मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग| ७०३२ ते ७०५३ विविध अभंग ६२४१ ते ६२४३ ६२४४ ते ६२६५ ६२६६ ते ६२८६ ६२८७ ते ६२८९ ६२९० ते ६२९१ ६२९२ ते ६३१० ६३११ ते ६३१७ ६३१८ ते ६३२४ ६३२५ ते ६३४८ ६३४९ त्र ६३५० ६३५१ ते ६३५३ ६३५४ ते ६३९५ ६३९६ ते ६४१४ ६४१५ ते ६४२५ ६४२६ ते ६४२७ ६४२८ ते ६४७८ ६९३५ ते ६९४३ ६९४४ ते ६९५० ६९५१ ते ६९५४ ६९५५ ते ६९६० ६९६१ ते ६९७९ ६९८० ते ७००५ ७००६ ते ७०२० ७०२१ ते ७०३० ७०३२ ते ७०५३ ७०५४ ते ७०५७ ७०५८ ते ७०६४ ७०६५ ते ७०६६ ७०६७ ते ७०७५ ७०७६ ते ७०८० ७०८१ ७०८२ ते ७१०८ ७१०९ ते ७११९ ७१२० ते ७१२५ ७१२६ ते ७१४५ ७१४६ ७१४७ ७१४८ ते ७१५६ ७१५७ ते ७१६० ७१६१ ते ७१६९ ७१७० ते ७१७९ ७१८० ते ७१८९ ७१९० ते ७२०० ७२०१ ते ७२१० ७२११ ते ७२२० ७२२१ ते ७२३४ रामचरित्र अभंग - ७०३२ ते ७०५३ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत रामचरित्र अभंग - ७०३२ ते ७०५३ Translation - भाषांतर ॥७०३२॥रामा वनवास । तेणें वसे सर्व देश ॥१॥केलें नामाचें जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥२॥वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥३॥तुका ह्मणे ऋषिनेम । ऐसा कळोनी कां भ्रम ॥४॥॥७०३३॥राम ह्मणे ग्रासोग्रासीं । तोचि जेविला उपवासी ॥१॥धन्यधन्य तें शरीर । तीर्थव्रताचें माहेर ॥२॥राम ह्मणे करितां धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥३॥राम ह्मणे वाट चाली । यज्ञ पाउलापाउली ॥४॥राम ह्मणे भोगीं त्यागीं । कर्म न लिंपें त्या अंगीं ॥५॥ऐसा राम जपे नित्य । तुका ह्मणे जीवन्मुक्त ॥६॥॥७०३४॥तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥१॥तो हा न करी तें कायी । कां रे लीन नव्हां पायीं ॥२॥सीळा होती मनुष्य झाली । ज्याच्या चरणाचे चाली ॥३॥वानरां हातीं लंका । घेवविली म्हणे तुका ॥४॥॥७०३५॥राम चालले लंकेसी । अहो सीता आणायासी ॥१॥पुढें समुद्र देखिला । नळराजा बोलविला ॥२॥शिळासेतू बांधोनी । राम गेले उतरुनी ॥३॥अहो तुका ह्मणे नळ । भक्त आहे हो प्रेमळ ॥४॥॥७०३६॥राम ह्मणतां रामचि होईजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥१॥ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहे ॥२॥रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥३॥तुका ह्मणे चाखोनी सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥४॥॥७०३७॥रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें ॥१॥कैसी तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥२॥हाचि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥३॥जुनाट नागरनीच नवें । तुका ह्मणे म्यां धरिलें जीवें भावें ॥४॥॥७०३८॥राम ह्मणतां तरे जाणतां नेणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥१॥राम ह्मणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥२॥राम ह्मणे तया जवळी नये भूत । कैंचा यमदूत ह्मणतां राम ॥३॥राम ह्मणतां तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणतां राम ॥४॥तुका म्हणे हें सुखाचें साधन । सेवी अमृतपान एका भावें ॥५॥॥७०३९॥पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥१॥अवघे लंकेमाजी झाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥२॥अवघे अंगलग तुझें वधियेले वीर । होई शरणागत किंवा युद्धासी सादर ॥३॥तुका ह्मणे एक्या भावें रामासी भेटी । करुनी घेई आतां संबंधेसी तुटी ॥४॥॥७०४०॥समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥१॥कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥२॥प्रेमसुखाचें संधान । बाणें निवारिती बाण ॥३॥तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनी केली मात ॥४॥॥७०४१॥केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥१॥लंकाराज्य बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥२॥औदार्याची सीमा । काय वर्णू रघुरामा ॥३॥तुका म्हणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥४॥॥७०४२॥रामरुप केली । रामें कौसल्या माउली ॥१॥राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी ॥राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरंवसा ॥२॥अयोध्येचे लोक । राम झाले सकळीक ॥३॥स्मरतां जानकी । रामरुप झाले कपि ॥४॥रावणेंसि लंका । राम आपण झाला देखा ॥५॥ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥६॥॥७०४३॥आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरें वाद्यांचे गजर ॥१॥आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जयजयकार आळंगिला भरत ॥२॥करिती अक्षवाणें ओंवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥३॥झालें रामराज्य आनंदलीं सकळें । तुका म्हणे गाईवत्सें नरनारीबाळें ॥४॥॥७०४४॥झालें रामराज्य काय उणें आह्मांसी । धरणी धरी पीक गाई वोळल्या ह्मैसी ॥१॥राम वेळोवेळां आह्मी गाऊं ओवियें । दळितां कांडितां जेवितां गे बाइये ॥२॥स्वप्नींही दु:ख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटलें काळा ॥३॥तुका ह्मणे रामें सुख दिलें आपुलें । तयां गर्भवासीं येणें जाणें खुंटलें ॥४॥॥७०४५॥अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥१॥रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥२॥कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपतां अविनाश भवानी ॥३॥तारक मंत्र श्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ऋषि ॥४॥नामजप बीजमंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥५॥नामजप जीवन मुनिजना । तुकयास्वामी रघुनंदना ॥६॥॥७०४६॥मी तो अल्पमतिहीन । काय वर्णू तुझे गुण ॥ उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें ॥१॥नाम चांगलें चांगलें । माझे कंठीं राहो भलें ॥कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केले राक्षसां ॥२॥द्रोणागिरि कपि हातीं । आणविला सीतापति ॥थोर केली ख्याती । भरतभेटीसमयी ॥३॥शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ति वाखाणिली ॥लंका दहन केली । हनुमंतें काशानें ॥४॥राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान ॥राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥५॥॥७०४७॥साही शास्त्रां अतिदुरी । तो परमात्मा श्रीहरि ॥तो दशरथाचे घरीं । क्रीडतो राम ॥१॥शिवाचें निजध्येय । वाल्मीकाचें निजगुह्य ॥तो भिल्लटीचीं फळें खाय । श्रीराम तो ॥२॥योगियांचे मनीं । नातुडे चिंतनीं ॥ तो वानरांचे कानीं । गोष्टी सांगे ॥३॥चरणें शिळा उद्धरी । नामें गणिका तारी ॥तो कोळिया घरीं । पाहुणा राम ॥४॥क्षण एक सुरवरा । नातुडे नमस्कारा ॥तो रिसा आणि वानरा । क्षेम दे राम ॥५॥राम सांवळा सगुण । राम योगियांचें ध्यान ॥राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥६॥॥७०४८॥सीतावल्लभाच्या गुणा । कोण करील गणना ॥१॥शीववरद रावण । ऐश्वर्य ज्याचें पूर्ण ॥२॥रावणासी निवटुनी । सीता आणिली सोडुनी ॥३॥बिभीषण लंकापती । केला बंधुसमप्रीति ॥४॥तुका ह्मणे दयावंत । राम दशरथसुत ॥५॥॥७०४९॥जैसा राम दयावंत । ऐसा नाहीं त्रैलोक्यांत ॥१॥अपराध कागऋषी । तेणें छळिलें सीतेसी ॥२॥दर्भ हिरवा लागे पाठीं । झाला काग तो हिंपुटी ॥३॥झाला हरीसी शरण । रामें दिलें वरदान ॥४॥तुका ह्मणे माझा राम । पतीताचे हरी श्रम ॥५॥॥७०५०॥श्रमहारक श्रीराम । भक्त काम कल्पद्रुम ॥१॥ज्याचें नाम तिहीं लोकीं । वंदियेलें तिहीं लोकीं ॥२॥पूर्ण महिमा नामाचा । अंत पुरे न वेदाचा ॥३॥तुका म्हणे नाम थोर । वेदशास्त्रांचे जिव्हार ॥४॥॥७०५१॥रामचंद्रा दयाळुवा । रावणारी सीताधवा ॥१॥रामचंद्र भक्तसखा । अनाथांचा पाठीराखा ॥२॥रामचंद्र पांडुरंग । आदिअनादि श्रीरंग ॥३॥रामचंद्र जीवप्राण । भक्ता प्रेमळाचा जाण ॥४॥रामचंद्र आदि अंतीं । तुका म्हणे सर्व भूतीं ॥५॥॥७०५२॥रामचंद्र आराधन । ज्याचे वंशीं तोचि धन्य ॥१॥रामचंद्र जया मुखीं । तोचि होय सर्व सुखी ॥२॥रामचंद्र जनीं वनीं । पाहे तोचि महामुनी ॥३॥रामचंद्रीं नाहीं मन । तुका म्हणे तो पाषाण ॥४॥॥७०५३॥अणुमाजी राम रेणुमाजी राम ॥ तृणकाष्ठीं राम वर्ततसे ॥१॥ब्रम्हाविष्णुरुद्र राममूर्ती ध्याती ॥अखंड तपती राम राम ॥२॥बाहेर भितरीं सर्व निरंतरीं ॥विश्वीं विश्वाकारीं व्याप्य राम ॥३॥रामाविण स्थळ रितें कोठें नाहीं ॥वर्ततसे ठायीं बाप माझा ॥४॥परिसा भागवत कायावाचामनीं ॥ श्रीरामावांचोनी तुका नेणे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 09, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP