मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
ब्रह्म निरुपण

आदिखंड - ब्रह्म निरुपण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


॥अप्रमेयस्य शांतस्य परस्य परमात्मन ॥
॥सौम्यचिन्मात्र रुपस्य ब्रह्मणो नाकृतेनकिम्‍ ॥१॥
तंव शिष्यु ह्मणें श्रीगुरु । तुमचा आठउं उपकारु । किं कांहीं धरुनि विचारु । उत्तीर्ण होऊं ॥१॥
तरी जन्ममृत्येसी भव । याचा पुसीला ठाव । आगा आणिला थोराव । परवस्तुचा ॥२॥
जनका जनितेसी आत्मजे । किति येक उत्तीर्ण होईजे । किं उपकारु आठविजे । किति तेणें ॥३॥
त्या जनकांची उपमा । तुज विचारुं पुरुषोत्तमा । बोला नये महिमा । हीन ह्मणौनि ॥४॥
एकें संसारीं सेविलें । येरे सल काढिलें । त्याचे सामर्थ्य बोलिलें । जाय कैसें ॥५॥
परि जी पुसता परिकारु । शिष्य नसावा भिडसारु । यास्तव प्रष्णिं पुढारु । दावा मज ॥६॥
जी जी श्रृतिस्मृतिवचनें । असें बोलती प्रमाणें । जे ब्रह्मीची प्रकृति वचनें । असंभाव्य ॥७॥
हें चि ब्रह्मांड एवढें । विचारिता मनमोडे । असी अनंतें ब्रह्मांडे । माये पोटीं ॥८॥
निर्गुणापासाव थूळ । कैसें उठलें हें ढिशाळ । हे स्वामी प्रांजळ । किजे मज ॥९॥
यावरी श्रीगुरु ह्मणें । हा निर्धारु तुज बाणें । असें पडलें सांगणें । रोकडें मज ॥१०॥
तरि आब्रह्मा पासूनि भूतें । रचूनि दाखउं तूतें । गुंतसी तरी मागुतें । नाहिं ची करुं ॥११॥
जेवि लिहितां धुलाक्षरें । पाठ जालया नंतरें । पाटि पुसीजती करें । निपटूनीया ॥१२॥
तेणें लेखनयाविण । नव्हे अक्षरीं ज्ञान । यास्तव मिं सांगैन । हा उभारा तुज ॥१३॥
तरि गा ब्रह्म तें निराकार । तेथें कैचे उद्रार । नाहिं रुपगुणशरीर । नांव कासें ॥१४॥
परि तें ची बीजरुप आहे । सगुण जालें तत्कार्ये । हें सागों आश्चर्य । ये प्रसंगी ॥१५॥
हें पोरोविं कहीवहीं । विदेही जाले शुध्द देहीं । परि हे कथा पाहीं । अनंता कल्पांतची ॥१६॥
हा भवानीसी उपदेशु । आदरें बोलिले महेशु । तो चि जाला विश्वासु । बहुतां जना ॥१७॥
हें चि गोरक्ष सिध्दांति एतुलें । ज्ञानदीपकीं बोलिले । तें गुह्य ह्मणौनि ठेविलें । महा महंती ॥१८॥
ब्रह्मस्वभावें निर्गुण । रुप होवावया कारण । आपलें  न संडितां पूर्णपणे । विस्तारले ॥१९॥
तें रे नाव रेणुकारें सचलें । सूक्ष्मत्वें सदा दाटले । पूर्णपणे बोलिलें सर्वत्र जे ॥२०॥
ते चि अणॊरणीयान्‍ । ए चि महतोमहीयान्‍ । तें व्यापक बोलाया । निर्धारु असे ॥२१॥
अभ्रकणिका कारं । असें दाटलें निरंतर । तें चिदादि साचार । शुध्द सार ॥२२॥
हो कां जल डोहो निर्मळ । असें दाटलें समूळ । तें पूर्णात्पूर्ण सकळ । चिब्रह्म ॥२३॥
या पासाव उद्रारु । जाला रुपाचा निर्धारु । तो अनादी ईश्वरु । आनंदपुरुष ॥२४॥
इति ब्रह्म निरुपण ॥
सद्‍ पोरोण संचलें । चिद्‍ पूर्णत्वें दाटले । पूर्ण रुपासी आलें । तें आनंदरुप ॥२५॥
ऐसें श्रीहराचें मत । संप्रदाई हे चि साक्षांत । परि मंद बुध बोलत । अनुसारिखें ॥२६॥
याची वेगळालीं लक्षणे पुढां आहाति सांगणें । ते उत्तरखंडी आठवे कथनें । नेमु होईल ॥२७॥
असो तो ईश्वर कौतुकीं । आपणांतें विलोकिं । कां जे स्वरुपाचां सुखीं । सुखावला तो ॥२८॥
आपुला भागीं निरुतें । माया दाविली तेणें अनंते । कां जें एकाकी ना रमते । या चि स्तव ॥२९॥
देवो जाला दोनि भाग । परि न हे दुसरे आंग । तर्‍हिं बोलापुरतें चांग । देखिजत असे ॥३०॥
तें देवी देवो उभयथें । केवळ अमूर्त्त वस्तु मूर्ते । सर्वा हि कारण भूतें । प्रकृति पुरुषें ॥३१॥
तेथूनि येथवरी । नाहि भेदाची कुसरी । एकपणें चराचरीं । तें चि दोघें ॥३२॥
ते महब्रह्मभवानी । शबळमाया जगद्योनि । हें हि पुरुषा वाचूनि । रुपा नये ॥३३॥
पुरुष पूर्ण सर्वमूळ । याचि पासाव हें सकळ । परि जंबरि मायेचें बळ । तंवारि तो देव ॥३४॥
परि गा येक येकें विण । नाहिं येका हि प्रमाण । ते अतिशोभायमान । येकाचेंनि येकें ॥३५॥
तें अवछिन्नें उभय येथें । येकाचेंनि येक गौरवतें । तयाचिया वाचुनि भूतें । रुपां न येति ॥३६॥
आणि भूता हि विण पाहिं । या दोघां रुप नाहिं । येर बोलिजे तें काहीं । साच नव्हे ॥३७॥
असें असोनि चोज जाले । देवी देवातें लोपिलें । मी ह्मणौनि रुढविलें । भुवनत्रइं ॥३८॥
तो पडल तियेचे खोळे । आपुलें कांही चि नकळे । सुखा दु:खाचे सोहळे । दिधले देवी ॥३९॥
परि सर्वा भोक्ता ईश्वरु । हा रक्षिला निर्धारु ।जेवि सर्व ही उदका सागरु । सांठवण होयें ॥४०॥
तोब पडे वसुंधरे । घ्यावें एकें चि सागरें । तेवि मायेचे व्दारें । देव भोक्ता ॥४१॥
परि ते बाळें ना तरुणि नां वृध्दें । जैसी तैसी अनादि सिध्दें । तें निंच नवीं प्रसिध्दें । शंभुशांभवी ॥४२॥
तुं ह्मणसी साकारें । तें कां सांडिली विकारें । तरि या तर्कासी बारे । उत्तर असे ॥४३॥
ते आहाति हें चि पुरें । परि नव्हति सविकारें । हें वचन निर्धारें । सत्य मानी ॥४४॥
तें हे आताचें असो सकळ । पुढां सांगणे प्रांजळ । तेथ कळैल केवळ । सर्व ही तुज ॥४५॥
या पुढील कथन । करुं याचें निरुपण । तेथ ईश्वरातें दाउन । माया रुढउं ॥४६॥
हे ब्रह्म परिसाची घसवटी । अविद्या जडातें पालटी । मां प्रपंच धातुची गोष्टी । काय तेथें ॥४७॥
जेथ अंगीं कर्ता श्रीसिध्देशु । तेथ काइसा पाषान परिसु । नाहीं दुसरीयाचा अंशु । पालटे कोण ॥४८॥
॥इति चिदादित्यप्रकाशे श्रीमव्दलावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे आदिखंडे ब्रह्मनिरुपण नाम षष्टम कथनमिति ॥


N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP