TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६३११ ते ६३१७

अभंग - ६३११ ते ६३१७

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


शिवाजी स्वत: दर्शनास आले व स्वामीपुढें जवाहिरांनी भरलेलें ताट ठेविलें ते अभंग.
॥६३११॥
जाणोनि अंतर । टाळिसील करकर ॥१॥
तुज लागली हे खोडी । पांडुरंगा बहु कुडी ॥२॥
उठविसी दारीं । धरणें एखादिया परी ॥३॥
तुका म्हणे पाये । कैसे सोडीन ते पाहे ॥४॥

॥६३१२॥
नाहीं विचारीत । मेघ हागणदारी सेत ॥१॥
नये पाहों त्याचा अंत । ठेवीं कारणापें चित्ता ॥२॥
वर्जीत गंगा । नाहीं उत्तम अधम जगा ॥३॥
तुका म्हणे मळ । नाहीं अग्नीसी विटाळ ॥४॥

॥६३१३॥
काय दिला ठेवा । आह्मां विठ्ठल चि व्हावा ॥१॥
तुह्मी कळलेति उदार । साठीं परिसाची गार ॥२॥
जीव दिला तरी । वचना माझ्या नये सरी ॥३॥
तुका म्हणे धन । आम्हां गोमासा समान ॥४॥

॥६३१४॥
पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥१॥
पुढें उरे खातां देतां । नव्हे खंडण मवितां ॥२॥
खोलीं पडे ओलीं बीज । तरी च हातीं लागे निज ॥३॥
तुका ह्मणे धनी । विठ्ठल अक्षरें ही तिन्ही ॥४॥

॥६३१५॥
मुंगी आणि राव । आह्मां सारिखाचि जीव ॥१॥
गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ॥२॥
सोनें आणि माती । आम्हां समान हे चित्तीं ॥३॥
तुका म्हणे आलें । घरां वैकुंठ सगळें ॥४॥

॥६३१६॥
तिहीं त्रिभुवनीं । आह्मी वैभवाचे धनी ॥१॥
हातां आले घाव डाव । आमचा मायबाप देव ॥२॥
काय त्रिभुवनीं बळ । अंगीं आमुच्या सकळ ॥३॥
तुका म्हणे सत्ता । अवघी आमुची च आतां ॥४॥

॥६३१७॥
आह्मी तेणें सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखीं ॥१॥
तुमचें येर वित्त धन । तें मज मृत्तिकेसमान ॥२॥
कंठीं मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ॥३॥
म्हणवा हरिचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-04-12T20:23:17.9000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तोणी

 • स्त्री. ( गो . ) मोठी व बारीक ऊ . टोणा पहा . 
RANDOM WORD

Did you know?

How I do save the text on my computer?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,490
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,863
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.