मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६२६६ ते ६२८६

व्रताचा महिमा - ६२६६ ते ६२८६

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६२६६॥
एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन ॥
श्वानविष्टेसमान । अधम जन तो एक ॥१॥
ऐका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन ॥
गाती ऐकती हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥२॥
अशुद्ध विटाळसीचें खळ । विडा भक्षितां तांबूल ॥
सांपडे सबळ ॥ काळांहातीं न सुटे ॥३॥
सेज बाज विलास भोग । करी कामिनीशीं संग ॥
तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥३॥
आपण न वजे हरिकीर्तना । अणिकां वारी जातां कोणा ॥
त्याच्या पापें जाणा । ठेंगणा महा मेरु ॥४॥
तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित ॥
तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥५॥

॥६२६७॥
करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । सोडवितां दोघे नरका जाती ॥१॥
शुद्ध बुद्धी होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥२॥
आपुले देउनी आपुला चि घात । न करावा थीत जाणोनियां ॥३॥
देऊनियां वेच धाडी वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥४॥
तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोडूं नये ॥५॥

॥६२६८॥
ज्यासी नावडे एकादशी । तो जिता चि नरकवासी ॥१॥
ज्यासी नावडे हें व्रत । त्यासी नरक तो ही भीत ॥२॥
ज्यास मान्य एकादशी । तो जिता चि मुक्तवासी ॥३॥
ज्यासी घडे एकादशी । जाणें लागे विष्णूपाशीं ॥४॥
तुका म्हणे पुण्यराशी । तो चि करी एकादशी ॥५॥

॥६२६९॥
जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावे तें प्रेत शव लोकीं ॥१॥
त्याचें वय नित्य काळ लेखिताहे । रागें दात खाय करकरां ॥२॥
जयाचिये द्वारीं तुळसी वृंदावन । नाहीं तें स्मशान गृह जाणा ॥३॥
जये कुळी नाहीं एक ही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीतापा ॥४॥
विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड रजकाचें ॥५॥
तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरिचिया ॥५॥

॥६२७०॥
कोटी कुळें त्याची पाहताती वाट । वंशांत उद्धट पुत्र झाला ॥१॥
जप तप नेम करी तीर्थाटण । व्रत आचरण एकादशी ॥२॥
स्नानसंध्यादान संतांचें पूजन । अतिथीभोजन क्षुधाकाळीं ॥३॥
तान्हेल्या जीवन साधूचा सन्मान । अर्थिल्यासी दान यथाशक्ती ॥४॥
तुका म्हणे हरीगुणसंकीर्तन । करितां आपण करुं नये ॥५॥

॥६२७१॥
एकादशी व्रत करी गाय नाम । तया सर्व नेम घडियला ॥१॥
तीर्थाचें जें मूळ व्रतांचें जें फळ । तें मुखीं केवळ नामामृत ॥२॥
एकचि हें व्रत त्रैलोक्या समर्थ । पुरविली आर्त सर्व कांहीं ॥३॥
एकादशी व्रत नामाचा उच्चार । तुका म्हणे सार सर्वामध्यें ॥४॥

॥६२७२॥
करुनी निर्जळ सावकाश निजे । साधनाचें काज ऐसें नोहे ॥१॥
व्रतांमाजि व्रत श्रेष्ठ एकादशी । प्रिय विठोबासी कोण्या गुणें ॥२॥
करी एकादशी सादर कीर्तनीं । नांव हरिदिनीं बोलीजेल ॥३॥
तुका म्हणे करा फल्हार निश्चीत । बैसा कीर्तनांत सावकाश ॥४॥

॥६२७३॥
नायकतां जरी जाय आडराना । नाहीं सोडवण्या तया कोणी ॥१॥
अवघडा मार्गी दुर्घट त्या रानीं । संगिया निधानीं कैंचा तेथें ॥२॥
न मिळेचि वस्ती सगीं आप्तवर्ग । पुससील मग सांग कोणा ॥३॥
या कारणेम करा व्रत एकादशी । सांडी कीर्तनासी आळस हा ॥४॥
तुका ह्मणे करा कीर्तनजागर । सोपा हा दुस्तर भवसिंधु ॥५॥

॥६२७४॥
साधनाचें सार व्रताचें आगर । सांगतों निर्धार धरा कोणी ॥१॥
निराहार रात्रीं करा जागरण । भागवतश्रवण नाम मुखीं ॥२॥
ययानांव व्रत केलें हरीदिनीं । वश चक्रपाणी होय त्यासी ॥३॥
नाहीं तरी व्यर्थ साधनांची आटी । कधीं नेदी भेटी देव त्यासी ॥४॥
तुका ह्मणे मज आली हे प्रचीत । ह्मणोनियां नित्य सांगतसें ॥५॥

॥६२७५॥
संतांनीं हा मज केला उपकार । नामी तो निर्धार धरविला ॥१॥
करी एकादशी कीर्तन उल्हास । गर्जे नामघोष नित्यानित्य ॥२॥
धरियला भाव विठोबाचे पायीं । तेणें कोठें नाहीं भवचिंता ॥३॥
मानिला विश्वास संतवचनासी । दृढ निश्चयासी मानीयला ॥४॥
तुका ह्मणे मधीं नाहीं येऊं कधीं । दिली ही उपाधी विषमाची ॥५॥

॥६२७६॥
साधनाची आटी सांडिली किचाट । धरियली वाट न सोडीं ते ॥१॥
पंधरादिवशीं करी एकादशी । पारणें द्वादशीं सूर्योदयीं ॥२॥
मानिला निश्चय धरियला धीर । कष्टलें शरीर भोगाहातीं ॥३॥
तुका ह्मणे नाहीं वागविली खंती । आलें गेलें चित्तीं नाशवंत ॥४॥

॥६२७७॥
हरीव्रत कोणी न करिती प्राणी । ठेविती गहाणी हातवाचा ॥१॥
न ह्मणती नाम देवाकरीं थट्टा । तयासी न भेटे निजसुख ॥२॥
हरीचा जागर न करी पामर । गोंधळीं आदर ऐकावया ॥३॥
नेम साधनाचा नाहीं जयाठायीं । आडमार्गे पाहीं जाती प्राणी ॥४॥
धारणी पारणी बगाड नवस । तुका ह्मणे सायास कोणपुण्य ॥५॥

॥६२७८॥
सर्व पर्वकाळ येणें चि साधीला । द्वादशी घडला द्वीजपंथ ॥१॥
नेमनिष्टें नाम धरीलें मानसीं । साधनांची राशी हेचि एक ॥२॥
अवघींच तीर्थे आलीं वस्ती घरीं । वास्तव्य पंढरी राहे तेथें ॥३॥
तुका ह्मणे देवें सांगितलें मज । गुह्याचें जें गुज एकांतींचें ॥४॥

॥६२७९॥
पुण्य पर्वकाळ पाहतां घडला । हरीभक्त आला घरा जेव्हां ॥१॥
साधनाची विधी घडली तयासी । साधन द्वादशी पर्वकाळ ॥२॥
पृथ्वीप्रदक्षण भ्रमण तीर्थासी । घडली कथेसी वेळा कोण ॥३॥
साधूचा सन्मान अतिथीपूजन । तेव्हां आलें जाण पुण्यपर्व ॥४॥
तुका ह्मणे केले योगव्रतयाग । एकादशी सांग कोण करी ॥५॥

॥६२८०॥
रामकृष्ण सखा ऐसा धरी भाव । मीपणाचा ठाव पुशीपणा ॥१॥
शरण सर्वदा ह्मणे तूं गोविंदा । वाचे लावी धंदा नारायण ॥२॥
यापरी सोपान नाहीं तें साधन । वाहतसें आण तुझी मना ॥३॥
कांहीं करुं नको आळस अंतरीं । जपे निरंतरीं रामनाम ॥४॥
तुका ह्मणे मोठा लाभ नरदेहीं । देहींच विदेही होती नामें ॥५॥

॥६२८१॥
गातां ऐके नाम कंटाळा जोकरी । वास त्या अघोरीं नर्कवासीं ॥१॥
रागें यमधर्म जाचवी तयासी । दिधले काशासी मुख कान ॥२॥
विषयाच्या सुखें अखंड जागसी । नये एकादशी जागरण ॥३॥
वेंचुनियां धन सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी ॥४॥
तीर्थाटण नाहीं केला उपकार । पाळीलें शरीर पुष्ट लोभें ॥५॥
तुका ह्मणे मग केला साह्य दंड । नाइकती लंड सांगितले ॥६॥

॥६२८२॥
माझिया चित्तासी बहुत हे आशा । पुराणपुरुषा पांडुरंगा ॥१॥
भेटिलागीं हेत आवडी जीवाची । वासना मनाची फेडा माझी ॥२॥
तूंची आम्हालागीं जन्म जन्मांतरीं । धांव झडकरी भेट आतां ॥३॥
पूर्वी तुवां भक्त तारीले अमीत । करुनियां नित्य नेमव्रत ॥४॥
तुका ह्मणे तुह्मी कृपाळु बहुत । दाखवी त्वरीत रुप डोळां ॥५॥

॥६२८३॥
नावडे ती एकादशी । तोचि जिता नर्कवासी ॥१॥
ज्यासी नावडे हें व्रत । त्यासि नर्क तोही भीत ॥२॥
ज्यासी मान्य एकादशी तोचि जिता मुक्तवासी ॥३॥
ज्यासी घडे एकादशी ॥ जाणें लागे विष्णुपाशीझं ॥४॥
तुका ह्मणे पुण्यराशी । तोचि करी एकादशी ॥५॥

॥६२८४॥
ऐका याचा परिहार । चित्त देऊनी सादर ॥१॥
मज सांगितलें देवें । तेंचि करितसें ठावें ॥२॥
सोपी एकादशी । नाम कीर्तिअ अहर्निशी ॥३॥
तेणें जिवा सोडवण । सुख होय नारायण ॥४॥
तुका ह्मणे तारी । बाळ भोळियां उद्धरी ॥५॥

॥६२८५॥
व्रत एकादशी करी । नेमवारे दयासी ॥१॥
जन्म ऐसा घडो देवा । त्यासी व्हावा वंशासी ॥२॥
ज्याचे ध्यानीं केशीराज । सत्य बीज त्या पाशीं ॥
तुका म्हणे पूर्ण ठेवा । तरी दैवा लाभे हें ॥४॥

॥६२८६॥
एकादशी व्रत । केवळ वैकुंठीचा पंथ ॥१॥
रुक्मांगदें व्रत केलें । नगर वैकुंठासी नेलें ॥२॥
त्यानें नेला एक गांव । आपण एकले तरी जीव ॥३॥
तुका ह्मणे करा काज । धरा एकामेकां लाज ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP