मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
महत्तत्वनिर्धारु

आदिखंड - महत्तत्वनिर्धारु

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


असो ते माये ईश्वरापासून । जालें महत्तत्व उत्पन्न । तें जगाचें कारण । कार्य मूळिचें ॥४॥
तें ईश्वराचें शबळत्व । मायेचें शुध्दत्व । वोतलें महत्तत्व । तीजें देह ॥५॥
ईश्वरीं शबळ नाहीं । परि तेथें कार्य उठिलें जें काहीं । तें शबळचि देहीं। विचारावें ॥६॥
शुध्द तें साच कारण । शबल कार्याचें लक्षण । ते माये ईश्वरापासुन । शबळ शुध्द कैसे ॥७॥
तरि ईश्वरापसून शबलत्व । होय माया महत्तत्व । येर ईश्वराचे शुध्दत्व । ईश्वरीचि असे ॥८॥
माया प्रत्यक्ष उठे लपे । शुध्द नव्हे येणें पडपें । मायेचें ठाईं आरोपे । शबळचि ते ॥९॥
आजि वीर साकारी । प्रकृति शबळ निर्धारीं । आत्मा परमात्मा सर्वातरी । शुध्द होय ॥१०॥
येथ दृष्टांतु येकु । तुज देउं परमार्थिकु । या बोलाचा विवेकु । धरुनि राहे ॥११॥
जो अकुंर बिजाकारण । तैसाचि तरुसी प्रमाण । तो नाशेना ह्मणौन । शुध्द होये ॥१२॥
त्या अकुरासी तरु । कार्य होय निर्धारु । कां जे मूळ डाळे विस्तारु । त्या अंकुराचा ॥१३॥
परि त्या तरुसी कारण । बीज शुध्द नव्हे जाण । ते मूळीं नाशु पावोन । अंगी प्रगटे ॥१४॥
अंकुर वृक्षरुपें उठे । बीज सकळ भूमीं आटे । आतां शबळ श्रुध्द कोण घटे । हे विचारावें ॥१५॥
आतां असो जें महत्तत्व कवण । हे पाहिजे विचारुन । तरि जो पूर्ण अहंकारु मिपण । ते वोळखावें ॥१६॥
पिंडा ब्रह्मांडा असी थूळे । जेणें हे चळति सकळें । ते महत्तत्वा वेगळें । गणू नये ॥१६॥
हे सर्व ही माझें ह्मणत । मिं चोरुनि वर्त्तत ।तरि पाहा पा तें साक्षांत । कोण असे ॥१७॥
हे प्रत्यक्ष आत्मगुज । उदास बोलों नये मज । याचाही मध्यखंडी तुज । निर्धारु होईल ॥१८॥
बीज वृक्ष अंकुरु । माया महत्तत्व ईश्वरु । प्रकृति जीव जीवेश्वरु । याचा अनुक्रमु ऐसा ॥१९॥
॥इति महत्तत्व लक्षण ॥
बीजाधारें अंकुरु । तेवी मायेआधारे साकारु । वस्तुगति साचारु । अंकुरजात ॥२०॥
मायेसी नाहि निर्धारु । जीवात्मा नव्हे साचारु । केवळ नांदतो ईश्वरु । तदात्मातो ॥२१॥
असो आतां पुढील कथन । करुं प्रणव निरुपण । त्र्यंबकु ह्मणें तेही ज्ञान । भले असे ॥२२॥
इतिश्री चिदादित्येप्रकाशे श्रीमव्दाल वबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे आदिखंडे मायागूढे महत्तत्वनिर्धारु नामसप्तम कथन मिति ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP