मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग| ७१०९ ते ७११९ विविध अभंग ६२४१ ते ६२४३ ६२४४ ते ६२६५ ६२६६ ते ६२८६ ६२८७ ते ६२८९ ६२९० ते ६२९१ ६२९२ ते ६३१० ६३११ ते ६३१७ ६३१८ ते ६३२४ ६३२५ ते ६३४८ ६३४९ त्र ६३५० ६३५१ ते ६३५३ ६३५४ ते ६३९५ ६३९६ ते ६४१४ ६४१५ ते ६४२५ ६४२६ ते ६४२७ ६४२८ ते ६४७८ ६९३५ ते ६९४३ ६९४४ ते ६९५० ६९५१ ते ६९५४ ६९५५ ते ६९६० ६९६१ ते ६९७९ ६९८० ते ७००५ ७००६ ते ७०२० ७०२१ ते ७०३० ७०३२ ते ७०५३ ७०५४ ते ७०५७ ७०५८ ते ७०६४ ७०६५ ते ७०६६ ७०६७ ते ७०७५ ७०७६ ते ७०८० ७०८१ ७०८२ ते ७१०८ ७१०९ ते ७११९ ७१२० ते ७१२५ ७१२६ ते ७१४५ ७१४६ ७१४७ ७१४८ ते ७१५६ ७१५७ ते ७१६० ७१६१ ते ७१६९ ७१७० ते ७१७९ ७१८० ते ७१८९ ७१९० ते ७२०० ७२०१ ते ७२१० ७२११ ते ७२२० ७२२१ ते ७२३४ पाईक अभंग - ७१०९ ते ७११९ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत पाईक अभंग - ७१०९ ते ७११९ Translation - भाषांतर ॥७१०९॥पाईकपणें जोतिला सिद्धांत । शूर धरी मात वचन चित्तीं ॥१॥पाईकांवांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दु:ख न सरे पीडा ॥२॥तरि व्हावें पाईक जिवाचे उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥३॥पाईकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वायाविण ॥४॥तुका ह्मणे एका क्षणाचा करार । पाईक अपार सुख भोगी ॥५॥॥७११०॥पाईकीचें सुख पाईकासी ठावें ॥ ह्मणोनियां जीवें केलीसाठी ॥१॥येतां गोळ्या बाण साहिले भडमार । वर्षतां अपार वृष्टिवरी ॥२॥स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडण शोभा दावी ॥३॥पाईकांनीं सुख भोगिलें अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाहीं ॥४॥तुका ह्मणे या सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥५॥॥७१११॥पाईक तो जाणे पाईकाचा भाव । लाग पगें ठाव चोरवाट ॥१॥आपणां राखोनी ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरुनियां ॥२॥येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाईक त्या जग स्वामी मानी ॥३॥ऐसें जन केलें पाइकें पाईक । जया कोणी भीक न घलिती ॥४॥तुका ह्मणे ऐसे जयाचे पाईक । बळिया तो नाईक त्रैलोकींचा ॥५॥॥७११२॥पाईकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याच्या सांटा मोडोनियां ॥१॥पारखिये ठायीं घेऊनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥२॥आधारेंविण जें बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥३॥सांडितां मारग मारिती पाईक । आणिकांसी शीक लागावया ॥४॥तुका ह्मणे विश्वा घेऊनी विश्वास । पाईक तयास सुख देती ॥५॥॥७११३॥पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥१॥तो एक पाईक पाईकां नाईक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥२॥तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाईका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥३॥विश्वासावांचूनी पाईकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥४॥तुका ह्मणे नये स्वामी उणेपण । पाईका जतन करी त्यासी ॥५॥॥७११४॥धनी ज्या पाईका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥१॥जिवाचे उदार शोभती पाईक । मिरवती नाईक मुगुटमणि ॥२॥आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥३॥कमाईचीं हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥४॥तुका ह्मणे तरी पाईकीच भली । थोडीबहुत केली स्वामिसेवा ॥५॥॥७११५पाईकपणें खरा मुशारा । पाईक तो खरा पाइकीनें ॥१॥पाईक जाणे मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥२॥एके दोहीं घरीं घेतलें खाणें । पाईक तो पणें निवडला ॥३॥करुनी कारण स्वामी यश द्यावें । पाईका त्या नांव खरेपण ॥४॥तुका ह्मणे ठाव पाईकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥५॥॥७११६॥उंच नीच कैसी पाईकाची ओळी । कोण गांढे बळी निवडिले ॥१॥स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥२॥प्रसंगावांचूनी आणिती आविर्भाव । पाईक तो नांव मिरवी वांयां ॥३॥गणतीचे एक उंच नीच फार । तयांमध्यें शूर विरळा थोडे ॥४॥तुका म्हणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाईक पाहोन मोल करी ॥५॥॥७११७॥एकाच स्वामीचे पाईक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥१॥स्वामिपदीं एका ठाव उंच स्थळीं । एक ती निराळीं जवळी दुरी ॥२॥हीन कमाईचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंचपद ॥३॥पाईकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढया ठाव ॥४॥तुका ह्मणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥५॥॥७११८॥प्रजी तो पाइक ओळीचा नाईक । पोठासाठीं एकें जैशीं तैशीं ॥१॥आगळें पाऊल आणिकांसी तरी । पळती माघारीं तोदिजेती ॥२॥पाठीवरी घाय ह्मणती फटमर । धडा अंगें शूर मान पावे ॥३॥घेईल दरवडा देह तो पाईक । मारी सकळीक सर्व हरी ॥४॥तुका ह्मणे नव्हे बोलाचें कारण । कमाईचा पण सिद्धी पावे ॥५॥॥७११९॥जातीचा पाईक ओळखे पाईका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥१॥धरितील पोटासाठीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥२॥जातीचें तें असे खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥३॥तुका म्हणे नमूं देव म्हूण जना । झालियांच्या खुणा जाणतसों ॥४॥ N/A References : N/A Last Updated : June 10, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP