मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
विराट देह

आदिखंड - विराट देह

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


आतां असो हा अनुक्रमु । सांगों विराटाचा नेमु । जो जाला कर्द्दमु । एका भागाचा ॥७१॥
ज्याचें अंग त्रिभुवन । सप्त पाताळें चरण । सर्व स्वर्गाहोनि गहन । शिर त्याचें ॥७२॥
ज्याचा शरीराचा मेळु । तो हा सर्व ब्रह्म गोळु । वाचा अनुक्रमु सकळु । प्रगट कंरु ॥७३॥
तृण वल्ली गुल्म दृम । हे विराट पुरुषाचे रोम । नाडी शीरा उत्तम ।सर्व सरिता ॥७४॥
जें झरें सप्तव्दारीं । तें चि सिंधु निर्धारीं । याचि वस्ति उदरीं । सिध्दांति असे ॥७५॥
क्षार समुद्र असे लिंगीं । पंकज समुद्र गुद भागीं । दधि समुद्र घ्राण मार्गी । घृत समुद्र वीर्य ॥७६॥
क्षीर सिंधु वदनीं । मधु समुद्र श्रवणी । नीर समुद्र नयनी । जाणावें असें ॥७७॥
इंद्र तयाचे हात । जठर अनळ निभ्रांत । यमु दाढा दांत । पुत्र कळत्र ॥७८॥
रसना तो वरुणु । राक्षस ते गुदस्थाना । वसंतु गंधु घ्राण । वैद्यराजु ॥७९॥
जें बोलिजे ब्रह्मव्दार । तें देवाचें कैळास पुर । सत्यलोकु शी । ब्रह्म भुवन ॥८०॥
तपोलोकु ते निडाळ । जनलोक ते मुखंमंडळ । महर्लोक केवळ । कंठु त्याचा ॥८१॥
ज्योर्तिलोक वक्षस्थळ । नाभि नभमंडळ । दिश तें सकळ । कर्णव्दारें ॥८२॥
चंद्रु तो याचें मन । नारायण अंत:करण । असो हें पूर्वीं चि निरुपण । केलें सकळ ॥८३॥
सूर्य ते नयन । जळ वृष्टि द्रवण । प्रजापति शिश्न । प्रसिध्द याचें ॥८४॥
कटि बस्ति सकळ ळ। हे सर्व ही भूतळ । महामारुत समूळ । त्वचा होये ॥८५॥
जघन ते प्रथम तळ । उरु अतळ जानु वितळ । पोटरिया सुतळ । महातळ घोंटि ते ॥८६॥
पादपृष्ठे तळातळ । पादतळें रसातळ । एवं पाताळें सकळ । चरण देवाचें ॥८७॥
मृदातें भांस सकळ । भ्रूपलवें मेघपटळ । देह अंगाचे मळ । ते चि गीरी ॥८८॥
शरीर भूमी जळ शोणित । तेज ज्योति प्रकाशवंत । पवनु प्राणु निभ्रांत । आत्मा गगन ॥८९॥
कटिअध पाताळ लोकु । कटिकंठ मध्य लोकु । कंठऊर्ध्व्द स्वर्ग लोकु । वोळखावा ॥९०॥
एवं त्रिखंड हें चि त्रिभुवन । हे चि त्री पुत्री त्रयस्थान । कंठ मर्यादे पासुन । पिंड ब्रह्मांड बोलिजे ॥९१॥
या जीवयोनि नानापरी । तेथे जीवजंतु शरीरीं । केश ते अंबरी । तारांगणें ॥९२॥
जैसें सप्त कंचुक पिंड । तैसें सप्तावरण ब्रह्मांड । आतां सांगो कोड । अष्टपुर तें ॥९३॥
॥इति विराट देह ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP