मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग| ७१७० ते ७१७९ विविध अभंग ६२४१ ते ६२४३ ६२४४ ते ६२६५ ६२६६ ते ६२८६ ६२८७ ते ६२८९ ६२९० ते ६२९१ ६२९२ ते ६३१० ६३११ ते ६३१७ ६३१८ ते ६३२४ ६३२५ ते ६३४८ ६३४९ त्र ६३५० ६३५१ ते ६३५३ ६३५४ ते ६३९५ ६३९६ ते ६४१४ ६४१५ ते ६४२५ ६४२६ ते ६४२७ ६४२८ ते ६४७८ ६९३५ ते ६९४३ ६९४४ ते ६९५० ६९५१ ते ६९५४ ६९५५ ते ६९६० ६९६१ ते ६९७९ ६९८० ते ७००५ ७००६ ते ७०२० ७०२१ ते ७०३० ७०३२ ते ७०५३ ७०५४ ते ७०५७ ७०५८ ते ७०६४ ७०६५ ते ७०६६ ७०६७ ते ७०७५ ७०७६ ते ७०८० ७०८१ ७०८२ ते ७१०८ ७१०९ ते ७११९ ७१२० ते ७१२५ ७१२६ ते ७१४५ ७१४६ ७१४७ ७१४८ ते ७१५६ ७१५७ ते ७१६० ७१६१ ते ७१६९ ७१७० ते ७१७९ ७१८० ते ७१८९ ७१९० ते ७२०० ७२०१ ते ७२१० ७२११ ते ७२२० ७२२१ ते ७२३४ नाटाचे अभंग - ७१७० ते ७१७९ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत नाटाचे अभंग - ७१७० ते ७१७९ Translation - भाषांतर ॥७१७०॥प्रथम नमन तुज एकदंता । रंगीं रसाळ वोढवीं कथा ॥ मति चौरस करीं प्रबळता । जेणें फिटे आतां अंधकार ॥१॥तुझिये कृपेचें भरितें । आणीक काय राहिलें तेथें ॥ मारग सिद्धाच्यानि पंथें । पावविसी तेथें तूं चि एक ॥२॥आरंभा आदि तुझे वंदन । सकळ करितां कारण ॥ देव ऋषि मुनि आदिकरुन । ग्रंथपुराण निर्माणी ॥३॥काय वर्णू तुझी गती । एवढी कैची मज मती ॥ दिनानाथ तुज ह्मणती । करीं सत्य वचन हें चि आपुलें ॥४॥मज वाहावतां मायेच्या पुरीं । बुडतां डोहीं भवसागरीं ॥ तुज वांचुनि कोण तारी । पाव झडकरी तुका ह्मणे ॥५॥॥७१७१॥प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार ॥ चतुर्भुज फरशधर । न कळे पार वर्णितां ॥१॥तो देव नटला गौरीबाळ । पांयीं बांधोनि घागर्या घोळ ॥ नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥२॥नटारंभीं थाटियला रंग । भूजा नाचवी हालवी अंग ॥ सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥३॥जया मानवती देव ऋषी मुनी । पाहातां न पुरें डोळियां धनी ॥ असुर जयाच्या चरणीं । आदी अवसानीं तो चि एक ॥४॥सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रुपा नाहीं पार ॥ तुका ह्मणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥५॥॥७१७२॥विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान ॥ विठ्ठल सिद्धींचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥१॥विठ्ठल कुळींचें दैवत । विठ्ठल वित्त गोत चित्त ॥ विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥२॥विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त हीं पाताळें भरुनी ॥ विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥३॥विठ्ठल जीवाचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोहळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेले चाळा विश्व विठ्ठलें ॥४॥विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता ॥ विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका ह्मणे आतां नाहीं दुसरें ॥५॥॥७१७३॥बर्वा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव ॥ दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण ॥ तुमचें झालिया दरुषण । जन्ममरण नाहीं आतां ॥२॥बरवें झालें आलों या ठाया । होतें संचित ठायींचा पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मींची ॥३॥जोडिलें न सरे हे धन । अविनाश आनंदघन ॥ अमृतमूर्ति मधुसूदन । सम चरण देखियेले ॥४॥जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचें ठेवणें ॥ लोपलें होतें पारिखेपणें । ठावचळण चुकविला ॥५॥आतां या जीवाचीया साठीं । न सुटे पडलिया मिठी ॥ तुका ह्मणे सिणलों जगजेठी । न लवीं दिठी दुसर्याची ॥६॥॥७१७४॥मी तंव अनाथ अपराधी । कर्महिन मतिमंदबुद्धी । तुज म्यां पाठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानिधी मायबापा ॥१॥नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥२॥केला करविला नाहीं उपकार । नाहीं दया आली पीडितां पर ॥ करुं नये तो केला व्यापार । वाहिला भार कुटुंबाचा ॥३॥नाहीं केलें तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड करचरण ॥ नाही संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मूर्तीचें ॥४॥असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय ॥ न कळे हित करावें तें । काय नये बोलूं आठवूं तें ॥५॥आप आपण्या घातकर । शत्रु झालों मी दावेदार ॥ तूं तंव कृपेचा सागर । उतरीं पार तुका ह्मणे ॥६॥॥७१७५॥आतां पावेन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें ॥ अवघें सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥१॥जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई ॥ सकळ गोताची च साई । पारिखें काई ऐसे नेणिजे ॥२॥जगदाकारीं झाली सत्ता । वारोनि गेली पराधीनता ॥ अवघे आपुलेचि आतां । लाज आणि चिंता दुर्हावली ॥३॥वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं ॥ करवी तैसें आपण करी । भीड न धरी चुकल्याची ॥४॥सोसिला होता सासुरवास । बहुतांचा बहुत दिवस ॥ बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥५॥करिती कवतुक लाडें । जम बोलविती कोडें ॥ मायबाप उत्तरें गोडें । बोले बोबडें पुढें तुका ॥६॥॥७१७६॥सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ती यत्न नाहीं केला ॥ हिंडतां दिशा सीण पावला । मायावेष्टिला जीव माझा ॥१॥माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी ॥ सज्जन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥२॥काय सांगों गर्भीची यातना । मज भोगितां नारायणा ॥ मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥३॥मज चालतां प्रयाणकाळीं । असतां न दिसती जवळी ॥ मृत्तिके मृत्तिका कवळी । एकले मेळीं संचिताचे ॥४॥आतां मज ऐसें करी गा देवा । कांहीं घडे तुझी चरणसेवा ॥ तुका विनवीतसे केशवा । चालवीं दावा संसारें ॥५॥॥७१७७॥अगा ए सावळ्या सगुणा । गुणनिधिनाम नारायणा ॥ आमची परिसा विज्ञापना । सांभाळीं दीना आपुलिया ॥१॥बहु या उदराचे कष्ट । आह्मांसि केलें कर्मभ्रष्ट ॥ तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥२॥झालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी ॥ न कळे कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥३॥येथें तों नये आठव कांहीं । विसांवा तो क्षण एक नाहीं ॥ पडिलों आणिके प्रवाहीं । हित तों कांहीं न दिसे चि ना ॥४॥जीवित्व वेंचिलें वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें ॥ कांहीं व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥५॥माझा मींच झालों शत्रु । कैचा पुत्र दारा कैचा मित्रु ॥ कासया घातला पसरु । अहो जगद्गुरु तुका ह्मणे ॥६॥॥७१७८॥आतां मज धरवावी शुद्धी । येथुनी परतवावी बुद्धि ॥ घ्यावें सोडवुनि कृपानिधी । सांपडलों संधीं काळचक्रीं ॥१॥करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई ॥ आपुले करुणेची खाई । करीं वो आई मजवरी ॥२॥मागील काळ अज्ञानपणें । सरला स्वभावें त्या गुणें ॥ नेणें आयुष्य झालें उणें । पुढील पेणें अंतरलें ॥३॥आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय ॥ येथें म्यां येउनि केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥४॥करुनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा ॥ आपुले नामीं घ्यावा प्रेमा । सोडवीं भ्रमापासुनियां ॥५॥हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपें चरणीं ॥ करुं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका ह्मणे ॥६॥॥७१७९॥जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन ॥ जगजीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥१॥जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरुनियां करीं ॥ पाउलें सम चि साजिरीं । अंतरीं धरोनि राहेन ॥२॥जो या असुरांचा काळ । भक्तजनप्रतिपाळ ॥ खेळे हीं लाघवें सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥३॥जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी ॥ रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥४॥जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा ॥ जयाचे गळां वैजयंतीमाळा । तया वेळोवेळां दंडवत ॥५॥जयाचें नाम पाप नासी लक्ष्मी ऐसी जयाची दासी ॥ तो हा तेज:पुंजरासी । सर्वभावें त्यांसी तुका शरण ॥६॥ N/A References : N/A Last Updated : June 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP