क्षमा दया मनासी ॥

केवळ पातकराशी ॥ धक्का लाविला माउलीउदरकमळासी ॥

अत्रिसुता तेजोराशी ॥ सोडी अनुसूयानंदना भवाब्धीसी ॥जय०॥२॥

मी वत्स तू धेनू दत्ता ॥ मी पाडस तू हरिणी भासे मम चित्ता ॥

मी बालक तू माता ॥ नाही तुजसम त्रिभुवन शोधुनि पहाता ॥

थकली श्रुति वेद गाता ॥ तेथे काय ही कृष्णा गाईल गाथा ॥जय०॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-29T21:14:27.5630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धवळा

  • पु. १ एक गाण्याचा प्रकार . ढवळा - ळे पहा . लग्नप्रसंगी धवळे , ढवळे म्हणण्याची कांही जातीत चाल आहे . चहूंदेही धवळा गाइली चित्काळा । - दावि ३७ . महानुभवी धवळे बरेच उपलब्ध आहेत . श्री चक्रधराचे शिरी धरौनिया श्रीचरणु धवळे गाइजताये । - धवळे पूर्वार्ध १ . २ ( गो . ) गप्पागोष्टी ; चकाट्या . [ धवल ] धवलारा - स्त्री . ( आगरी ) लग्नसमारंभात गाणे म्हणणारी स्त्री . - बदलापूर ३५ . 

RANDOM WORD

Did you know?

Gharamadhye Shriramachi ani marutichi pooja karavi ka ? baykani keli tar chalate ka ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site