TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
संतांचा साह्यकारी पंढरिसी...

मानसगीत सरोवर - संतांचा साह्यकारी पंढरिसी...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


विठोबाचे गाणे

संतांचा साह्यकारी पंढरिसी पाहिला ॥

कटि पाणी ठेवुनीया स्थिर विटे राहिला ॥धृ०॥

नामदेवा घरी टोप्या अंगडी शीवतो ॥

सावत्याच्या घरी प्रेमे हार हा गुंफितो ॥

अंत्यजा चोख्यासंगे ढोरे हा ओढितो ॥

नाहि कवडी देत कोणी भक्तीने बांधिला ॥संताचा०॥१॥

तुकोबा वाणियाचा सवदा हा वीकितो ॥

कबीर बालकाचे शेले हा वीणितो ॥

रोहिदासागृहि जोडे प्रेमाने बांधितो ॥

नाथाच्या घरी स्कंधी जलघट वाहिला ॥संताचा०॥२॥

पतिसेवा करुनीया सखुसवत जाहला ॥

निराबाई कन्यकेचा विषप्याला प्राशिला ॥

जनिसंगे दळू कांडू हरि कैसा लागला ॥

दावि करुनी सगुण लीला प्रेमे म्या गाइला ॥संताचा०॥३॥

त्रिभुवन माउलीये हा जाच सोसेना ॥

त्रैलोक्यभार घेसी येऊ दे करुणा ॥

षट्‌शत्रू मत्त झाले बहु करिती जाचना ॥

किति अंत बघसि आता कृश देह जाहला ॥संताचा०॥४॥

बहु दीन झाले माते माहेर दाखवी ॥

निज दासा गरुडराया मज मूळ पाठवी ॥

दिनरजनी मन माझे तव लीला आठवी ॥

पदि लीन झालि कृष्णा ने वेगे विठ्ठला ॥संताचा०॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-30T20:54:59.3270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खालौता

  • क्रि.वि. खालती ; खाली . ' मुखें करुनि खालौतिं .' - रास . १ . ६७५ . 
RANDOM WORD

Did you know?

How do I become a moderator on QnA?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site