मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड| पंचविध प्रकारें कर्मलक्षण आदिखंड मंगळाचरण आद्यखंडानुक्रमणी मध्यखंडानुक्रमणि उत्तरखंडानुक्रमणी शिष्यप्रश्ननुक्रमणी बाललक्षण बाळबोधलक्षण ब्रह्मप्रतिपादक रुद्रदृष्टांत अव्दैतनिरुपण ब्रह्म निरुपण ब्रह्मीष्ट लक्षण माया गूढ विचारणा महत्तत्वनिर्धारु मातृका विवरु ऊँकार विवरण तामसोत्पन्न सात्विकोत्पन्न रजोत्पन्न तत्वें उत्पन्न आवरण भाव कर्म धर्म गुण पंच देवता उत्पन्ननाम हिरण्यगर्भ परस्परानुप्रवेशु सूत्र न्याय प्राण व्यापार वाचा व्यापारु विराट देह पुराष्टक हिरण्यगर्भविराटतनुउत्पन्न खेचर उत्पन्न पंचविध प्रकारें कर्मलक्षण पंचप्रकारें नि:कर्म कर्मबंध कर्मयोगो नाम नरदेह इतिचत्वारो खानि शरीरनिर्धार निर्धारलक्षण दृष्टांत सप्त दृष्टांतनिर्धार निर्धारयोग सप्तवश्वनर उत्पन्न ब्रह्मांडप्रळये देवत्रय प्रलय शिष्योपदेशार्थ सुदेशीशास्त्र आदिखंड - पंचविध प्रकारें कर्मलक्षण सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी पंचविध प्रकारें कर्मलक्षण Translation - भाषांतर जालया ब्रह्मबोधु । तुटे सर्व ही सन्मधु । पाठी सांग पां मोक्ष बंधु । कोणा बाधे ॥५२॥जेथ ही जड कमीं प्राणी । प्रवर्त्तलेम याचां दूषणी । जैं कर्मभोगावाचुनि । भलेम नाही ॥५३॥देव ग्रह भूत पितर । हे वोळगावे निरंतर । येणें चि सुगम साचार । फळ लाभे ॥५४॥हे प्रत्यक्ष जीवदशा । येथ ब्रह्मबोधु काईसा । यास्तव करणीचे आरिसां । प्रकाशे सर्व ॥५५॥कर्म करणी ये वाचुनि । फळ पाविजे कैसेंनि । इहपर ये दोन्ही । गोरवती फळें ॥५६॥बोलती अध्यात्मिक येक । ह्मणति कर्म भवदायक । तरि भर्वसेनि भवनाशक । दुजे तें काई ॥५७॥जीवें ब्रह्म होईजे । अथवा शरीर ब्रह्मत्वें गाजे । एक मळमूत्राचि बीजे । केवळे होति ॥५८॥हे प्रत्यक्ष जीवदशा । येथ ब्रह्मबोधु काईसा । पांगुळ चढे आकाशा । तर्हिं न घडे ॥५९॥घेउनि सूर्याचेंनि महिमान । आंगें चालवीं दिनमान । तै जीवा ब्रह्म भुवन । साध्य होते ॥६०॥तव अकर्मि ह्मणति आन । सर्वा कारण हें चि ज्ञान । जें कर्म क्रिया भजन । न सरे येथें ॥६१॥जो वर्ते कर्मसुरवाडें । तो चि संशयार्णविं बुडे । जन्म मरणाचे दुषडे ।अटक त्यासी ॥६२॥ईच्छिलें बोधे कौतुकें । ईच्छा रहित केवि चुके । यास्तव न किजे तें निकें । सर्वे परि ॥६३॥शीतळ भावें कल्पुनु । अंजुळी भरीजे हुताशनु । तो पोळविची वांचुनु । निववुं नेणें ॥६४॥अमृतश्रध्दे विष । काये नाशील मृत्युदोष । तृप्ति कल्पितां ही अशेष । क्षुध्दा न वचे ॥६५॥इच्छा रहित तिखाळ । काय पोटीं नुरपे शूळ । अन्न संसगे हरळ । दंशा न पवे ॥६६॥मवाळतेचेनि सोसे । न करावें सर्पाचें उसीसे । आतां उगेयां करीजे तरि असें । होउं पाहे ॥६७॥तरु लावावे मौन्यवृत्ति । तरि काये ते वांझ होति । उगयां बीजें पेरिजे सेति। नुगवे काये ॥६८॥यास्तव न करितां सर्व भले । असें येकीं देखिले । यासी छलावया उठले ।भलें ज्ञानी ॥६९॥जे निवाले ब्रह्मज्ञानें । त्यासी जन स्थिति रक्षणें ।बुध्दि नि:कामनें । करिति कर्में ॥७०॥तें कर्म आंगीं झलंबे । तैं पावका लागलें वोलंबे । किंआछादिला पुष्प बिंबे । दिवाकरु तो ॥७१॥मृत्तिका खादलें पंधरें । अमृता रोगु संचरे । तैं ब्रह्मिष्ठां लागे कावरें । कर्मफळाचें ॥७२॥ब्रह्मज्ञानें सतिकें । कर्में निफजती अनेकें । ते होति बाधकें । असें कैचें ॥७३॥असा निर्धाराची प्राणी । तो वर्ते पुनर्योनी । तैं दर्पणाचा सुवर्णी । नांदणे जालें ॥७४॥कां गळति तरुचे पत्र । देठिं लागे सर्वत्र । कां तुटलें नक्षत्र । नभीं बैसे ॥७५॥कां अग्रीचें होयो इंधन । कां पाकाचे होती कण । तै पुनर्योनि घेउन । उठे ज्ञाता ॥७६॥ब्रह्मस्थित बुध्दि । कर्म कहीं हीं न बाधी । सेवितां अमृतोषधी । व्याधि जैसी ॥७७॥बैसलेया भानुचे बोतपले । अंधकारु कैसा कवळे । तैसी त्या कर्मफळें । हाता न येति ॥७८॥असतां गरुडपाची हांतिं । जैसी सर्पाचि जाती । तेवि ब्रह्मिष्ठा होति । कर्माकर्में ॥७९।समर्थ वेदाची आज्ञा । ते पाळावी सर्वज्ञा । यस्तव कर्माची संज्ञा । सांडों नये ॥८०॥जे याचक दानाचे परी । करेम करिती निर्धारी । असें उदार शरीरी । स्वामी माझे ॥८१॥कृपण फलाशा लोधले । तैसें नव्हती ते दादुले । सवेंचि निष्टुर जालें । उदास असे ॥८२॥ते दाटोनि कर्मे चाळिति । ईश्वराआज्ञा पाळिति । वर्ण संकर चुकविति । महा महंते ॥८३॥असी आइकुनि वचनें । शिष्यु श्रीगुरुसी ह्मणें । जी तुमतें पुसणें । आहे मज ॥८४॥हां जी अकर्म ते कवण । कर्म भ्रष्टाचें काय लक्षण । कर्मा कोण प्रमाण । विकर्म कैसें ॥८५॥नि: कर्म कोणें पाडे । हें सांगा मज पुढें । तंव गुरु बोलोनि कोडें । आईक ह्मणती ॥८६॥जें काहीं कर्म न करिती । ते अकर्मिं बोलिजति । स्वधर्म सांडोनि अन्यधर्मीं प्रवर्त्तती । कर्मभ्रष्ट तो ॥८७॥जो स्वधर्मु विचारु । शास्त्र उपदेशु वृध्दाचारु । तेंचि कर्म हा निर्धारु । जाणिजे नेमें ॥८८॥कर्में उंचवटें परिनिष्ठें । नैमित्यें रुपें अति श्रेष्टें । असी आरंभकें उत्कृष्टे । ते वीकर्मे होति ॥९०॥जें जें बोलिलें तें ते कर्मे करी । केलयां फळहेतु न धरी । तें नि:कर्म ईश्वरी । ज्ञानरुप ॥९१॥॥इति पंचविध प्रकारें कर्मलक्षण ॥ N/A References : N/A Last Updated : March 07, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP