मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग| ६३२५ ते ६३४८ विविध अभंग ६२४१ ते ६२४३ ६२४४ ते ६२६५ ६२६६ ते ६२८६ ६२८७ ते ६२८९ ६२९० ते ६२९१ ६२९२ ते ६३१० ६३११ ते ६३१७ ६३१८ ते ६३२४ ६३२५ ते ६३४८ ६३४९ त्र ६३५० ६३५१ ते ६३५३ ६३५४ ते ६३९५ ६३९६ ते ६४१४ ६४१५ ते ६४२५ ६४२६ ते ६४२७ ६४२८ ते ६४७८ ६९३५ ते ६९४३ ६९४४ ते ६९५० ६९५१ ते ६९५४ ६९५५ ते ६९६० ६९६१ ते ६९७९ ६९८० ते ७००५ ७००६ ते ७०२० ७०२१ ते ७०३० ७०३२ ते ७०५३ ७०५४ ते ७०५७ ७०५८ ते ७०६४ ७०६५ ते ७०६६ ७०६७ ते ७०७५ ७०७६ ते ७०८० ७०८१ ७०८२ ते ७१०८ ७१०९ ते ७११९ ७१२० ते ७१२५ ७१२६ ते ७१४५ ७१४६ ७१४७ ७१४८ ते ७१५६ ७१५७ ते ७१६० ७१६१ ते ७१६९ ७१७० ते ७१७९ ७१८० ते ७१८९ ७१९० ते ७२०० ७२०१ ते ७२१० ७२११ ते ७२२० ७२२१ ते ७२३४ अभंग - ६३२५ ते ६३४८ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत स्वामींनीं ज्ञानेश्वरास पत्र लिहिले Translation - भाषांतर वरील अभंग व त्यांबरोबर दिलेला नारळ टाकून ब्राह्मण आळंदीस गेला त्यावर स्वामींनीं ज्ञानेश्वरास पत्र लिहिले ते अभंग.॥६३२५॥नको कांहीं पडों ग्रंथाचिये भरीं । शीघ्र व्रत करीं हेंचि एक ॥१॥देवाचिये चाडे आळवावें देवा । ओस देहभावा पाडोनियां ॥२॥साधनें घालिती काळाचिये मुखीं । गर्भवास सेखीं न चुकती ॥३॥उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा । पतनासी इच्छा अवश्यक ॥४॥रोकडी पातली अंगसंगे जरा । आतां उजगरा कोठवरी ॥५॥तुका ह्मणे घालीं नामासाठीं उडी । पांडुरंग थडी पाववील ॥६॥॥६३२६॥नाहीं देवापाशीं मोक्षाचें गांठोळें । आणूनि निराळें द्यावें हातीं ॥१॥इंद्रियांचा जय साधुनियां मन । निर्विषय कारण असे तेथें ॥२॥उपास पारणीं अक्षरांची आटी । सत्कर्मा शेवटीं असे फळ ॥३॥आदरें संकल्प वारीं अतिशय । सहज तें काय दु:ख जाण ॥४॥स्वप्नींच्या घायें विवळसी वांयां । रडे रडतियासवें मिथ्या ॥५॥तुका ह्मणे फळ आहे मुळापाशीं । शरण देवासी जाय वेगीं ॥६॥॥६३२७॥त्यजिलें भेटवी आणुनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥१॥आळवावें देवा भाकुनि करुणा । आपुलिया मना साक्ष करीं ॥२॥नाहीं जावें दुरुनि लागत । आहे साक्षभूत अंतरींचा ॥३॥तुका ह्मणे हा आहे कृपासिंधु । तोडी भवबंधुं तात्काळिक ॥४॥॥६३२८॥गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥२॥आनंदलें मन । प्रेमें पाझरती लोचन ॥३॥तुका ह्मणे आळी । जेवी नुरे चि वेगळी ॥४॥॥६३२९॥ज्याचें जया ध्यान । तें चि होय त्याचें मन ॥१॥ह्मणऊनि अवघे सारा । पांडुरंगा दृढ धरा ॥२॥सम खुण ज्याचे पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥३॥तुका ह्मणे नभा । परता अनूचा ही गाभा ॥४॥॥६३३०॥पाहुनियां ग्रंथ करावें कीर्तन । तेव्हां आलें जाण फळ त्याचें ॥१॥पढोनियां वेद हरिगुण गावे । ठावें तें जाणावें तेव्हां झालें ॥२॥तप तीर्थाटणें तेव्हां कार्यसिद्धी । स्थिर राहे बुद्धि हरिच्या नामीं ॥३॥यागयाज्ञादिक काय दानधर्म । तरि फळ नाम कंठीं राहे ॥५॥तुका ह्मणे नको काबाडाचे भरीं । पडों धरीं हें चि एक ॥५॥॥६३३१॥सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन ॥१॥त्याचें दिलें त्यासी । पावे फळ आपणासी ॥२॥आहे हा आधार । नाम त्याचें विश्वंभर ॥३॥नाहीं रिता ठाव । तुका ह्मणे पसरीं भाव ॥४॥॥६३३२॥संकोचोनि काय झालासी लहान । घेई अपोशण ब्रह्मांडाचें ॥१॥करोनि पारणें आंववे संसारा । उशीर उशीरा लावूं नको ॥२॥घरकुलानें होता पडिला अंधार । तेणें केलें फार कासावीस ॥३॥झुगारुनि दुरी लपविलें काखे । तुका ह्मणे वाखे कौतुकाचे ॥४॥॥६३३३॥माझ्या बापें मज दिधलें भातुकें । ह्मणोनि कौतुकें क्रीडा करीं ॥१॥केली आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हें ज्ञान आलें त्याचें ॥२॥घेऊनि विभाग जावें लवलाह्या । आलेति या ठाया आपुलिया ॥३॥तुका ह्मणे ज्ञानदेवीं समुदाय । करावा मी पाय येइन वंदूं ॥४॥॥६३३४॥ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां ॥१॥मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ॥२॥ब्रम्हादिक जेथें तुम्हां वोळंगणे । इतर तुळणे काय पुरे ॥३॥तुका ह्मणे नेणें युक्तीची ते खोली । ह्मणोनि ठेविली पायीं डोयी ॥४॥॥६३३५॥बोलिली लेकुरें । वेडी वाकुडीं उत्तरें ॥१॥करा क्षमा अपराध । महाराज तुह्मी सिद्ध ॥२॥नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥३॥तुका ह्मणे ज्ञानेश्वरां राखा पायांपे किंकरा ॥४॥॥६३३६॥काय तुह्मी जाणां । करु अव्हेर नारायणा ॥१॥तरी या लटिक्याची गोही । निवडली दुसरे ठायीं ॥२॥कळों अंतरींचा गुण । नये फिटल्यावांचून ॥३॥आणिलें अनुभवा । जनाच्या हें ज्ञानदेवा ॥४॥आणीक कोणी भिती । त्यांच्या चिंतनें विश्रांति ॥५॥तुका ह्मणे बीज पोटीं । फळ तैसें चि सेवटीं ॥६॥॥६३३७॥अविश्वासीयाचें शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही ॥१॥काय त्याचा वेळ जाईल माडवा । होता तैसा ठेवा आला पुढें ॥२॥मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळींचा धोंडा उभा ठाके ॥३॥तुका ह्मणे जैसा कुचराचा दाणा । परिपाकीं अन्ना न मिळे जैसा ॥४॥॥६३३८॥तामसाचीं तपें पापाची सिदोरी । तमोगुणें भरीं घातले ते ॥१॥राज्यपदा आड सुखाची संपत्तिअ । उलंघूनि जाती निरयगांवा ॥२॥इंद्रियें दमिलीं इच्छा जीती जीवीं । नागविती ठावीं नाहीं पुढें ॥३॥तुका ह्मणे हरिभजनावांचुन । करिती तो सीण पाहों नये ॥४॥॥६३३९॥हरिकथेवांचुन इच्छिती स्वहित । हरिजन चित्त न घला तेथें ॥१॥जाईल भंगोन आपुला विश्वास । होईल या नाम कारणांचा ॥२॥ज्याचिया बैसावें भोजनपंगती । त्याचिया संगती तैसें खावें ॥३॥तुका ह्मणे काय झालेती जाणते । देवा ही परते थोर तुह्मी ॥४॥॥६३४०॥सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥घेईल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्तें सांदी जेना ॥२॥खद्योतें दावावी रवी केवीं वाट । आपुलें चि नीट उसंतावें ॥३॥तुका म्हणे तो ज्ञानाचा सागर । परि नेंदी अगर भिजों भेदें ॥४॥॥६३४१॥जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥१॥करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥२॥जेणें हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥३॥तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्ताचिया ॥४॥॥६३४२॥बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वाटुं मन त्यांच्या संगें ॥१॥करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥२॥सुखाची समाधि हरिकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ॥३॥तुका म्हणे बुडे बांधोनि दगड । तेथें काय कोड धांवायाचें ॥४॥॥६३४३॥हरिकथे नाहीं । विश्वास ज्याचे ठायीं ॥१॥त्याची वाणी अमंगळ । कान उंचराचें बीळ ॥२॥सांडूनि हा रस । करिती आणीक सायास ॥३॥तुका म्हणे पिसीं । वांयां गेलीं किती ऐसीं ॥४॥॥६३४४॥प्रेम अमृताची धार । वाहे देवा ही समोर ॥१॥ऊर्ध्ववाहिनी हरिकथा । मुगुटमणि सकळां तीर्था ॥।२॥शिवाचें जीवन । जाळी महादोष कीर्तन ॥३॥तुका म्हणे हरि । इची स्तुति वाणी थोरी ॥४॥॥६३४५॥आतां माझ्या मना । इची घडो उपासना ॥१॥ऐसें करी पांडुरंगा । प्रेमवोसंडेसें अंगा ॥२॥सर्व काळ नये । वाचे विट आड भये ॥३॥तुका वैष्णवा संगती । हेंचि भजन पगती ॥४॥॥६३४६॥उपास कराडी । तिहीं करावीं बापुडीं ॥१॥आम्ही विठोबाचे दास । चिंता झुगारिली आस ॥२॥भक्तीच्या उत्कर्षे । नाहीं मुक्तीचें तें पिसें ॥३॥तुका म्हणे बळ । अंगीं आमुच्या सकळ ॥४॥॥६३४७॥करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे ॥१॥कोणाकारणें हें झालेंसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥२॥तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा । घालूनी गोपाळा भार असें ॥३॥॥६३४८॥तुह्मीं येथें पाठविला धरणेकरी । त्याची झाली परी आइका ते ॥१॥आतां काय पुढें वाढवुनि विस्तार । झाला समाचार आइका तो ॥२॥देवाचे उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करुई गेला ॥३॥तुका म्हणे सेवा समर्पूनी पायीं । झालों उतराई ठावे असा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP