मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
घडि घडि रघुवीर दिसतो मला ...

मानसगीत सरोवर - घडि घडि रघुवीर दिसतो मला ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


घडि घडि रघुवीर दिसतो मला ॥

रघुवीर दिसतो मला ॥घडि०॥धृ०॥

उठता बसता गृह-कृत्य करिता ॥

सोडीना बाई मला ॥घडि०॥१॥

आसनी शयनी भोजनी पानी ॥

करि चापबाण धरिला ॥घडि०॥२॥

शामसुंदर मदनमनोहर ॥

पर्णूनी जानकिला ॥घडि०॥३॥

चरण-रजाचा अघटित महिमा ॥

उद्धरि अहिल्येला ॥घडि०॥४॥

शबर-सुतेसी पावन केली ॥

भक्षूनी बदरीफला ॥घडि०॥५॥

दशरथनंदना प्रार्थिते कृष्णा ॥

धरूनी पदकमला ॥घडि०॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP