TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
श्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ...

मानसगीत सरोवर - श्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


कौसल्येचे डोहाळे

श्री वसिष्ठ गुरुची आज्ञा वंदुनि आला ॥

तो राजा दशरथ कौसल्येच्या महाला ॥

स्थुलदेह ओसरीवरती नृपवर चढला ॥

देह सूक्ष्म माजघरि संशयात पडला ॥चाल॥

कारण कोठडीत पाहे नृपति तो ॥

महाकारण माडिवरि जाये त्वरित तो ॥

ही द्वारि उभी नच राहे म्हणत तो ॥

शोधिता परात्पर परसी पाहुन तिजला ॥

म्हणे रुसुन बसलि का निर्विकल्प छायेला ॥

डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला ॥

हे राजकुमारी काय आवडे तुजला ॥१॥धृ०॥

जे योगिजनांना योग साधिता न मिळे ॥

ते कौसल्येने पूर्णब्रह्म साठविले ॥

तिजजवळि बसूनी राजा दशरथ बोले ॥

पुरवीन कामना इच्छित वद या वेळे ॥चाल॥

ती निजानंद आनंदी रंगली ॥

ती द्वैतपणाची बोली विसरली ॥

तिशिगोष्ट विचारित राजा मागली ॥

आठवते तुला का वर्‍हाड बुडवुनि गेला ॥

पौलस्त्यनय तो मत्स्यमुखी दे तुजला ॥डोहाळे०॥२॥

बोल ते कुठे तो रावण भुज अपटोनी ॥

ती उठलि शत्रुचे नाम ऐकता श्रवणी ॥

म्हणे चापबाण दे दाहि शिरे उडवोनी ॥

मी क्षणात टाकिन कुंभकर्ण मारूनी ॥

त्या इंद्रजिताला बाणे जर्जर करूनी ॥

धाडीन यमपुरा बंधु साह्य घेवोनी ॥चाल॥

मम भक्त बिभीषण लंके स्थापुनी ॥

बंधमुक्त करिन सुर सारे या क्षणी ॥

धाडीन स्वर्गि सन्माने त्या झणी ॥

हे कार्य करिन मी पाळुनि ताताज्ञेला ॥

अधिव्याधि विरहित चालवीन राज्याला ॥डोहाळे०॥३॥

घे शशांकवदने नव रत्नाची माळा ॥

मी चाप भंगिता घालिल भूमीबाळा ॥

घे अननस अंबे द्राक्ष जांब या वेळा ॥

मी प्रिया शोधिता देइल शबरी मजला ॥चाल॥

घे दास दासि रथ घोडे सुंदरि ॥

हनुमंत दास तो माझ महिवरी ॥

नौकेत बैस जलक्रीडा तू करी ॥

प्रिय भक्त गुहक मज नेइल पर तीराला ॥

ही लाल पैठणी पांघर भरजरि शेला ॥डोहाळे०॥४॥

झडपली भुतांनी पंचाक्षरि कुणि आणा ॥

इशि नेउन दाखवा वैद्य बघुनि शाहाणा ॥

तव उदरी येइल वैकुंठीचा राणा ॥

अशिर्वाद दिले मज श्रेष्ठी नमिता चरणा ॥चाल॥

हे द्वारपाल गुरुजींना आणि तू ॥

मम ज्येष्ठ प्रियेची सांगे काहणि तू ॥

करुनिया बहुत सायास म्या क्रतु ॥

ऐकूनि दूत तो शीघ्र घेउनी आला ॥

त्या ब्रह्मसुताच्या वंदित नृप पदकमला ॥डोहाळे०॥५॥

मी पुत्रहीन तुज शरण असे गुरुराया ॥

करि कौसल्येला सावध आज लवलाह्या ॥

म्हणे वसिष्ठ बघुनी घाबरसी का वाया ॥

इज उदरि अवतरे खचित खचित प्रभुराया ॥चाल॥

मम सत्य सत्य ही वाणी मानि रे ॥

इसि पिशाच बाधा नाही जाणि रे ॥

हरि शंख चक्र शेषासह अवतरे ॥

चैत्र शुक्ल नवमिच्या दिवशि राम अवतरला ॥

ही कृष्णा दिन-निश रुंजि घालि पदकमला ॥डोहाळे०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-30T21:10:27.0200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उथाळा

  • पुस्त्रीन . उथळा पहा . खांबाच्या खालचा व वरचा दगड , लांकूड ; खांबाची बैठक ; तोळंबा . गोरियां सोने केळीं । कामौनि कीजेति खांब - उथाळीं ॥ - शिशु ७६४ . उथाळीं बैसला इन्द्रनीळे ॥ - मुआदि ३१ . १५ . पद्मरागाचे तोळंबे स्वयंभ । वरी दिव्य हिर्‍यांचे खांब । निळ्यांचीं उथाळीं सुप्रभ । उपमा नाहीं तयातें ॥ - ह २ . १७ . [ सं . उत + तल ] 
RANDOM WORD

Did you know?

What are the names for Ekadashi (11th day in fortnight)?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site