मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
प्रातःकाल हा होय सुंदर ऊठ...

मानसगीत सरोवर - प्रातःकाल हा होय सुंदर ऊठ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


प्रातःकाल हा होय सुंदर ऊठ हरि उदयाचली ॥

म्हणे यशोदा ऊठ मुकुंदा पाहि निशा ही संपली ॥धृ०॥

दिनमणी हा पळ पळ वाढे तेज चढे नभमंडळी ॥

वृषभार हा घेउनि कृषिवल नित कृत्याते चालले ॥प्रात०॥१॥

पहा हरी हा उदय जाहला धेनु वत्से हंबरली ॥

पात्र घेउनि धार काढुनी धेनु ने यमुना-जली ॥प्रातः०॥२॥

हंस सारि कोकील शुकादी गगनमंडळा ऊडले ॥

जाति त्वरे गोपाल घेउनि धेनुबंधना सोडिले ॥प्रातः०॥३॥

संमार्जन सारुनी कामिनी काढिति सुंदर रांगुळी ॥

ब्रजांगना शृंगार सुशोभित चालल्या यमुना-जळी ॥प्रातः०॥४॥

पलांडु मर्दुनि तिखट बनविले केलि उनोनित भाकरी ॥

दही दूध नवतीत साखर घेउनि लौकर जा हरी ॥प्रातः०॥५॥

घेइ कावळा यष्टि-पादुका घेइ शिदोरी बांधिली ॥

गोप घेउनि जा कुंजवनि वाजवि सुसर बासुरी ॥प्रातः०॥६॥

यदूनायका आलि राधिका उठे लगबगा श्रीहरी ॥

करांजुलि जोडोनि कृष्णाबाई विनवी निजांतरी ॥प्रातः०॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP