मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
७०२१ ते ७०३०

घोंगडयाचे अभंग - ७०२१ ते ७०३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७०२१॥
घोंगडियांचा पालत केला । मुलांमुलां आपुल्यांत ॥१॥
कान्होबा तो मीच दिसें । लाविलें पिसें संवगडियां ॥२॥
तो बोले मी उगाच बैसें । अनारिसें न दिसे ॥३॥
तुका ह्मणे दिलें सोंग । नेदी व्यंग जाऊं देऊं ॥४॥

॥७०२२॥
खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥१॥
कान्होबाचे पडिलों गळां । घेई गोपाळा देई झाडा ॥२॥
मी तो हागे उघडा झालों । अवघ्या आलों बाहेरी ॥३॥
तुका ह्मणे बुद्धि काची । नाहीं ठायींची मजपाशीं ॥४॥

॥७०२३॥
घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥१॥
माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥२॥
व्हावें ऐसें निसंतान । घेईन आन तुजपाशीं ॥३॥
तुका ह्मणे लाहान मोठा । सांडा ताठा हा देवा ॥४॥

॥७०२४॥
नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥१॥
चाहाड तुझे दाविन घरीं । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥२॥
तुह्मां आह्मां पडदा होता । सरला आतां सरोवरी ॥३॥
तुका ह्मणे उरती गोठी । पडिली मिठी न सुटे ॥४॥

॥७०२५॥
तुह्मां अह्मां उरी तोंवरी । जनाचारी ऐसे तैसी ॥१॥
माझें घोंगडें टाकून देई । एके ठायीं मग असों ॥२॥
विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥३॥
तुका ह्मणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥४॥

॥७०२६॥
मुळींचा तुह्मां लागला चाळा । तो तो गोपाळा न संडा ॥१॥
घ्यावें त्यांचें देणेंचि नाहीं । येचि बाहीं देखतसों ॥२॥
माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडीस ना ॥३॥
तुका म्हणे म्यां सांडिली आशा । हुंगिला फांसा येथूनियां ॥४॥

॥७०२७॥
घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवें ॥१॥
हा गे चोर धरा धांवा कोणी । घरांत राहाटे चहूं कोनीं ॥२॥
नोळखवे म्यां धरिला हातीं । देहा दीप माय लाविली वाती ॥३॥
न पावे धांवणें मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥४॥

॥७०२८॥
आतां मी देवा पांघरो काई । भिकेचें तें ही उरेचि ना ॥१॥
सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥२॥
नाहीं मजपाशीं फुटकी फोडी । पांचांनीं घोंगडी दिली होती ॥३॥
तुका ह्मणे जना वेगळें झालें । एकचि नेलें एकुल्याचें ॥४॥

॥७०२९॥
मी माझें करीत होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खानें ॥१॥
मज आल्याविण आधींच तो होता । मज न कळतां मज माजी ॥२॥
घोंगडें नेलें घोंगडें नेलें । उघडें केलें उघडेंचि । तुका ह्मणे चोरटाचि झाला साव ।
सहजचि न्याय नाहीं तेथें ॥४॥

॥७०३०॥
घोंगडें नेलें सांगों मी कोणा । दुबळें माझें नाणीती मना ॥१॥
पुढें तें मज न मिळे आतां । जवळी सत्ता दाम नाहीं ॥२॥
सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥३॥
घोंगडियाचा करा बोभाट । तुका ह्मणे जंव भरला हाट ॥४॥

॥७०३१॥
माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥१॥
चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥२॥
चोर कुठोरी एकेचि ठायीं । वेगळें पाहावें न लगे कांहीं ॥३॥
आणिकांचीं ही चोरलीं आधीं । माझें तयामधीं मेळविलें ॥४॥
आपल्या आपण शोधिलें तिहीं । करीन मी ही तेचि परी ॥५॥
तुका ह्मणे माझें हितचि झालें । फाटकें जाऊन धडकें आलें ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP