TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
श्रीरामाचे अन -हित चिंती ...

मानसगीत सरोवर - श्रीरामाचे अन -हित चिंती ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


मंथरा

श्रीरामाचे अन-हित चिंती कइकइ सखि मंथरा ॥

राज्यारूढ होइल हा म्हणुनी द्वेष धरुनि अंतरा ॥

दण दण दण दण चरण अपटुनी ये कैकेयि-मंदिरा ॥

अभागिणी तू खचित खरीगे विकल्प नाही जरा ॥

वरि वरि तुजला प्रेम दाखवी नृपवर कपटी खरा ॥

कुलगुरु मंत्री जन पाचारुनि राज्य देत रघुविरा ॥चाल॥

पाठउनि भरत मातुळा ग ॥

नाकळत कापिला गळा ग ॥

काय करशिल तू ह्या वेळा ग ॥

प्रथम बुद्धिचा नाश पावशिल जाइल कार्य नासुनी ॥

तुझ्या हिताची गोष्ट कोणगे सांगेल मजवाचुनी ॥

दासि मंथरे ऐसी संगत करू नये कधि कुणी ॥

नाश आपुला जगात हासे होइल खचितचि झणी ॥धृ०॥१॥

काय मंथरे विपरित वदसी तुजसि कळेना कसे ॥

राम-लक्ष्मण-भरत-शत्रुहन सर्वहि मज प्रिय असे ॥

कौसल्येहुन माझि मान्यता नृपवर राखीतसे ॥

नाहि न्यूनता एक पदार्था लागले तुजला पिसे ॥

दैत्य-गुरूच्या युद्धसमयि नृप स्वर्गी मज नेतसे ॥

उभय वीर ते झुंजत असता अवचित घडले कसे ॥चाल॥

रथ-चक्र मोडले जरि ग ॥

कर घालुनि दृढ मी धरि ग ॥

सावरिला रणकंदरि ग ॥

युद्ध अटपता अवलोकी नृप चकित मनी होउनी ॥

प्राणप्रिये मम प्राण अक्षिले इच्छित घे मागुनी ॥दासि मंथरा०॥२॥

मांस-अहारा सिंहबालका घालुनि जो रक्षितो ॥

रात्रंदिन परि जतन करीत्या कधि न कधी भक्षि तो ॥

बाळ नव्हे काळ समज तू राम राजिवाक्ष तो ॥

मधुर मधुर तुजसवे बोलुनी राज्य कार्य लक्षितो ॥

ज्येष्ठ-सवति-सुत राज्यि बैसता होय श्रेष्ठ पक्ष तो ॥

वृद्ध पतीच्या मागे तुम्हा कोण सांग रक्षितो ॥चाल॥

म्हणे दासि ऐक तू जरा ग ॥

येईल नृपति मंदिरा ग ॥

घे मागुन मागिल वरा ग ॥

प्रथम वराने धाडि रघुविरा वल्कल वेष्टुन वनी ॥

दुज्या वराने तुझा भरत ग बसवी सिंहासनी ॥दासि०॥३॥

आधिच मर्कट तशांत मदिरारस ओतुनिया मुखी ॥

त्यात मंथरा दंश करी त्या कैकयिसी वृश्चिकी ॥

बरी युक्ति योजिली म्हणुनिया आलिंगी प्रिय-सखी ॥

रत्‍न-हार तो काढुनि घाली कंठि तिच्या कौतुकी ॥

विकल्प शिरला कैकयि-ह्रदयी बनलि खाण-पातकी ॥

दुःसंगतिने मारुनि पतिला करि अपुला घात की ॥चाल॥

अपवाद जगीजोडिला ग ॥

सौभाग्य-चुडा फोडिला ग ॥

श्रीराम वना धाडिला ग ॥

अन्य रूप मम-ह्रदयि नसावे श्रीरामावाचुनी ॥

सत्संगति ही मागे कृष्णा नित्य मनापासुनी ॥दासि०॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-30T21:17:01.8070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दशदिशा मोकळ्या असणें

  • कोठेंहि संचार करणें 
  • वाट फुटेल तिकडे जाणें 
  • स्वैर संचार करणें. 
RANDOM WORD

Did you know?

How do I become a moderator on QnA?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site