TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६२९० ते ६२९१

ज्ञानबोध - ६२९० ते ६२९१

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


ज्ञानबोध - ६२९० ते ६२९१
॥६२९०॥
मूळ शोधाचें आपुलें । एका सद्रुगुच्या बळें ॥१॥
मुळापासोनि विस्तार । कैसा झाला तो ओंकार ॥२॥
कोठें प्राणी वाहातो । कोण अन्य चालवितो ॥३॥
अहो इडा आणि पिंगला । तिसरी सुषुम्नाती बाला ॥४॥
अहो चंद्रसूर्य दोन । त्यांचे कोणतें ठिकाण ॥५॥
अर्ध मात्रा जीव शीव । कोठें राहती पहा हो ॥६॥
चारी शुन्यें चारी देह । यांचें ठिकाण कोठें आहे ॥७॥
चारी वाचा कोणा ठायीं । यांसी शोधुनियां पाही ॥८॥
बारा आणि चारी सोळा । सत्रावी ती जिवनकळा ॥९॥
षडक्षरी मंत्रराज । कोण चक्र कोण बीज ॥१०॥
अक्षरें कोणतीं ह्मणावीं । त्यांचीं नामें सांगून द्यावीं ॥११॥
फानसाचा केला लेखा । दोन राहिल्या मात्रुका ॥१२॥
तें तर संतांचें निजगुज । कोठें राहे सोहं बीज ॥१३॥
कोठें आहे चंद्रभुवन । कोण मेरुचें ठिकाण ॥१४॥
सप्त पाताळें कोणतीं । एकविस स्वर्गाची गणती ॥१५॥
अहो पृथ्वीची गणती । शोधून पाहावी देहांतीं ॥१६॥
आकाशाचा वारा किती । याची करावी गणती ॥१७॥
किती पर्जन्याच्या धारा । वाहाती सप्तही सागरा ॥१८॥
नव नाडी कुंडलनी । वाहे सत्रावीचें पाणी ॥१९॥
तत्व झाडा कैसा आहे । हें तो शोधुनियाम पाहे ॥२०॥
कोठें अनुहात गजर । वाजतें दशवें हें धतुर ॥२१॥
अहो पंधरा द्वारे वाटे । कवण ठायीं बाहात्तर कोटे ॥२२॥
कोठें अष्टादश कमळ । कोठें मनपुरीचा खेळ ॥२३॥
चारी मुक्तीचें ठिकाण । देहामध्यें कोण कोण ॥२४॥
चारी मुद्रा शोधुन पाही । लक्ष लक्षुनियां घेई ॥२५॥
विपद कैसा लोक । हा तंव पाहिजे कलंक ॥२६॥
अहो त्रिपद गायत्रीचा । सांगा चौथा पाय कैंचा ॥२७॥
सचिदानंद ते कोणते । यांचें स्वरुप शोधुन पाहे ॥२८॥
तीन मार्ग ते जाणावे । कासीवासी ते ह्मणावे ॥२९॥
सोहंअ धारण कोणती । तीही जाणावी निरुती ॥३०॥
ओहं मायेचें रुप काय । ऐसें शोधोनियां पाहे ॥३१॥
अविद्येचि कैसी काय । कळलें धन्य त्याची माय ॥३२॥
देह पुर्वी कोण होता । देह पडल्या कोठें जाता ॥३३॥
जीवशिवाचें कैसें काय । रुप तें हो कैसें आहे ॥३४॥
तुर्या ह्मणावी काशाला । कळली पाहिजे ज्याची त्याला ॥३५॥
अष्टधा प्रकृती झाली । तेही पाहिजे कळली ॥३६॥
पांच पंचवीस तत्वगुण । हेहीं करावें निरसन ॥३७॥
स्वप्न देखें मी त्या होय । वीर्य खळलें खळोन राहे ॥३८॥
कर्म इंद्रियांची गणति । ज्ञानी इंद्रियें जाणती ॥३९॥
पंचविसावें अंतस्मरण । दसवे उदास प्राण ॥४०॥
अविद्येचें निरसन । पिंड ब्रह्मांड हे पान ॥४१॥
बारा सोळा असती कळा । ह्या तंव जाणाव्या सकळा ॥४२॥
अहो ओंकाराचें बीज । हें तंव कळलें पाहिजे ॥४३॥
चौदा चक्रांचा उभारा । केला पाहिजे हा सारा ॥४४॥
अणु नावाच्या भुमिका चारी । कळल्या पाहिजे निरधारी ॥४५॥
योग अष्टांग साधन । कळलें पाहिजे तें कवन ॥४६॥
कैसें षडचक्र थोडें । सहस्त्र दळ केलें पुढें ॥४७॥
अष्टापुराचें धनु केलें । षड्‍वैरी निर्दाळिले ॥४८॥
भगवंताचें कैसें काय । स्वरुप शोधुनियां पाहे ॥४९॥
स्वरुप पहावयासी गेला । देह आपण स्वयंभु झाला ॥५०॥
षड्‍गुण ईश्वराचे । तेही झाला आपणचि ॥५१॥
कैसा मक्षका त्या कळला । फेरा चोर्‍याशींचा चुकला ॥५२॥
अहो दृश्य माया जाती । निरसुनी ब्रिद होती ॥५३॥
कैसें अर्ध उर्ध्व केलें । कैसें सीत उष्ण गेलें ॥५४॥
कैसी भुक तहान गेली । कुंडलनी चेतविली ॥५५॥
सोहं धारण कोणती । तीही जाणावी निरुती ॥५६॥
कैसें मन स्थिर केलें । कैसें चंचळ निश्चळ झालें ॥५७॥
डोळे उफराटे लाविले । शून्य भेदून निरशुन्य झालें ॥५८॥
निर्विकल्प समाधीची । सांग धारणा ती कैसी ॥५९॥
पहा संसार तो कोण । त्यासी द्यावें ओळखून ॥६०॥
जाणे सद्गुरुचा बाळ । इतरासी तें न कळे ॥६१॥
इतुका शोध करुनी घेतां । सायोज्यपद येई हाता ॥६२॥
मुळापासुनी विस्तार । सांगितला थोडा फार ॥६३॥
तुका ह्मणे ज्ञानबोध गुरुकृपें व्हाल सिद्ध ॥६४॥

॥६२९१॥
मूळ शोधिलें आपुलें । सद्गुरुकृपें ऐसें झालें ॥१॥
मुळापासोनी विस्तार । ऐका ओंकाराचें सार ॥२॥
निरंजनीं निराकार । तेथें जन्मला ओंकार ॥३॥
प्राण राहतो सहस्त्रदळीं । तेथुनी अजपती झाली ॥४॥
अहो इडा आणि पिंगळा । तिसरी ब्रह्मांडी ती कळा ॥५॥
अहो चंद्र सूर्य दोन । त्यांचें पुशिलें ठिकाण ॥६॥
सूर्य आहे नाभिकमळीं । चंद्र पाहे देखे दळीं ॥७॥
अर्ध चंद्र अर्धी मात्रा । जाण सद्गुरुच्या पुत्रा ॥८॥
अष्टदळीं जीव राहे । सहावे दळीं शीव पाहे ॥९॥
चारी शून्याचें ठिकाण । एक महा शून्य जाण ॥१०॥
स्थूळ सूक्ष्म कारण जरी । महा कारण त्या शेजारीं ॥११॥
महा शून्य निरशून्यीं । जन्मलें हो तया स्थानीं ॥१२॥
चहूं देहांचें ठिकाण । घेई ब्रह्मांडीं शोधून ॥१३॥
मन आणि मुखापासून । परा पश्यंती ती जाण ॥१४॥
ध्यान वसे हृदयांतरीं । वसे मध्यमा वैखरी ॥१५॥
बारा सोळा दश भासे । सत्राची ती मुखीं वसे ॥१६॥
षड्‍ अक्षरीं एकचि ब्रह्म । सर्व व्यापुनी गेलें वर्म ॥१७॥
पन्नासांचा पसारा । दोअक्षरीं मंत्र सारा ॥१८॥
हें तों संतांचें निज गुज । दहा अंगुळें मंत्रराज ॥१९॥
जें कां दृष्टीचें आगर । तेंचि मेरुचें शिखर ॥२०॥
साता पासोनी चौदा झालीं । गुरुपुत्रा अनुभविलीं ॥२१॥
अतळ वितळ भूतळ । जाण चवथें सुतळ ॥२२॥
ज्ञान सातवें पातळ । एकचि स्वर्गाचा हा खेळ ॥२३॥
पाठी एकविस मनकुळा । पहा शोधोनियां बाळा ॥२४॥
सोळा अंगुळें पृथवी । देहीं शोधोनियां घेई ॥२५॥
आकाशाचा वायू जाण । विस अंगुळें प्रमाण ॥२६॥
कोठें एक्यासी सवालक्ष । एकापासुनी मग अनेक ॥२७॥
नीर क्षीर दधि जाण । सिंधु क्षार मन मदन ॥२८॥
नव नाहीं स्वस्वरुपीं जाण । गुरु कृपें घे अवलोकून ॥२९॥
छत्तीस तत्वांचा विचार । गुरुकृपें जाण सार ॥३०॥
सहस्त्र दळीं अनुहात । दश निधी वाजे नित्य ॥३१॥
दोन एकवीस जाण । कोटी बहात्तर प्रमाण ॥३२॥
हृदयकमळीं वसे मन । नाभीं वसे तो पवन ॥३३॥
कुटी सूक्ष्म देह दोन । सलोक समीपता जाण ॥३४॥
गोलांट श्री हाट मंडळ देहीं । स्वरुप पाहतां योजतां पाही ॥३५॥
चारी मुद्रा शोध केला । अलक्ष लक्षुनी राहिला ॥३६॥
त्रिपद गायत्री पाहे । चौथा निर्गुणी तो आहे ॥३७॥
सच्चिदानंद परमेश्वर । जयापासोनी विस्तार ॥३८॥
त्रिकुटीच्या तीन वाटा । मार्ग तयांचा उलटा ॥३९॥
माया मिथ्या रुप असे । अज्ञानासी सत्य भासे ॥४०॥
अविद्या तें जग जळ । जग व्यापिलें सकळ ॥४१॥
ब्रह्म तेंचि हा निर्गुण । निंबाकार तें सगुण ॥४२॥
निर्गुणांतूनी देह आला । जेथील तेथें विलया गेला ॥४३॥
जीव चिद्रुपाचे परी । शीव गुणातीत हरी ॥४४॥
तुर्या अवस्था उन्मनी । चौदा देहांची साक्षिणी ॥४५॥
पुरुषापासोनी प्रकृती । गुरुकृपें पहा प्रचिती ॥४६॥
तत्वापासून तत्व झालें । तत्व तत्वेंचि ग्रासिलें ॥४७॥
स्वप्न प्रपंच मिथ्या होय । गुरु कृपें सत्य होय ॥४८॥
पंच पिंड ब्रह्मांडी जाण । दसवा देश प्राण ॥४९॥
सत्य चक्रें अनुभवावीं । गुरुकृपें झालीं ठावीं ॥५०॥
कार्य शब्दचि राहिलें । देखणें दृष्टीचें ठेलें ॥५१॥
सर्व साधनाशेवटीं । जीव शीव पडल्या गांठी ॥५२॥
आज आसनीं बैसावें । षड्‍चक्र भेदुनी जावें ॥५३॥
परात्पर जो प्रकाश । झाला आपण सौरस ॥५४॥
विवेक वैराग्य झालेंझ । षडरिपू सांग केलें ॥५५॥
मोक्ष गुरु कृपें कळलें । निज स्वरुपीं मिळालें ॥५६॥
निर्गुण गुणासीं आलें । सहजचि माऊल झालें ॥५७॥
गुरुकृपें ऐसें झालें । निरंजनीं शीतळ केलें ॥५८॥
शोधणार ते राम । तेथें केलें सर्व काम ॥५९॥
डोळे लाविले उफराटे । निर्गुणासी झाली भेट ॥६०॥
गुरु ज्ञानाची दिवटी । संसारमाया सांटी ॥६१॥
ऐसें कळलें जयाला । गुरु कृपा झाली त्याला ॥६२॥
इतुका शोध ज्यानें केला । तोची सायोज्यते गेला ॥६३॥
गुण निर्गुणाचा झाडा । ब्रह्मज्ञानाचा निवाडा ॥६४॥
ऐसी श्रीगुरु माउली । निगम बोली प्रगट केली ॥६५॥
श्रीगुरुसी उपमा नाहीं । आतां द्यावें आतां कांहीं ॥६६॥
तुका तुजलागीं सांगता । नाहीं नाहीं सद्गुरुनाथा ॥६७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-04-12T20:07:52.8030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

dyspoiesis in marrow

 • अस्थिमज्जीय जनन दोष 
RANDOM WORD

Did you know?

विविध देवदेवतांचे आकार, रंग, रूप ही कल्पना कशी आणि कोणी निर्माण केली?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,490
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,863
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.