मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड| उत्तरखंडानुक्रमणी आदिखंड मंगळाचरण आद्यखंडानुक्रमणी मध्यखंडानुक्रमणि उत्तरखंडानुक्रमणी शिष्यप्रश्ननुक्रमणी बाललक्षण बाळबोधलक्षण ब्रह्मप्रतिपादक रुद्रदृष्टांत अव्दैतनिरुपण ब्रह्म निरुपण ब्रह्मीष्ट लक्षण माया गूढ विचारणा महत्तत्वनिर्धारु मातृका विवरु ऊँकार विवरण तामसोत्पन्न सात्विकोत्पन्न रजोत्पन्न तत्वें उत्पन्न आवरण भाव कर्म धर्म गुण पंच देवता उत्पन्ननाम हिरण्यगर्भ परस्परानुप्रवेशु सूत्र न्याय प्राण व्यापार वाचा व्यापारु विराट देह पुराष्टक हिरण्यगर्भविराटतनुउत्पन्न खेचर उत्पन्न पंचविध प्रकारें कर्मलक्षण पंचप्रकारें नि:कर्म कर्मबंध कर्मयोगो नाम नरदेह इतिचत्वारो खानि शरीरनिर्धार निर्धारलक्षण दृष्टांत सप्त दृष्टांतनिर्धार निर्धारयोग सप्तवश्वनर उत्पन्न ब्रह्मांडप्रळये देवत्रय प्रलय शिष्योपदेशार्थ सुदेशीशास्त्र आदिखंड - उत्तरखंडानुक्रमणी सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी उत्तरखंडानुक्रमणी Translation - भाषांतर यापुढां उत्तर खंड । तें अतिपाडें गोड । तेथें पुरवावें कोंड । माझे देवा ॥८५॥नव देहें नवांकितें । ब्रह्म मशक पर्यत । हेंही निर्धारवंत । बाणें तें करा ॥८६॥त्या देहाची उत्पत्तिभाव । कोण जाले कोणा पासाव । आणि ब्रह्मीहोनि हे सर्व । विस्तारले कैसें ॥८७॥त्याचि स्थीति थारली कैसी । कोण प्रमाण त्यासि। आणिक अयुष्याची राशी। कोणा कैसी ॥८८॥त्याचें कैसैं संहरण । कोणाचें कोण भजन । कोणेंयुगें पावन । कोणाचें होय ॥८९॥ब्रह्मांडाएवढी ढिशाळें । कोठें थारलीं निश्चळें । वर्णाचार निर्मळे । नेमें सांगा ॥९०॥बुध्दिनिश्चय थारे । तेहिं बोलावें निर्धारें । षटपंथ व्दादश व्दारें । निरुपावि मज ॥९१॥या प्रपंचाचां निराशीं । आत्मदशा उरे कैसी । आणि ईश्वरप्राप्ति त्यासि । केवि लाभे ॥९२॥आणि या मोक्षाकारणें । उठलिं अपरिमितें ज्ञानें । तो मोक्ष कवणें । उपायें फळें ॥९३॥हा जी शूद्र ते कवण । कैसे होती ते ब्राह्मण । तेहिं कर्माचें पाळन । कैसें कीजे ॥९४॥पुढां तत्वविवरण । तत्पद त्वंपद लक्षण । शबळ शुध्द कार्याकारण । सांगावें तें ॥९५॥तत्वमसि वाक्य पदें । ते हीं सांगाविं एवंविधें । माया अविद्यासहित भेदें । निरसावया ॥९६॥सांगावें त्रयलक्षण । भेदत्नय निरसन । ऐक्यबोधा प्रमाण । काय असे ॥९७॥विवर्त्तु आणि परिणामु । याचा पाहिजे नेमु । याहि पुढां उत्तमु । असे किं नसे ॥९८॥शरीरीं ब्रह्म तें कवण । स्वरुपाचें काय लक्षण । शद्रब्रह्मा प्रमाण । काय केलें ॥९९॥साक्षाब्रह्मनिर्धार। कैसा होय साक्षात्कार । आणि सृष्टिपंथा विचार । निरुपावा ॥१००॥हा जी वेदां आधारु तो कवण । वेदीं काय प्रमाण । आणि वेदाचें महिमान । कोठवरि ॥१॥अहिंसा कोण काय हिंसा । गृहस्थधर्मु चाले कैसा । आणि वस्तुलाभु मानसा । कीति असे ॥२॥किती अहंता ईश्वरी । ते विस्तारली कोणेंपरी । आणि दोनि मार्ग सांगा त्यावरी । उत्तम काय ॥३॥सश्चिदानंदपदनेमु । आणि क्षरअक्षर उत्तमु । कर्मत्रयाचा अनुक्रमु । विस्तारावा ॥४॥कर्म जगीं आदि ईष्ट । केवि निरसे दुर्घष्ट । कर्माही कर्म श्रेष्ट । अकमसीं सांगा ॥५॥देहांति उपजे मति । कां जी होय तेचि गति । कोणें पदिं आत्मस्थिति । नेमली असे ॥६॥उपनिषदांच्या श्रृती । तेहीं काय देखिले अंति । त्या कैस्या प्रतिपादिती । आत्मराजु ॥७॥नेति काय निरसिलें । पूर्ण कवणातें देखिलें । जेथ मौन पडलें । ते कोण वस्तु ॥८॥आध्यात्मिक आधिभूतिक । तिजें आधिदैविक । हें प्रतिपादुन सकळैक । येकविध बोला ॥९॥पाठि च्यार भुमिका । निरुपाव्या सुरसिका । आत्मा दिसे तो निका । प्रकारु दावा ॥११०॥तिन्ही अहंकारु ते तैसे । दृष्टि निवळती कैसे । दावा महत्व असें । हेतु सहित ॥११॥पाठीं पूर्ण वस्तु दाखउनी । निरसा बो फळें दखोनी । जे पाहति मंदज्ञानी । प्रेत्नपूर्वक ॥१२॥सर्वा सार नयन । बहुतिं मानिलें प्रमाण । याचें हिं करा निरुपण । सविस्तर ॥१३॥जें सदोदित सर्वत्रीं दाटलें । जें समर्थ देखोनि निवालें । तें मज पाहिजे दाखवीलें । सर्वाचें सार ॥१४॥सवेंचि वासनें रुप करा । तेहीं नाहींपणे सारा । यानंतरे स्वाचारा । लावा मज ॥१५॥प्रतिष्ठा शुध्द वर्णाचार । वळा कुडा अनाचार । हा तरि येवढा संसार कोणें धर्में ॥१६॥कर्म ब्रह्म समान । किं येकाहोनि येक न्यून । हें कळल्यां मन । सैराट नोहे ॥१७॥यावीर माझा बोधु । तोही उघडैल प्रसिध्दु । पाठीं मीचि बोलेन शुध्दु । परमार्थु तो ॥१८॥यावरी संप्रदाय तेवढा । निरुपा जी मजपुढा । प्रसन्न श्रीहरु चामुंडा । तेही सांगा ॥१९॥एवं दीढशत अनुक्रमणी । रचावीं पंधरा कथनी । सिध्दि नेणें इतुकेनी । उत्तरखंड ॥१२०॥॥इति उत्तरखंडानुक्रमणी ॥ N/A References : N/A Last Updated : March 07, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP