मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड| सप्तवश्वनर उत्पन्न आदिखंड मंगळाचरण आद्यखंडानुक्रमणी मध्यखंडानुक्रमणि उत्तरखंडानुक्रमणी शिष्यप्रश्ननुक्रमणी बाललक्षण बाळबोधलक्षण ब्रह्मप्रतिपादक रुद्रदृष्टांत अव्दैतनिरुपण ब्रह्म निरुपण ब्रह्मीष्ट लक्षण माया गूढ विचारणा महत्तत्वनिर्धारु मातृका विवरु ऊँकार विवरण तामसोत्पन्न सात्विकोत्पन्न रजोत्पन्न तत्वें उत्पन्न आवरण भाव कर्म धर्म गुण पंच देवता उत्पन्ननाम हिरण्यगर्भ परस्परानुप्रवेशु सूत्र न्याय प्राण व्यापार वाचा व्यापारु विराट देह पुराष्टक हिरण्यगर्भविराटतनुउत्पन्न खेचर उत्पन्न पंचविध प्रकारें कर्मलक्षण पंचप्रकारें नि:कर्म कर्मबंध कर्मयोगो नाम नरदेह इतिचत्वारो खानि शरीरनिर्धार निर्धारलक्षण दृष्टांत सप्त दृष्टांतनिर्धार निर्धारयोग सप्तवश्वनर उत्पन्न ब्रह्मांडप्रळये देवत्रय प्रलय शिष्योपदेशार्थ सुदेशीशास्त्र आदिखंड - सप्तवश्वनर उत्पन्न सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी सप्तवश्वनर उत्पन्न Translation - भाषांतर ॥ अनादित्वा न्न जातोऽयमजतत्वा न्न पश्णति ॥॥ आत्मात्मव्यतिरिक्तं तु नाभिवां त्यसंभवात् ॥अनादि ब्रह्म ईश्वरु । तो चि अजन्मु सांचारु । या कारणें संहारु । नसे तया ॥१॥आणि तो कोठें हि उणा नसे । तैं स्वरुप जैसें तैसे । त्याचे लीळेये सर्वसें । होति जाति ॥२॥कां जें ईश्वरी माया शबळ । तेथें चि आटे सूक्ष्मस्थूळ ।ते रक्षु न आदि मूळ । संहारु बोले ॥३॥पूर्वी कलें निरुपण । त्या शबळ तत्पदाचें उत्पन्न । शबळ शुध्द कार्यकारण । आणिलें प्रत्या ॥४॥तो शबळु ब्रह्मगोळु । जो दिसतसे विशाळु । आतां याचा आळुमाळु । वेंचु दाउं ॥५॥च्यार सहस्र युगें मिळोनु । होय येकु ब्रह्मदिनु । येथ पर्यंत जनु । व्यापारें वर्ते ॥६॥ऐंणेंचि प्रमाणें राति । तैं सर्वही व्यापार खुंटती । ये दीनांत प्रळयीं होती । समरस भूतें ॥७॥जै पुरे ब्रह्मयाचा संकेतु । तो महाप्रळय विख्यातु । जेथ भूतें भूत ग्रासीतु । ब्रह्मगोळु आटे ॥८॥तेथ शतवर्षे खडतरु । वमे शेषु तपे भास्करु । तेणें होये संहारु । चराचरांचा ॥९॥पाठिं मुशलधारावृष्टी । विरे जळाली सृष्टी । महत् ज्वाळ व्यष्टी ।त्या प्रळयजळासी ॥१०॥तो वणवा जळावरी । करी जळाची बोहरी । मग तो सर्व ही जठरीं । वायो ग्रासी ॥११॥तो वारा व्योमी वीरे । तें व्योम अहंकारीं भरें । वेदीं वेदांतीं उत्तरें । असीं आहाति ॥१२॥या ही समर्थ येक वाणि । कैलासा ये श्रूळपाणि । ते प्रळयाची मांडणी । विचित्र असे ॥१३॥तरी मुख्य ब्रह्मा तो कवणु । कैसी युगें कोण दिनु । हे सर्व ही आइकुनु । सुखी होसी ॥१४॥तरि जो ब्रह्मीहोनी उठला । मायासंगे रुपा आला । सगुन ब्रह्म हा संचला । आदि ब्रह्मा ॥१५॥मागां केलें निरुपण । ज्याचें अंग त्रिभुवन । तो सर्वेश्वरु जाण । मूळ ब्रह्मा ॥१६॥च्यारि युगें कृतापासुनू । हें महद्युगाचें प्रमाण । यामाजी अवतार पूर्ण । विष्णुचे दाहा ॥१७॥बत्तिस सहस्र च्यारि लक्ष । हे चि अवतारसंख्या मुख्य । युगप्रमाणें प्रत्यक्ष । गणना पाहावीं ॥१८॥येकु कळी दोनि व्दापरीं । त्रेंति तिन कृतीं च्यारीं । प्रमाण बोलिलों येथ दुसरी । विचारणा नसे ॥१९॥सहस्त्रांविसां तिरेताळी सां लक्षा । हे चौकडीची संख्या । येणें चि प्रमाणें शिष्या । महद्युग बोलिजे ॥२०॥असीं सहस्र युगें पर्यंत । जीवसृष्टी होत जात । तंव वरि हे सचेत । चराचर सर्व ॥२१॥तंवरी चि ब्रह्मा सृष्टीकरिता । तंवरी चि विष्णु पाळिता । तंवरी चि संहारकर्ता । महारुद्रु ॥२२॥तंवरी च भूतव्यापारु । तंवरी शेष वरुण पुरंदरु । यम अग्री भास्करू । तंवरि चि हे ॥२३॥या दिवसां माझारीं । दाहा सहस्र वेळां हरी । खेळे नाना अवतारी । श्वास संख्यें ॥२४॥पाठि यांचे शयन । सहस्रां चौकडीयाचें प्रमाण । तैं व्यापार होति लीन । सर्वत्राचे ॥२५॥गीता वेद भाष्य वेदांतें । असी ब्रह्मायुचीं गणितें । सिध्दांत शिरोमणिचे मतें । असें असे ॥२६॥येका हा तरी चौकडीया मिळोनु । त्यासी ह्मणिजे येक मनु । चौदा मनुचा ब्रह्मदिनु । येकु होय ॥२७॥असेंचि त्याचें रात्रिमान । एवं अठाविसां मनुचें प्रमाण । हें अहोरात्र पूर्ण । ब्रह्मयाचे ॥२८॥तैं येक सहस्र नवशतें अठीयासी । होय चौकडीयाचि राशी । तैं सातसहस्र नवसें बावन असी । युगें होती ॥२९॥असें छत्तिस सहस्र दीन । हें ब्रह्म शतायुचें प्रमाण । हे गणित पुरातन । पूर्वज्ञ बोलिले ॥३०॥हें देवाचें आयुष्य ।तैं महामनु प्रत्यक्ष । असी सहस्र दाहा लक्ष । होति निमति ॥३१॥तैं चौकडीया सात कोडी । पंधरा लक्ष सहस्र अडसटी । ब्रह्मशतांचां पोटीं । इतुकें नाशे ॥३२॥तै तिनकोटि साटि लक्ष परिकर । होति विष्णुचे अवतार ।येर सुरादिक चराचर । कोण लेखी ॥३३॥या ब्रह्मशतांतु कारण । वर्षें क्रमलिं त्रिपण । दिसां मासाचें प्रमाण । जालें नाहि ॥३४॥जालिया तेरा घटीका । चाले चौदाविं अधिका । चाळिस पळें भरलीं आणिका । पळाचि प्रवृत्ति ॥३५॥गेलि येकुन पनास अक्षरें । आतां पंनासावें विचरे । असी सिध्दांति उत्तरें । शिरोमणिचिं ॥३६॥या ब्रह्म दिवसांतु कारणु । चालतसे वैवस्वत मनु । याच्या चौसटी चौकडीया क्रमुनु । हे वरिचिल जातिसे ॥३७॥ते चौकडीचे अंग । चाले चौथे कलियुग । याचें प्रवृत्ति पासुनि चांग । हें प्रमाण जालें ॥३८॥वर्षाचे गणित । अक्षर ३९६६० श्वासु ३९७६०० ब्रह्मपळ ३३८५७०० ब्रह्म घटीका १४३१३६००० ब्रह्म दिवस ८५८८१६०००० ब्रह्ममास २५७६४४८००००० ब्रह्म वर्ष ३०९१७३७६००००० ब्रह्मशतायु ३०९१७३७३००००००० उरलें आयुष्य व्दिजवरा । सेताळिस वर्षें मास अकरा । येकुनतिस दीस सां प्रहरा । वरि घटिका येकि ॥३९॥येकुनविस पळें निर्धारें । त्यावरी दाहा अक्षरें । हें भोगावें दातारें । सृष्टिक्रमिं ॥४०॥गणित असें असे याचें ।येक अक्षर ब्रह्मयाचें । येकुनचाळीस सहस्र सातसें साटी आमचे । संवत्सर होति ॥४१॥तीनलक्ष सत्यानऊ सहस्र सा शतें । यें ब्रह्मश्वासाचीं गणितें । तेतिस लक्ष पंच्यासी सहस्र सातसें निरुतें । ये संवत्सर ब्रह्म पळाचे ॥४२॥कोटि चौदा लक्ष येकतीस ।सहस्र छतिस सर्वस । ब्रह्मघटिकेचे परीयेस । संवत्सर नराचे ॥४३॥आठसें अठावन कोटी । येक्यासि लक्ष सहस्र साटी । ब्रह्म दिवसांचें पोटीं । सवत्सर भूताचे ॥४४॥पूर्ण अर्बुदें पंचविस । कोटि सातसें चौसटी सर्वस । वरि लक्ष अठेताळिस । ते मासिं प्रमाण हें ॥४५॥तीन खर्वे नव अर्बुदे वरी । कोटि येकशत तिरातरी । स्याहातरी लक्ष ते संवत्सरी । वरुषें ॥४६॥पुदातिं पद्में सुविदें । नव खर्वें सतरा अर्बुदें । तिनस्यें स्याहातरी कोटीयेइ अब्दें । ब्रह्मशताचीं ॥४७॥ब्रह्म आयुष्य तेतुलें । हें प्रमाण सांगीतलें । मागां दिवस भोगीले । तें हि बोलिलों ॥४८॥उरलें आयुष्य त्याचें । ते हि बोलिलों वाचें । हे भोगुनि त्या देवाचें । खचैल देह ॥४९॥आतां त्या देवा ना नाशु । ह हि बोलों उदासु । भूतें भूतांचा ग्रासु । आरंभे जो ॥५०॥तै पुरे सृष्टीचि अवधि । अवर्षण पडे आधी । हातु आखुडी विधी । नारायणु ॥५१॥पडे आयुष्यासी चीरा । मरण ये अमराच्या घरा । रोगा विघ्राचा खरा । डाव वळे ॥५२॥तै रुद्र प्रगटे उदासु । करी सर्वत्रांचा ग्रासु । हा अनुक्रमु सर्वसु । बोलों आतां ॥५३॥या महा भूतांचा आटणिं । प्रगटती सात वन्हि ।येदथीं सुजाणी । चित्त देणें ॥५४॥तैं मुख पसरी कृदांतु । करी सर्वाचा घातु । तेथुनु प्रगटे हुतु । काळानळु तो ॥५५॥हा काळाग्रि ज्वरु रुपें । पाडी समस्तें जीवलेपें । चित्ताग्रीचें स्वरुपें । हा चि वर्ते ॥५६॥दुजा आग्रेयदिशापति हुतु । तो सृष्टीक्रमी वर्त्ततु । तो क्रव्यादानळ मांडी घातु । वणवितु चाले ॥५७॥तो सप्तजिव्हा लाळी । ग्रामे गीरी वनें जाळी । करी सर्वाची होळी । एकें भडकां ॥५८॥पाठिं सागरीफ़्चा वडवाग्री । शोखीं समुद्रीचें पाणी । सर्व जळांची आटणी । तो चि करी ॥५९॥संचरुनि महीचां पोटीं । निर्वोल करी सृष्टी । सवें चि भुगोळ कंवटी । वडवानळु तो ॥६०॥तथा चि सहस्र कर घांसोनि । नाशा प्रवर्ते तरणि । बारा रुपें येक होऊनि ।उग्र तपे ॥६१॥त्यासी उर्मिकळा उठे । उर्मि पासुनि धूम्र प्रगटे । धूम्रे ज्योति तेथुनि दाटे । महद ज्वाळ ॥६२॥या निर्वाणज्वाळें । ग्रह तारा सर्व जळे । ब्रह्मांड ही सूर्यानळें । वणवुं लागे ॥६३॥तैसेंचि आपुलें उन्मेषें । सहस्रा ही मुषीं शेषे । वमावी माहाविषें । संहार समयीं ॥६४॥तेथ तेणें विषानळें । जळती नागकुळें पाताळें । एवं विशेष अग्रि हळाहळें । बोहरी कीजे ॥६५॥आणिक जो महिचां पोटीं । असुनि महीते आवटी । मृत्तिकेची करी खोटी । भुवानळु जो ॥६६॥जो धातु शीळा वृक्षजातु । निरंतर गुप्त शांतु । तो भुवाग्रि पुरवीं संकेतु । या भूमंडळाचा ॥६७॥सवें ची महारुद्राचा लोचनु । कैलाशीं उघडे दारुणु । तेथुनि प्रगटे हुताशनु । हराग्रितो ॥६८॥तो स्वर्गाच्या उतरडी । जालोनि करी राखोंडी ख। पाडीं सुरगणांची धेंडी । रुद्रानळु तो ॥६९॥असे व्यापार । करीति सात ही जठर तेणें हें सर्व चराचर । जळोनि भस्म होय ॥७०॥या सप्ताग्रीचा मेळु । हेळा जाळिती ब्रह्मगोळु । पाठीं आपुल्या मूळा काळ । हे चि होती ॥७१॥जैसा वेळुवाचा हुताशु । करी वनाचा ग्रासु । त्या वेळुवांचा ही नाशु । तेणें चि होये ॥७२॥॥ इति सप्तवश्वनर उत्पन्न ॥ N/A References : N/A Last Updated : March 07, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP