मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड| ब्रह्मीष्ट लक्षण आदिखंड मंगळाचरण आद्यखंडानुक्रमणी मध्यखंडानुक्रमणि उत्तरखंडानुक्रमणी शिष्यप्रश्ननुक्रमणी बाललक्षण बाळबोधलक्षण ब्रह्मप्रतिपादक रुद्रदृष्टांत अव्दैतनिरुपण ब्रह्म निरुपण ब्रह्मीष्ट लक्षण माया गूढ विचारणा महत्तत्वनिर्धारु मातृका विवरु ऊँकार विवरण तामसोत्पन्न सात्विकोत्पन्न रजोत्पन्न तत्वें उत्पन्न आवरण भाव कर्म धर्म गुण पंच देवता उत्पन्ननाम हिरण्यगर्भ परस्परानुप्रवेशु सूत्र न्याय प्राण व्यापार वाचा व्यापारु विराट देह पुराष्टक हिरण्यगर्भविराटतनुउत्पन्न खेचर उत्पन्न पंचविध प्रकारें कर्मलक्षण पंचप्रकारें नि:कर्म कर्मबंध कर्मयोगो नाम नरदेह इतिचत्वारो खानि शरीरनिर्धार निर्धारलक्षण दृष्टांत सप्त दृष्टांतनिर्धार निर्धारयोग सप्तवश्वनर उत्पन्न ब्रह्मांडप्रळये देवत्रय प्रलय शिष्योपदेशार्थ सुदेशीशास्त्र आदिखंड - ब्रह्मीष्ट लक्षण सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी ब्रह्मीष्ट लक्षण Translation - भाषांतर ज्ञत्व कतंत्व भोक्तृत्व -साक्षित्वादिविभावनात् ।शक्तयो विविधं रुप धारयंतो बहूदकं ॥१॥ईश्वर शुध्द निर्मळ । तो जगदादि जगन्मूळ । अनादि अंतु केवळ । हा चि होय ॥१॥येथें चि वेदां मुरकंडी । वळली वाचांसी बोबडी । दर्शनें जालीं वेडी । ये चि ठाईं ॥२॥समुद्रु शिवे शिवे । तो गंगा चि जाय जीवें । त्या महार्णवा सांठवावें । हें तो न घडे ॥३॥निशा समूळ वोसावें । तों चि प्रभा दाविती दीवे । ते ही सूर्या प्रकाशावें । हे तों अघट सर्व ॥४॥तेवी ईश्वरीं क्रिया बुडे । साधन दाविजे पुढें । तयां केवी आंतुडे । ब्रह्मसुख ॥५॥परि अनुभवाची खुण । ब्रह्म जाणे तें ब्रह्म ज्ञान । तेथ ठकमक वाचून । काय असे ॥६॥तें महासुखनिधान । परबुधां माजवन । ते यासी मर्यादा कवण । करील बा रे ॥७॥जो कष्टे जीवपणें । त्याचें आंगीं पूर्ण बाणें । आणि हें विश्व ही तेणें । ते चि देखिजे ॥८॥ब्रह्म प्रपंचातें आधिष्ठी । किं प्रपंच ब्रह्मांचां पोटीं । ना ना ब्रह्म प्रपंचा घसवटी । एकपणाची ॥९॥ब्रह्मीं प्रपंचु हे नेमु । तथा चि प्रपंचामध्ये बह्म । हे कां मी आणुं वर्म । ज्ञाते जाणती ॥१०॥परि यासी हि बुधजन । मज देखति दूषण । नाहीं ब्रह्मीं प्रपंच भिन्न । तरि कोणातें काय ॥११॥या भेदमताचे दृष्टांत । हो ऐक्यतारहित । रे हें ब्रह्म सदोदित । प्रपंचु गोठला ॥१२॥जळीं तरंग निरंतर । कदा हि न पडति बाहिर । कीं वन्हिवेगळें साचार । दीप नव्हति ॥१३॥वायूचें धांवणें वेगाडे । तर्हि तें नभनभीच तेव्हढें । किं सुतावेगला न पडे । कापडभारु ॥१४॥निवडी विधाता हि आपण । तर्हि नव्हैल हेमाभिन्न भूषण । किं पोतासु परिमळु आन । शिवें हि न कीजे ॥१५॥समर्थ गिरिजा येवढी । न गळवे अमृताची गोडी । किं नादीहूनि शब्दु आसुडी । हा देवो नसे ॥१६॥तेवि उभारा नानामतांचा । भेदें फोडिति प्रपंचा । तर्हिं ते ब्रह्मविद् ब्रह्मींचा । चढेले ना ढळे ॥१७॥वेदासारिखा समर्थु । ब्रह्म प्रपंच दावी व्द्यर्थु । असा वाढविला मथितार्थु । भेदसूत्रें ॥१८।तों तो अभेदु आइता असे । मग सुखावला पूर्ण दशे । ब्रह्म चि प्रपंचु असें । नेमिलें तेणें ॥१९॥हें चि ब्रह्मिष्ठाचें लक्षण । ब्रह्म जाले आपण । ते ब्रह्म प्रपंच भिन्न । देखती चि ना ॥२०॥कहीं तर्हि देवा स्वप्रीं । भेदु देखते कां ब्रह्मज्ञानी । कां भेदु नित्य ह्मणौनि । ऊँ थारते कां ॥२१॥कां बालचेष्टनें पुरतें । भेदु आहे हे बोलते । तर्हि साच वाटतें। अस्मादिकां ॥२२॥डोळां दाटितां बोटें । सर्व व्दिधा उमटें । असें तर्हि भेदवाटे । लाविते कां प्रबुधा ॥२३॥तपना प्रीति येति थोर । आंगिं वमता हिमकर । कां थिलरीचें नीर । घेऊनि धाता ॥२४॥हें सहस्रकरा अस्या सिध्दि । तमातें वाउनि स्वस्कंधी । सुखें रयनीमधी । नृत्य करितां ॥२५॥तैं या दृश्याचें टवाळें । ब्रह्मीष्टा फळतें कोण्हें काळें । त्यांची वासना हि न विटाळें । भेदभावीं ॥२६॥शशिसूर्याचिये भेटी । परस्परें तमाच्या गोष्टी । करी ते तै दृष्टी । दिसतें व्दैत ॥२७॥स्वमार्ग सांडूनि भास्करा । जाणें होय दिगंतरा । तर्हि तेजर हितें अंधकारा । योग्य नोहे ॥२८॥तैसा केव्हां कोण्हें पाडे । प्रबुध प्रपंचीं मुरडे । तो प्रापंचिक तेव्हढें । तें चि देखे ॥२९॥आणि बृहदार्णिकीं वेदु । समूळ निरसिला भेदु । ‘ यव्दैतं न पश्यति ’ हा संवादु । पोषिला तेथ ॥३०॥सिध्देशें नरसिंहें कमळाकरें । आह्मां दाखविलें निर्धारें । तें केव्हां तर्हि दूसरें । देखतो कां ॥३१॥हरहर सिध्दनाथा ।येक हि न ठेविसीच माथा । तेथ व्दैताची कथा । काय आह्मां ॥३२॥ब्रह्म जालयाहीं बोले असा । येवढा माझाचि धिवसा । समर्था आत्मनिष्ठा भाशा । उठैल कां हे ॥३३॥जेंहि वोपिलें माझां हातीं । त्यासी काये हे नव्हति मति । परि उरि बोला पुरती । कैंची तेथें ॥३४॥ज्ञाते ब्रह्मप्रतिपादक । ये भूतळीं बहुत लोक । ते कथा किडाळक । मिर्विती काय ॥३५॥तया ब्रह्मानंदु थोरु । आनंदे आपुला हि विसरु । यास्तव हेतु अंकुरु । पळपोनि जाय ॥३६॥ब्रह्मविद् ब्रह्मसुखें । निवात राहे नोबले मुखें । अजा सर्गु देखे । तयापरि ॥३७॥ पुरुष कामिनीचे आर्त । निवालयां ठकाचें चित्त । किं परपदीं अकस्मात । दीन बैसे ॥३८॥किं निधि आतुडे परवरीं । ते उगेयाचि विस्मो करी । किं तस्करु पडे भांडरीं । समर्थाचा ॥३९॥जातिअंधा दृष्टो प्रकटे । देखनेयाचा पाटा फुटे । किं दु:खजर्जरां प्रेतां भेटे । अमृतरसु ॥४०॥किं मुकें अमृतें घालें । सर्व अंगीं बांबळलें । प्रेमे डोलों लागलें ॥ सांगेल काई ॥४१॥त्या अखंड ब्रह्मीं आठऊं । वरि हा चि निगे प्रस्तावो । तैं कैसा सांठवेल भावो । त्यांचा देहीं ॥४२॥जैसें आधीं चि घुमे संचारे । वरि डाहाकु वाजे गजरें । तेवि अंगीं सुभरें । सुख त्यांचां ॥४३॥ते देखती बोलती आइकती । हुंकारें तेणें चि उठति । ते ब्रह्मानंदें डुलती । ब्रह्म चि तर्हिं ॥४४॥तेणें वदन विकाशें । आळु माळु ये हांसे । नेणों काई चि उल्लासे । उठती बोल ॥४५॥ते शरीरि न संटे । शिरा त्वचा त्राहाटे । प्रेमभरितेनि दाटे । सर्वाग त्याचें ॥४६॥कंठ भरे सद्रदित । उकसां बुकसीं फुंडत । तेणें होतसे सकंपित । हॄदयनाभि ॥४७॥तें प्रेम चि केवळ । उठति स्वेदबिंदु सकळ । नेत्रीं नासिकीं जळ । धारा फूट ॥४८॥पाठीचे मणी भरती । प्राणु पडे आवृत्ति । आसनेची उडती । अस्माई पणें ॥४९॥त्वचा कंपित अनुरागीं । रोमांच उदैत आंगी । धन्य धन्य ते जगीं । प्रेभ भरित ॥५०॥तयाचया विकारा । रुप नव्हे शिष्यवरा । जे पढियेते ईश्वरा । जीवें प्राणें ॥५१॥ते जीवन ईश्वराचें । कीं ईश्वर जीवन त्याचें । हें मीं प्रेम अल्प वाचे । किती आणू ॥५२॥ते जीउतें पाहाती । तीउते जीव उध्दरती । तीर्थे पवित्रें होति । जयाचेंनि ॥५३॥ते ईहलोकीं तरि सुलभ । परि ज्ञान प्रकाशाचेंनभ । ते सृष्टिचे स्तंभ । पवित्रपणें ॥५४॥तें चिदात्मपदिचें इंद्र । बोधप्रकाशाचें चंद्र । ते आनंदाचें समुद्र । हेलावती ॥५५॥ते मोक्षोदया भास्कर । ते शांतिचे प्राणेश्वर । ते सायुज्यतेचे उदार । आदि दाते ॥५६॥ज्यासी बोलतां बोलाचा सिणु । त्यासी कविकाव्या उपा ऊँ कवणु । त्याचा आनंदु राखुनु । बोलिजे आह्मीं ॥५७॥जेवि लेकुरें खेळती । खुतां लक्ष ठेविति ।तेथ श्रमनिवृत्ति । होये तया ॥५८॥बाळ स्वइच्छा रीगे । मातेचे वोसगां निगे । ते विश्रांति वावुगें । सिणले पण ॥५९॥तेवि प्रपंच बोलतां । प्रेम न भरेल चित्ता । यास्तव पूर्णता । सांडो नये ॥६०॥प्रपंचु तरि दाखवावा । परि आत्मतंतु न संडावा । आत्मेनचि चेतवावा । ठाई ठाईं ॥६१॥एवं जे होय विश्रांति । पोषे श्रोतयांचि चित्तवृत्ति । यास्तव पुडत पुडती । हेंचि बोलणें ॥६२॥इति ब्रह्मीष्ट लक्षण ॥ N/A References : N/A Last Updated : March 07, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP