मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड| कर्म धर्म गुण आदिखंड मंगळाचरण आद्यखंडानुक्रमणी मध्यखंडानुक्रमणि उत्तरखंडानुक्रमणी शिष्यप्रश्ननुक्रमणी बाललक्षण बाळबोधलक्षण ब्रह्मप्रतिपादक रुद्रदृष्टांत अव्दैतनिरुपण ब्रह्म निरुपण ब्रह्मीष्ट लक्षण माया गूढ विचारणा महत्तत्वनिर्धारु मातृका विवरु ऊँकार विवरण तामसोत्पन्न सात्विकोत्पन्न रजोत्पन्न तत्वें उत्पन्न आवरण भाव कर्म धर्म गुण पंच देवता उत्पन्ननाम हिरण्यगर्भ परस्परानुप्रवेशु सूत्र न्याय प्राण व्यापार वाचा व्यापारु विराट देह पुराष्टक हिरण्यगर्भविराटतनुउत्पन्न खेचर उत्पन्न पंचविध प्रकारें कर्मलक्षण पंचप्रकारें नि:कर्म कर्मबंध कर्मयोगो नाम नरदेह इतिचत्वारो खानि शरीरनिर्धार निर्धारलक्षण दृष्टांत सप्त दृष्टांतनिर्धार निर्धारयोग सप्तवश्वनर उत्पन्न ब्रह्मांडप्रळये देवत्रय प्रलय शिष्योपदेशार्थ सुदेशीशास्त्र आदिखंड - कर्म धर्म गुण सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी कर्म धर्म गुण Translation - भाषांतर आकाशा कर्म पोकळी । वायोसी चळन सर्वकाळीं । तेजा उष्णता जळीं । द्रवण कर्म ॥६३॥महिचे कर्म कठिण । आतां धर्म निरुपण । स्वभाव नैसर्गिकु लक्षण । ते चि धर्म ॥६४॥आकाशें आपुलें सामर्थ्यपणें । सर्वा अवकाशु देणें । चळे चाळावें पवनें । चळनधर्मु त्याचा ॥६५॥सर्व देहावें तेजें । यासी दहन धर्मु साजे । उदकें कंदन कीजे । तो धर्मु तया ॥६६॥जे जे भूमीवरी पडे । ते त्या धरावें तेव्ह्ढें । भारु नेणें एणे पाडें । हा धर्मु तीचा ॥६७॥गुणाचा निवाडु असा । सांगो शुध्दबुधु तैसा । जेणें प्रबुध्दाच्या मानसा । संतोषु होय ॥६८॥नभिं शब्द गुणु साक्षातु । जो ज्ञानी आइकाती निश्चळितु । एरा गुणांची मातु । काय तेथें ॥६९॥प्रत्यक्ष गर्जे पवनु । आगिं आदळे तो स्पर्शु गुणु । या दों गुणावाचुनु । येर तेथें नाहीं ॥७०॥शब्दें गर्जावें अनिळें । स्पर्श तरीं आगीं आदळें । रुप ते देखती डोळे । हे तीनिच गुण तेजा ॥७१॥उदकी खळाळ शब्दु उठे । स्पर्श तरी प्रत्यक्ष आपटे । रुप तें होय दीठे । तैसाचि रसु ॥७२॥पाहातां अनुक्रमें क्षीति । सर्वही गुण दीसती । तें का मीं आणूं वित्पत्ति उदास दीसे ॥७३॥नीच गुणु उचां भरे । तो आणिकाचेंनि आकारें । परि मिं बोलिलों निर्धारें । हें चि घडे ॥७४॥येकु चि गुणु गगना । वायोसि दोनि तिनि हुताशना । उदका च्यारिं पंचगुणां धरत्री होय ॥७५॥इति कर्म धर्म गुण ॥ N/A References : N/A Last Updated : March 07, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP