मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
निर्धारलक्षण

आदिखंड - निर्धारलक्षण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


॥ द्रष्टदर्शनदृश्याख्यो विश्वात्मा प्रत्यय: कुत: ॥
॥ समस्तकल्पनोन्मुक्त युक्तं परमया धिया ॥१॥
द्रष्टा दृश्य दर्शन । हें चि भेदाचें लक्षण । कं जे ध्येय ध्यात ध्यान । न साहे येथें ॥१॥
हा विश्वात्मा विश्वभरितु । असें गर्जे वेदांतु । मिशिये घातला हातु । उपनिषदि ॥२॥
या कारणें ध्येय ध्याता ध्यान । हे त्रिपुटी भेदासी कारण । जें तो विश्वात्मा विश्वेसीं आन ।होऊ नेणे ॥३॥
ह्मणौन बहुतें प्रकारे । हे कळुनि घेणें चातुरें । पाठिं तो येणें चि ज्ञानव्दारें झ। मुक्तिपद पावे ॥४॥
असी ये युक्तिचे प्राणी । ते परम धीमंत ज्ञानी । ये दशेस्तव मांडनी । मांडिला ग्रंथु ॥५॥
सांडौनि सर्व अभिमानु । ये शास्त्रीं होय लीनु । तो ब्रह्मपरायणु । बहुतां मध्ये ॥६॥
येका ज्ञानास्तव कष्टिं । गुरु सेविजे संतुष्टीं । तेथ ही देखिजे दृष्टी । अति दुर्लभ तें ॥७॥
असी या अनेका ज्ञानबुध्दी । गुरुगभ्याच्या सिध्दि । त्या सकळा बाळबोधीं । गिवसुनि घेणें ॥८॥
जे गिरिजे कृष्णा सावर्णिका । नंद भृंगी कपिला कार्त्तिका । मीन मनु इत्यादिका । उपदेशु जाला ॥९॥
र्ते नव्हती चि प्रगटे । भरली समर्थाची पोटें । माझे अहाच मुखावटे । बाहिर पडे ॥१०॥
वर्षतां धारें धराधरे । थेंबु न टकावा सागरें । परी गा उचंबळती थिलरें । अस्माइ पणें ॥११॥
असें समर्थाचा शरीरी ।गुह्ये थारली यापरी । मी उचंबळलों बाहिरी । ग्रंथवोघे ॥१२॥
जो उपदेशु केला उमा ईशें । तो चालिला ग्रंथमिषें । यास्तव आणिकें हव्यासें । भरुं नये ॥१३॥
तुज निर्धारु येकु घटे । असें उपचारु गोमटें । तुं पाहे नेटेंबोटे । आपणांते ॥।१४॥
येथ येकु चि गा वर्म । आहे सोपारें सुगम । जे मिंपणाची सीम । उलंघुनि पाहे ॥१५॥
तंव येरु ह्मणे श्रीगुरु । मी ह्मणतां ईश्वरु । तो फुटोनि जगदाकारु । असा जाला ॥१६॥
तरि मी अहंताजनित । ठाईहुनी मतिभ्रमित । वरि मज मिं ह्मणतां हित । होईल कैसें ॥१७॥
ज्वरीता संचरे फांटा । किं मदिरापान मर्कटा । तैसें मिंपण । जडदेहासी ॥१८॥
यावरी बोले येरु । तुं असे नको विचारु । जें मिं म्हणतां संसारु । भारु होय ॥१९॥
मिं मज पाहतां केवळ । आंतुडे याचें सर्व मूळ । तेणें होईजें निर्मळ । ते चिं वस्तु ॥२०॥
तो जीव मी कोण ये हेतुभरें । तो तेणें चि जीवपण सरें । पाठी ईश्वर संचरे । सुखी होय ॥२२॥
जैसा नटु भरे उपाधी । तै नाथिला सोंग संपादी । सोंग सांडी तैं सीधी । नट बुध्दि तया ॥२३॥
तेवी ब्रह्मी हेतु भरे । तैं वाटे जीवाकारें । जीवु जीवदशा सारितां निर्धारें । हाचि ब्रह्म ॥२४॥
परि त्या देवाचेंनि वेधे । सर्व ही साकार बाधे । पण साकार मळेंसुधे । स्वरुप न मैळे ॥२५॥
जेवि ग्रहणाचें दीवसी । सूर्यो वेधे आकाशी । प्रतिबिबें हि तैसी । झाकोळति ॥२६॥
परि गा प्रतिबिंब वेधे । मुखबिंब न बाधे । तैसें स्वरुप सुधें । प्रपंचे न मैळे ॥२७॥
एणें ईश्वर वेदगुढे । प्रकृतिजात तेव्हढें । झाकोळे कीं दृढें । अहंता अंशे ॥२८॥
जैसें सूर्य बिंब वाटोळे । रैसी चि प्रतिबिंब सकळें । गवाक्ष रश्में हि वर्तुळें । येती भूमी ॥२९॥
देखोनि सूर्याचें ग्रहण । तुं द्रष्टा होय आपण । मीं सांगैन तें खुण । दृढ धरी ॥३०॥
तरु गृहीं सकळें । रश्में येति वर्तुळें । तै रवीबींबा असी मंडळें । ग्रासलीं येती ॥३१॥
आत्मयाचें सर्व जीव । परी आत्मसामर्थ्य भाव । ते हे नेणती सर्व । निर्धारेंसी ॥३२॥
सींधुचें सामर्थ्य नये लवणा । मेरुचें सामर्थ्य नये भूषणा । तेवि शिवसामर्थ्य जना । येईल कैचें ॥३३॥
तेवि पूर्णापासाव सर्व । अपुरीं भूतें जीव । परि तेथिचि ठेव । यासी कैची ॥३४॥
॥ इति निर्धारलक्षण ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP