मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
इतिचत्वारो खानि

आदिखंड - इतिचत्वारो खानि

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


अंडज जारज स्वदेज । चौथि खाणि उव्दिज झ। याच्या वोळखी तुज । करुन देवों ॥१४॥
गुल्म लता तृण तरु । उदका पासुनि विस्तारु । तो मानावा निर्धारु । उत्बीज खानि ॥१५॥
धातु रत्नें मुख्य करुनि । जें होये भूमि पासूनि । ते हे स्वेदजखानि । वोळखावी ॥१६॥
जे होति अंडा पासुनि । ज्यासी नेमले जन्म दोनी । अंडज खानि सुजाणीं । जाणावी तें ॥१७॥
योनि होनि पडती अवयवेंसी । पयपान ज्यां जीवासी । जाण ते निर्धारेसी । जारज खानि ॥१८॥
नव ही व्दारें वर्त्तत । ते जारज निभ्रांत । न्यून व्दारीं वसत । एरा खानी ॥१९॥
सांगो वोळखिचें लक्षण । ज्यासी देखसी श्रवण । ते जारज खानि स्तनपान । त्याचि जीवां ॥२०॥
ज्यासी नसती श्रवण । त्यांसी स्तन ना पयपान । हे अंडाजादिक भर्वसेन । वोळखावें ॥२१॥
जळें होय ते उत्बिज । स्वेदे होय तें स्वेदज । अंडजमध्ये होय तेर अंडज । जारज जारें ॥२२॥
॥इतिचत्वारो खानि ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP