मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
वि धिकुमरी किति हि तुझी ध...

मानसगीत सरोवर - वि धिकुमरी किति हि तुझी ध...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


विधिकुमरी किति हि तुझी धन्य कुशलता ॥

जनजिव्हाग्री बसुनि अणिसि सगुणता ॥

अणिसि सगुणता ॥ विधि०॥धृ०॥

रंकाचा राव करिसि ज्ञान लाभता ॥

ज्ञानाने किति तरले नच ये वर्णिता ॥

अंत-पार न कळे तुझा सृष्टि शोधिता ॥

सगुण स्वरुप पाहुनि तुझे मनि ये रम्यता ॥विधि०॥१॥

किरिट कुंडल शोभति तुज मयुरवाहनी ॥

नृत्य करिसि कुशलत्वे मधुर गायनी ॥

भाळलासे शंकरसुत तुजसि पाहूनी ॥

प्रिया म्हणुनि वामांकी घेइ बसवुनि ॥विधि०॥२॥

मूढमती मी बाला तू कृपा करी ॥

दे सुस्वर कंठ मला ज्ञान झडकरी ॥

विनति असे सन्निध तुज पूर्ण ही करी ॥

नमि कृष्णाबाई तुला आप्त करि पुरी ॥विधि०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 29, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP