मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६३४९ त्र ६३५०

ज्ञानेश्वराची स्तुती - ६३४९ त्र ६३५०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६३४९॥
ज्ञान राजा माझा योग्याची माऊली । जेणें निगमावली प्रगट केली ॥१॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव तरावया ॥२॥
गीता आलंकारी नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहारी प्रगटली ॥३॥
श्रवणाच्या मिसें बैसावें येवोनी । समरस होवोनि सुखें नांदा ॥४॥
अध्यात्मविद्येचें करुनीयां रुप । उजळीला दीप चैतन्याचा ॥५॥
तुका ह्मणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एकतरी ओवी अनुभवी ॥६॥

॥६३५०॥
चला आळंदीला जाऊं । ज्ञानदेवा डोळां पाहूं ॥१॥
होतील संताचिया भेटी । सुखाचिया सांगों गोष्टी ॥२॥
ज्ञानेश्वर । मुखीं ह्मणतां चुकती फेर ॥३॥
तुम्हां जन्म नाहीं एक । तुका ह्मणे माझी भाक ॥४॥
६३४९ ते ६३५०

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP