मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
तामसोत्पन्न

आदिखंड - तामसोत्पन्न

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


॥श्रीगुर्वनम: ॥ ब्रह्मांडांत: स्थितो योसावर्ध्दनारीश्वरप्रभु: ।
आधारभूतसर्वानां कारणं तदुदाहृतं ॥१॥
हा बाळबोधु संचला । सर्व ही ब्रह्मेंसी उठला । वरि येथें प्रगटला । संवाद सोहळा ॥१॥
एकु देवो महद्भूतें । तें प्रत्याकारें असंख्यातें । त्रैलोक्यभरिते । भिन्नरुपें ॥२॥
एकु देवो तो भगवानु । जो अहंता पूर्ण पुराणु । तमाळनीळु सगुणु । सृष्टिसी आद्य जो ॥३॥
जो गुणत्रयीं वाटला । सर्व ही वेषु नटला । जो पूर्णपणें वोतला । जगदेवो तो ॥४॥
जे सरीते वापी कूपी तटाक सारणी । मळे राहटी गर्त्ता माथनी । नानापात्रीं भूमी सांडी विखुरिअनि । तोय चि तें ॥५॥
तेवि येकुचि परमात्मा । अहंकारें होय अनात्मा । स्वयंभेदें प्रत्यगात्मा । तो चि जाला ॥६॥
अहंकाराचां विकारीं । प्रपंचु उठे परमेश्वरीं । जेवी खळाळ निरीं । बुध्दद फेन ॥७॥
अथवा प्रगटलयां हुतीं । जैसें स्फुलिंग उठति । किंवा निवालिये घृतिं । बाहाळी कणिका ॥८॥
जेवि सींधुजळ चढे । गोठोनि होति लवण खडे । तेवि हा प्रपंचु वाढे । परमेश्वरि ॥९॥
जे महाभूतांची बीजें सारें । महामायेचें निर्विकारें । ते ईश्वरी साचारें । शांतें होति ॥१०॥
तत्वाचें बीज महत्तत्व । जें अहंकाराचें शुध्दत्व । नेणें त्रिविधपणें कर्तृत्व । सृष्टिचें केलें ॥११॥
तेथिचा गुण विकारु ।तो ब्रह्मा हरि शंकरु । ते दिहोनि आकारु । त्याचा जाला ॥१२॥
उच्चु अहंकारु तामसु । तो प्रत्यक्ष महेशु । जे ठाई उत्पत्ति नाशु ।सर्वत्रांचा ॥१३॥
मध्यस्थानी सात्विकु । तो विष्णु सर्वव्यापकु । निर्मळु शुध्द सत्वात्मकु । स्थिति कर्त्ता ॥१४॥
अधस्थानी राजसु । तो सृष्टी लोकेश्रु । शक्तित्रयाचा विश्वासु । हा चि घेणें ॥१५॥
असो हें तामसें अहंकारें । द्रव्य शक्तिचेनि विकारें । जनिलीं पंचभूतें साचारें । विषयांसहित ॥१६॥
द्रव्यभूमि निक्षेपिली । तें बीजें अकुंरासी आली । तामस घनें विस्तारलि । येथवरि ॥१७॥
तामसाचें नि पैसें । नभ उठिलें आपैसें । जयातें ह्मणिजत असे । निरालंब ॥१८॥
तामसाचें पूर्णपण । तें निश्चयें गगन । खंब्रह्म हें वचन । बहुत असे ॥१९॥
तें व्योमनिजमूळ दाटलें । यास्तव शब्देंसी उठलें । शब्द उठतां हेलावले । तो पवनु जाला ॥२०॥
त्या वायोचें घसवटीं । दाटलेनि शब्दें स्पर्श उठी । तेणें प्रगटी आगिठि । महा तेजाची ॥२१॥
नभावाताचेंनि पैसें । आकारलें शब्द स्पर्शे । प्रभा उठली प्रकाशें । रुप गुण तेजी ॥२२॥
तथा चि खं अनिळा नळें । शब्द स्पर्श रुप मेळे ।उठलेनि धूम्र कल्लोळ । जन्मलें जळ ॥२३॥
नभ वाताग्रि आटोपें । सहित शब्द स्पर्श रुपें । खळाळित रस गुणेसी आपें । मूस बांधली ॥२४॥
आपया वरी गोटलें । ते भूमंडळ रुपा आलें । गंधगुणें आथिले । निजाकारे ॥२५॥
जो उठे ज्या पासुनु । तो चि त्याचा निज गुणु । दुसरियाचा आनु । संसर्गीकु ॥२६॥
शब्द गुण गगनी । शब्द स्पर्श पवनी । शब्द स्पर्श रुपवन्हि । गुण त्रयें ॥२७॥
शब्द स्पर्श रुप रस । हें जळीं गुण उदास । शब्दादि सर्वस । महीचे गुण ॥२८॥
पितयाचा गुण न संडी । विशेषें आपुला गुण काढी । एवंभूता भूतपरवडी । वाढले गुण ॥२९॥
अतिसूक्ष्म गगन । एका विशेषे येक कठिण । हें भूमंडळ गहन । रुपा आलें ॥३०॥
आणि विरुध्द भूताचें लक्षण । जन्मले एक एकापासून । हे हीं करुं कथन । उकले तैसें ॥३१॥
तरि जेव्हढें जें जें चळें । तेथ प्रगटावें अनिळें । तो व्योमी बोलाचें बळें । असा जाला ॥३२॥
मथनांचा देठी । आत्सादलें तेज उठी । वात स्पर्शघसवटी । जन्मला हुतु ॥३३॥
जेथ हुतु प्रगटे । तेथ सलोलता उमटे । धूम्रें झरती थेंबटें । स्वेदु तें आप ॥३४॥
मुरालेपणाचे सेवटीं । होय रसाची खोटी । ते हे प्रत्यक्ष सृष्टी । आली रुपा ॥३५॥
उंच निच भुवन । हे उदकाचे गुण । मृत्तिका ओळखे ते पाषाण । भर्वसेनि ॥३६॥
इति तामसोत्पन्न ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP