मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६४२६ ते ६४२७

अभंग - ६४२६ ते ६४२७

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६४२६॥
कृतायुगीं नामा होउनी प्रल्हाद । होउनी अंगद त्रेतायुगीं ॥१॥
द्वापारीं सेवेसी होऊनी उद्धव । जगीं हा माधव तोषविला ॥२॥
कलियुगीं रुपें घेतलींसी दोन । नामदेव होऊन जगीं ठेलों ॥३॥
तेथें भक्तिवाद केला होता पण । ग्रंथ हा करीन शतकोटी ॥४॥
करितां करितां तेथें उरली बाकी । तुका ह्मणे मुखीं आली माझ्या ॥५॥

॥६४२७॥
वेदाचे अभंग केले श्रुतिपर । द्वादशसहस्त्र संहितेचे ॥१॥
निरुक्त निघंट आणि ब्रह्मसूत्र । अवतार सहस्त्र उपग्रंथ ॥२॥
अभंग ते कोटी भक्तिपर केले । ज्ञानपर केले तितुके चि ॥३॥
पंचाहत्तर लक्ष वैराग्य वर्णिलें । नाम तें गाइलें तितुकें चि ॥४॥
साठीलक्ष केला बोधक जनासी । वर्णिलें रुपासी तितुकें चि ॥५॥
द्वादशसहस्त्र आत्मबोध केला । अनुभव घेतला एक सर्व ॥६॥
चौतीस सहस्त्र लक्ष कोटि पांच । सांगोनियां साच तुका गेला ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP