TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
चल , मना अम्हि जाऊ या ॥ ...

मानसगीत सरोवर - चल , मना अम्हि जाऊ या ॥ ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


गुरूची भेट

चल, मना अम्हि जाऊ या ॥

श्रीगुरुदर्शन घेऊ या ॥

अनन्य भावे शरण रिघूनी तन-मन-धन हे अर्पू या ॥धृ०॥

काम क्रोध घालवु या ॥

मदमत्सरा हालवू या ॥

वरिवरि उठती विकल्प ह्रदयी त्यांना त्वरितचि मालवून ॥चल०॥१॥

दशइंद्रिये झिजवू या ॥

जन्ममरण अह्मि बुजवू या ॥

भवपाशातुनि मुक्त होउनी अलिप्त जगि अम्हि राहू या ॥चल०॥२॥

वासनेला खणू या ॥

कामनेला हणू या ॥

दुर्बुद्धीला त्वरित दवडुनी भक्ती संगे घेऊ या ॥चल०॥३॥

मायेला अम्हि चिरू या ॥

दयेला अम्हि वरू या ॥

मन्मथासि त्या त्वरित दवडुनी भावा संगे घेऊ या ॥चल०॥४॥

शांती मैत्रिण करू या ॥

स्वानंदाने भरू या ॥

मीतुपणाचा गर्व हरूनी स्वेच्छे जगि अम्हि विवरू या ॥चल०॥५॥

अज्ञानाला जाळू या ॥

ज्ञानासंगे खेळू या ॥

काया वाचा मना अर्पुनी सद्गुरुचरणी लोळू या ॥चल०॥६॥

जागृतीत अम्हि राहू या ॥

स्वप्न सुषुप्ती पाहू या ॥

तुरिया लंघुनि म्हणते कृष्णा मोक्षपदासी जाऊ या ॥चाल०॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-30T22:24:54.6130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

after-cooler

  • पु. अनुशीतक 
  • अनुशीतक 
  • पु. अनुशीतक 
RANDOM WORD

Did you know?

जपाची संख्या १०८ का ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site