मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड| आद्यखंडानुक्रमणी आदिखंड मंगळाचरण आद्यखंडानुक्रमणी मध्यखंडानुक्रमणि उत्तरखंडानुक्रमणी शिष्यप्रश्ननुक्रमणी बाललक्षण बाळबोधलक्षण ब्रह्मप्रतिपादक रुद्रदृष्टांत अव्दैतनिरुपण ब्रह्म निरुपण ब्रह्मीष्ट लक्षण माया गूढ विचारणा महत्तत्वनिर्धारु मातृका विवरु ऊँकार विवरण तामसोत्पन्न सात्विकोत्पन्न रजोत्पन्न तत्वें उत्पन्न आवरण भाव कर्म धर्म गुण पंच देवता उत्पन्ननाम हिरण्यगर्भ परस्परानुप्रवेशु सूत्र न्याय प्राण व्यापार वाचा व्यापारु विराट देह पुराष्टक हिरण्यगर्भविराटतनुउत्पन्न खेचर उत्पन्न पंचविध प्रकारें कर्मलक्षण पंचप्रकारें नि:कर्म कर्मबंध कर्मयोगो नाम नरदेह इतिचत्वारो खानि शरीरनिर्धार निर्धारलक्षण दृष्टांत सप्त दृष्टांतनिर्धार निर्धारयोग सप्तवश्वनर उत्पन्न ब्रह्मांडप्रळये देवत्रय प्रलय शिष्योपदेशार्थ सुदेशीशास्त्र आदिखंड - आद्यखंडानुक्रमणी सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी आद्यखंडानुक्रमणी Translation - भाषांतर ॥श्री॥ तपोभि: क्षीणपापानां शांताना वीतरगिणां । मुमुक्षूणामपेक्षोय मात्मबोधोभिधीयते ॥१॥तवं शिष्यु ह्मणें श्रीगुरु । तुं भवसगरिचें तारु । मज उतरि पारु । या अगाधाचां ॥१॥हा व्यामोहोचा सागरु । कैसा दाटला दुस्तरु । नाना साधनीं उतारु । न दिसे याचा ॥२॥येथ वासनेची खोलिवां । अहंताशिळेचा थडिवा । प्रपंचगिरिचा मेळावा । याचि मध्यें ॥३॥दाटला अज्ञानवाळुवे । भेदतरंगाचे यावें । काळबुध्दुद नावें । उठति निमती ॥४॥महा मोहो डोहीं । डहुळताय तापत्रयीं । आशादि सुसरी उपाई । झोंबताति ॥५॥कामक्रोधादिक वळसे । हेळावे येताति आपैसे । विषये मीन आमिषें । घेउं धावति ॥६॥उपाधि उसासे देत । भ्रांति भ्रमे चळित । जन्ममरणें तळांत जात । येत जीव ॥७॥यांचिमध्यें विशाळु । वैराग्य तप्तवडवानळु । संशयशब्दें धुमाळु । गर्जना करी ॥८॥पाहातां यांचा चि उदरीं । बोधपन्नकीं आत्माहरी । याचां पदपंकजी सुंदरीं । शांतिश्रिया ॥९॥हा गुणत्रयें दाटला । मनादिकीं विवर्त्तला । ह्मणौन यामाजि लोपला । आत्मा विष्णु ॥१०॥माया अविद्या दरडी । कैसेंनि उतरावी थडी । इंद्रियें देऊनि बुडी । तळालां नेती ॥११॥जैं ब्रह्म अगस्ति प्रगटे । तैं हा समूळ आटे । मग येथिचीं विघ्रें कोठें । राहों ह्मणतीं ॥१२॥हें देह अष्टपुर । नवां व्दारांचे खोकर । हें चि तारुं करुनि तीर । उतरावें याचें ॥१३॥तरि जी देवा श्रीगुरुनाथा । जेणें हरे संशयव्यथा । ते अनुक्रमणीकथा । विस्तारा असी ॥१४॥हा ग्रंथ सर्व शुध्दु । नाम ठेविलें बाळबोधु । हा चि अर्थु प्रसिध्दु । प्रकट करा जी ॥१५॥हा जी बाळ तें कवण । त्याचें कैसें लक्षण । अज्ञानेंसहित अन्यथा ज्ञान । सांगावें त्याचें ॥१६॥बोधु तो काय कैसा । तेथ कैसी ब्रह्मदशा । ज्ञान विज्ञान प्रकाशा । तेथीचें आह्मां ॥१७॥मुख्य ब्रह्म कवण । सगुण किंवा निर्गुण । सर्वस्थ सर्वासमान । किं येकदेशी तें ॥१८॥जी जी प्रपंच जीवभूतां । ब्रह्मीं भेदु किं अक्यता । समष्टिव्यष्टीची वार्त्ता । निवडोनि द्या जी ॥१९॥हा संसारु कवण । ईश्वरी अक्य किंवा भिन्न । प्रकृतिपुरुषाचें लक्षण । वोजा किजे ॥२०॥ब्रह्म निर्विकार निर्गुण । कैसें जालें तें सगुण । माया येकदेशी किं संपूर्ण । ते निवडली कैसी ॥२१॥जरी कैसें पुरुष कोण पदें । तें बोलावीं प्रसिधे । भूतें नव्हतीं एवंविधें । तैं ईश्वरतनु कासयाचि ॥२२॥बह्मिष्ट बोधें कैसें प्रौढ । आणि हें मायेचें गुढ । हें कळें असें दृढ । करा मज ॥२३॥महत्तत्व काय कवण । कैसें प्रणवविवरण । बीजें मातृका देवगुण । बोला तेथिचें ॥२४॥कवणें अहंकारीं कवणें । तत्वें जालीं उत्पन्नें । देहीं दंश वायुचीं सांगा स्थानें । यांचीं कारणें कोठें ॥२५॥ब्रह्मा विष्णु रुद्र ईश्वरु । सदाशिव आदि सर्वेश्वरु । यां षट् तत्वांचा करुनि निर्धारु । सप्तम स्कंदु बोला ॥२६॥हिरण्यगर्भु जगदीश । देह इंद्रियें प्रकाशु । परस्परानुप्रवेशु । कैसा जाला ॥२७॥कैसें तत्वाचे व्यापार । वाचा देहविकार ।या विराट देवाचें शरीर । निरुपा जी मज ॥२८॥पुराष्टक गुण भेद । सांगा ईश्वरतनु शबळ शुध्द । खेचर उत्पन्न प्रसिध्द । बोलावें तें ॥२९॥भूतें होईजे देहांतीं । किं हे भूतसृष्टि आईति । यांचि आहार व्यवहार स्थिति । कैसी असे ॥३०॥ग्रह पितर देव ।यांचे कर्मधर्म भाव । हें मनुष्याचें होते सर्व । चालती कैसे ॥३१॥कर्माकर्म कर्मश्रेष्ट । निरुपावें कर्मभ्रष्ट । सांगा योग वरिष्ट । तेथें प्रमाण काई ॥३२॥नाना हे जीव अपार । यामधें कोणतें सार । याचें ज्ञान निरंतर । कोणा असे ॥३३॥याचें चळन नसे सारिखें । अवस्था ही सम नेदखे । याची गति स्वमुखें । सांगा स्वामी ॥३४॥चतुरासी लक्ष योनी । मध्यें सार कोण खानी । या भूतग्रामाची मांडणी । कैसी असे ॥३५॥कवणें योगें जागृती । कवणे प्रवर्ते स्वप्रस्थिति । कवणें प्रकारें सुषुप्ति । तुरीइया ते कैसी ॥३६॥देवां नरी जीवां समस्तां । याच्या सांगाव्या अवस्था । कोण भूतयोनि हे वेवस्था । कळों दिजे ॥३७॥माये अविद्येचेनि संबंधें । देव भूतें प्रसिध्दे । कां जालीं बहुविधें । हें गुह्य उघडावें ॥३८॥च्यारि लयस्थानें चारि प्रलय । ज्ञानप्रळय कैसा होय । असी सिध्दरचनेची सोय । आह्मीं नेणों ॥३९॥ब्रह्में प्रपंच वेधें । किं प्रपंचे ब्रह्म बाधे । सांगावें दृष्टांत शुध्दे । प्रमाणें सहित ॥४०॥मुख्य ब्रह्मा तो कवणु । त्याची उत्पत्ति कोठूनु । याचें स्वरुपलक्षण । कैसें असे ॥४१॥याचें आयुष्य केतुलें । मांगां किति भोगिलें ।पुढां दिवस उरलें । तें ही सांगा ॥४२॥या ब्रह्मांडा नाशु कैसा घडे । हें कवणें परि कोठें मोडे । हें कोण स्थळीं एवढें । पावैल लया ॥४३॥एवं पूर्वखंड मांडणी । शतदीढ अनुक्रमणी । पंधरा कथनें सुवाणी । सिध्दि नेणें ॥४४॥॥इति आद्यखंडानुक्रमणी ॥ ॥ N/A References : N/A Last Updated : March 07, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP