मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
खेचर उत्पन्न

आदिखंड - खेचर उत्पन्न

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


॥चिदात्मा सर्वगोप्यानि न कचिनाम संस्थितं ॥
॥यव्दत्सर्व पदार्थानां सत्तातव्दन्महेश्वर: ॥१॥
आतां आइक विषम गोष्टी । ते हे खेचर भूतसृष्टी । येथ निवळे तुझी दृष्टी । असें बोलों ॥१॥
हा विषम तत्पदार्थु । असे झ्लंबला त्वं पदार्थु । येथ सूक्ष्म शुध्दार्थु । असे चि ना ॥२॥
ते खेचर योनि चि भूतें । समूळ सांगीजेल तूतें । तें प्रगटलीं देवतें । अंश भाविं ॥३॥
ए ब्रह्मांडी देव शरीरे । जे काळीं जालीं साकारे । तै याचें अंगे खेचरे । उठलीं सर्वें ॥४॥
जे सुराचे मळिन । उठले आभास घॆउन । जे ठाईं शुध्दपण । असेचि ना ॥५॥
वरभदें बाळका । किं दीपा काजळिका । किं बीजासी कंचुका । भिन्न होये ॥६॥
तेवीं देवाचे मळिन । निवडोनि जालें भिन्न । तें उठलें विलक्षण । खेचर सर्व ॥७॥
एहीं जीवांतें सळावें । आणि क्रूर रुपें असावें । नाना सिध्दि दैवे । ये चि देति ॥८॥
जेंजें सत्य करणें । तें याचेंनिच शोभायमानें । भूत भविष्य सांगणें । यांचेनि योगें ॥९॥
जे जे कुचेष्टा कुबुध्दि । जे जे वाढवी उपाधी । तेही यांचें चि साधी । रुपा येती ॥१०॥
दूरा दृष्टी दुरा गमन । अदृष्टी अथवा परज्ञान । वाचा सिध्दि ही येथून । वृध्दि पावे ॥११॥
जे जे करामतिचे नर। दाविति नाना विकार । त्यासी हि याचें चि आधार ।निर्धारेंसीं ॥१२॥
सिध्दा साधकां सर्वा । अगोचरिका खेचर सेवा । वाचुनि समर्था देवा । ना भजति ते ॥१३॥
धर्मु अर्थु कामु मोक्ष । यांसी देवदानी प्रत्यक्ष । येर करणी असंख्य । खेचर दावी ॥१४॥
ते वेताळ भैरव भूचर । झोटिंग ब्रह्मगरहो खेचर । क्रूर कुळज निशाचर । साप बटुक ॥१५॥
कूष्माम्ड माहिष दीर्घवदन । भूत प्रेत कुलक्षण । इत्यादि खेचर गण । शक्तिसहित ॥१६॥
सृष्टी रचतेनि काळें । उत्पन्न जाली यें सकळें । हें आईकुनि ते वेळे । शिष्यु बोले ॥१७॥
जी जी हें पूर्विची उठलें । असें तुह्मीं सांगितीलें । आह्मीं देखतसों वितलें । वर्तमान असें ॥१८॥
हें थूळ नाशातें पावत । जीवु वासना भ्रमत । ते होय भूत प्रेत । असें दीसें ॥१९॥
आणिक येक प्रमाण । रोकडे देखति नयन । मृत्युदेहाचें थापन । जेथें किजे ॥२०॥
ते स्मशानी शिळ शिखरीं । नांदती उग्रविकारीं । हें प्रत्यक्ष क्षितीवरी । देखत असे ॥२१॥
ते आपुलें इच्छाभावें । राहाणि संचरोनि घेति नांवें । हें चि देखों तरि कां देवे । निरुपीलें असे ॥२२॥
तवं येरु ह्मणें आइक वचनें । शतवर्षे देह भोगणें ।वर्तावें अल्पायु तेणें ।पिशाच होऊनि ॥२३॥
आणिक येकाचें बोलणें । जें मरुनि आधि भूत होणें । पाठीं दुजा जन्मीं घेणें । आणिक देहो ॥२४॥
येक मृत्युकाळीं । भूत वासना जे जे जाली । ते भोगावीं तेतुली । भूतयोनी ॥२५॥
येक ह्मणती दु:ष्कृते । कर्में होति हि सांधाते । भोगावया भूतें । होय प्राणी ॥२६॥
येका पुरुषांचीं उत्तरें । जो कोण्ही पूजी खेचरें । तो घेईल देहांतरें । तें चि रुप ॥२७॥।
आणिक येकांची वाणी । जे तामस बुध्दिचे प्राणी । र्ते होति मरोनि । भूतप्रेत ॥२८॥
कोण्ही अपमृत्यें जाती । कां विदेशीं अकाळीं मरती । ते भूत प्रेतें होती । अवगति ऐसें ॥२९॥
नां तरी असंस्कारें प्रेतें । अथवा उत्तरकर्मक्रिया रहितें । देहानंतरें भूतें । तें चि होति ॥३०॥
परद्रवी परदारीं । व्रतक्रियी पापाचारी । तो हि प्राणीं देहांतरी । भूत होय ॥३१॥
आणिक येकाचें उत्तर । जे नष्ट भ्रष्ट वर्णसंकर । मरणानंतरें खेचर । ते चि होति ॥३२॥
आणिक येकांची उत्तरें । जें सळावें खेचरॆं । असें मरतें निर्धारें । तें चि होती ॥३३॥
असी एकवीस प्रकारें । मतांतरीचीं उत्तरें । उत्पन्न होति खेचर । परि हें अघट ॥३४॥
यां सकळां कारण । एक चि दीसे प्रमाण । हें पूर्वी चि पुरातन । रचलें असे ॥३५॥
हें जैसें मागां सांगितलें । सत्य तैसें चि रचिलेम । एही व्यापार घेतलें । तें आईक आतां ॥३६॥
या मनुष्याचें उपार्जनें । समस्तांची उदर पोषणें । स्वहस्तें भक्षावीं अन्नें । हें त्या नाहीं॥३७॥
पितर देव ग्रहे खेचर । हे मनुष्यां वंद्य निरंतर । याचे सर्व आहार । नराकरीं ॥३८॥
पूर्विचिहोउनि देवगण । यांसीं हव्य कर्म भोजन । पितर लोकांचे पोषण । काव्य कर्में ॥३९॥
हिंसा घातें बळि विधानें । भूतीं प्रेती तृप्त होणें । ग्रह पर्वकाळ दानें । ढेकरु देती ॥४०॥
भक्ति नेमुनि देवी । मोहरां मोहरिले मानवी । श्राध्दें पार्वणें पक्ष कवी । पितर भोक्ते ॥४१॥
ग्रहाचे स्वभाव गुण । पीडा करुन घेणें दान । तैसें चि लक्षण । या खेचराचें ॥४२॥
मृत्याचा अधिकार घेउन । संचारें बोलती आनें आन । ते आपुले उदपोषण । असें करीति ॥४३॥
राहाणी सांडणें बळी । एणें तृप्त भूतावळी । इच्छिती सदाकालीं । यातें चि तें ॥४४॥
मृत्याचे अंगीकरुनि अंग । एहि घ्यावे आपुले भोग । खुणा खावणी चांग । ऊँळखि देति ॥४५॥
यास्तव सर्वहि हे वायसे । हें त्यजावें ज्ञानदृशें । तैं केवि झळंबे पिसें । असंशय़ी त्यासि ॥४६॥
जो यांसी न करी लाचुकें । तो न बाधे जाण निके । त्याचा वाटा कौतुकें । नवचावें येही ॥४७॥
हरिहर शक्तिवाचुनि । येर न फेडिती सिराणी । तरि हा सोसु सुजाणी । सांडितां भला ॥४८॥
देव पितर ग्रहे भूत । हे जेंथ भक्तिचि वोल देखत । त्यासी पीडोनि घेत । आपुले भोग ॥४९॥
यास्तव याचां पाहाटें । नलगतां येक घटे । ये बापुडीं त्याचां वाटॆ । नवचती कहिं ॥५०॥
परि ना ज्ञान बुध्दि वाचुन । न तुटे या सर्वांचे बंधन । यव्दिषईं प्रवीण । होणें चि लागे ॥५१॥
इति खेचर उत्पन्न ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP