मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक ५१ ते ६१ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५१ ते ६१ Translation - भाषांतर तद्राजेंद्र यथा स्नेहः स्वस्वकात्मनि देहिनाम् । न तथा ममतालंबिपुत्रवित्तगृहादिषु ॥५१॥कोणा कार्यास्तव जरी म्हणसी । प्रत्यक्ष दिसे सर्वांपाशीं । आत्माध्यासें शरीरासी । कवळी प्रीतीशीं आत्मत्वें ॥१९॥मग उत्तरोत्तर तारतम्य । कलत्र पुत्र हेमहर्म्य । मायिक यांचें आत्मप्रेमें प्रेम । भोग्यकाम म्हणोनी ॥९२०॥अस्ति भाति आणि प्रिय । आत्मयाचें स्वरूप होय । तें आत्मप्रियत्वें धनसुतगेह । कवळी मोहसंग्रस्त ॥२१॥आत्मा शब्दें आपण । स्वशब्दें तें बोलिजे धन । जाया पुत्र आत्मा म्हणोन । श्रुतीचें वचन प्रतिपाद्य ॥२२॥परी राजेंद्रचूडामणि । स्वस्वदेहीं देहाभिमानी । झोंबती स्नेहें कळवळोनि धनसुतसदनीं न तैसे ॥२३॥देहीं आत्मत्वें अहंता । जायासुतधनीं प्रियत्वममता । तदनुलक्ष्यें त्या आत्मता । अनात्मता वैरस्यें ॥२४॥देहात्मवादिनां पुंसामपि । राजन्यसत्तम । यथा देहः प्रियतमस्तथा न ह्यनु ये च तम् ॥५२॥वास्तव आत्मा सच्चिदानंद । क्षणैक असो हा अनुवाद । परी देहात्ममानी ही पुरुषवृंद । प्रेमास्पद तनु मानी ॥९२५॥देह आत्मत्वें जैसा प्रिय । तदुपयोगी जे जाया तनय । तैसे नोहती ज्या अभिप्रायें । तें परिसिजे रायें सप्रेमें ॥२६॥देहासि संकट येते काळीं । आत्मवित्त वेंचूनि टाळी । पश्वादि संपत्ति वेंचूनि समूळीं । वृत्ति कोमळीं साधितीं ॥२७॥तेही वृत्ति समर्पणें । जाया पुत्र सोडवणें । पुत्र देऊनि स्त्रीं रक्षणें । तारतम्यें त्यांमाजीं ॥२८॥प्रसूतिकाळीं आड येतां । पुत्र खांडूनि रक्षिती वनिता । परी पोट फोडूनि वांचवा सुता । कोणी वार्ता हे न वदे ॥२९॥जळतां गेहीं सांपडे सुत । पितरें पळती लाहतां पंथ । ममतामोहें शोकाभिभूत । परी न जळत त्यासरिशीं ॥९३०॥ स्वैर सुरतीं धरूनि प्रीति । पुंश्चळी प्रवर्ते गर्भपातीं । न सुटे देहाची आसक्ति । हें भूपति कळलें कीं ॥३१॥जाया आत्मा म्हणावें जरी । तेही प्रियत्वें प्रेमादरीं । जैं ते प्रवर्ते व्यभिचारीं । तैं परस्परीं विष होती ॥३२॥एवं आत्मप्रियत्वासाठीं । आत्मत्व कवळिलें बारा वाटीं । देहात्मवादियांची हे गोठी । नृपा वाक्पटीं शुक सांगे ॥३३॥आत्माध्यस्त जो हा देह । सर्वां परीस त्यांचा स्नेह । पुत्र कलत्र वृत्ति गेह । हा संग्रह तदर्थ ॥३४॥देहोऽपि ममताभाक् चेत्तर्ह्यसौ नाऽऽत्मवत्प्रियः । यज्जीर्यत्यपि देहेऽस्मिन्जीविताशा बलीयसी ॥५३॥देहाहूनि आत्मा प्रिय । ऐसा रायासि अभिप्राय । प्रकटावया योगिवर्य । कथिता होय विवेक ॥९३५॥ज्या कारणास्तव हा देह । मरणोन्मुखही कळला आहे । तरी जीविताशा न सुटे पाहें । महामोहें बलिष्ठ ॥३६॥ऐसे देहात्ममानी मूर्ख । म्हणती आत्माचि देह निष्टंक । तो देहही कळतां ममताभाक । तैं आत्मविवेक वास्तव ॥३७॥देहाहूनि आत्मा प्रिय । म्हणोनि विरक्ता न रुचे देह । आत्मरतासि देह गेह । वृथा मोह भवभ्रांति ॥३८॥तस्मात्प्रियतमः स्वात्मा सर्वेषामपि देहिनाम् । तदर्थमेव सकलं जगदेतच्चराचरम् ॥५४॥तस्मात्सर्व सुखांची राशि । स्वात्माचि प्रियतम सर्वांसी । आत्मप्रियत्वें चराचरासी । प्रियतमतेशीं कवळिती ॥३९॥कृष्णमेनमवेहि त्वमात्मानमखिलात्मनाम् । जगद्धिताय सोऽप्यत्र देहीवाऽऽभाति मायया ॥५५॥जगदात्मया श्रीकृष्णातें । तुवां जाणिजे राया निरुतें । नंदनंदना प्रत्यक्षातें । इतुकेंचि एथें न मनावें ॥९४०॥कृष्ण आपुला आपण आत्मा । तोचि जडरूपें जगदात्मा । सबाह्य कृष्ण आम्हां तुम्हां । नृपसत्तमा हें जाण ॥४१॥जगद्व्यापक अभिन्न हरि । तोचि जगाच्या हितावतारीं । मायामनुष्यदेहधारी । भासे धरित्रीवल्लभा ॥४२॥वस्तुतो जानतामत्र कृष्णं स्थास्नु चरिष्णु च । भगवद्रूपमखिलं नान्यद्वस्त्विह किंचन ॥५६॥रक्षेमाजीं गुप्त अनळ । रक्षारूप दिसे केवळ । द्रव्यसंस्पर्शें तत्काळ । प्रकटी फळ वास्तव ॥४३॥गूळ शंसिला हिंगशब्दें । तो मुंग्या माशा वेधीच स्वादें । तेंवि कृष्ण वास्तवानंदें । सहयशोदे व्रज वेधी ॥४४॥जरी परोद्भव गोपाळ । तरी तो चिन्मात्र निर्मळ । सर्वग सच्चिदानंद वहळ । प्रिय केवळ सर्वात्मा ॥९४५॥राया तुझी जे आशंका । गोपी सांडूनि स्वबाळकां । कृष्ण प्रियतम मानिती कां । त्या विवेका तुज वदलों ॥४६॥जरी भाविला यशोदाबाळ । तरी वेधलें व्रजचि सकळ । मा यथार्थ बोधें जे भजनशीळ । ते जाणती निखिल कृष्णची ॥४७॥गगनीं नीलिमा यथार्थ नाहीं । तेंही बिंबे जळाचे ठायीं । नाथिल्या बिंबोपबिंबा दोहीं । वास्तव देही प्रकाशी ॥४८॥विश्व स्थावरजंगमात्मक । अभेद श्रीकृश्णचि एक । ज्यांसि कळला हा विवेक । वस्तु सम्यक् ते झाले ॥४९॥भगवद्रूप आत्मास्तिक्यें । बाह्य आभासे विश्व लटिकें । तें वस्तुत्वें वेगळें न टिके । खोले विवेकें विवळत्वें ॥९५०॥त्यांसि भगवद्रूप निखिल जग । हरला भेदाचा प्रसंग । पृथक् सतत्त्वें जडविभाग । मायालाग असेना ॥५१॥सर्वेषामपि वस्तूनां भावार्थो भवति स्थितः । तस्यापि भगवानीशः किमतद्वस्तु रूप्यताम् ॥५७॥मायामय हा भवसागर । ब्रह्म केवळ निर्विकार । कैसा अभेदप्रकार । हा विचार जरि पुससी ॥५२॥तरी दृश्यमात्र जें वस्तुजात । त्याचें आस्तिक्य तें तुजचि आंत । तुझेनि बोधें प्रकाशत । तूं परमार्थ पैं यांचा ॥५३॥सांडूनि दृश्याचा अवलंब । तूं जें चैतन्य स्वयंभ । त्या तुझें ठायीं भासे नभ । ज्यामाजीं शोभा दृश्याची ॥५४॥तें तूं चैतन्य जें जगत्कारण । कृष्ण त्या तुझें आदिकारण । आतां अवस्तूसि अधिष्ठान । कृष्णावीण कोणतें ॥९५५॥तरी वस्तु एकचि कृष्ण पाहीं । येर अवस्तु सर्व कांहीं । आभासे श्रीकृष्णाचेच ठायीं । तेव्हां सर्वही श्रीकृष्ण ॥५६॥भावर्थ म्हणिजे सन्मात्रत्व । हें जें कृष्णासीच मुख्यत्व । त्याचे ठायीं अनन्यत्व । त्या अमृतत्व अनायासें ॥५७॥ऐसें वदोनि प्रकरणार्थ । उपसंहरी शुक समर्थ । तो ये श्लोकींचा श्लोकार्थ । श्रोतीं स्वस्थ परिसावा ॥५८॥समाश्रिता ये पदपल्लवप्लवं महत्पदं पुण्ययशो मुरारेः । भवांबुधिर्वत्सपदं परं पदं पदं पदं यद्विपदां न तेषाम् ॥५८॥परिमळ मूर्तचि पोतास । न निवडतां सार बाकस । तैसें पुण्यचि ज्याचें यश । अवताररहस्य मुख्यत्वें ॥५९॥ज्याच्या यशाचें श्रवण पठण । करितां अपार जोडे पुण्य । जें कल्पांतीं नोहे क्षीण । तो हा श्रीकृष्ण मुरारी ॥९६०॥त्या कृष्णाचे पदपल्लव । जिहीं आश्रयिली सुदृढ नाव । पूर्वी महंतीं जेथ सद्भाव । करूनि ठाव जो धरिला ॥६१॥हीं कृष्णपदें जितुकी विशद । त्याहूनि जें कां महत्पद । तें कृष्णाचें पदद्वंद्व । भक्तवृंद आश्रयिती ॥६२॥लाहोनि श्रीकृष्णपदाब्जनौके । भवाब्धि निस्तरती कौतुकें । गोवत्सांघ्री माजील उदकें । समता न शके भव करूं ॥६३॥भव निस्तरूनि कोठें जाती । तरी ते परंपदचि पावती । म्हणती कैवल्यप्राप्ति । पुनरावृत्तिवर्जित ॥६४॥सकामसाधनीं वैकुंठ प्राप्त । तें पद न पावती निष्काम भक्त । विषयपदवी जे समस्त । तीं पदें प्राकृत जाणोनि ॥९६५॥विषदा म्हणजे भवयातना । त्यांचें पद तें विषयाचरणा । श्रीकृष्णांघ्रिआश्रितां जनां । सहसा पुनः न भुलवी ॥६६॥ऐसा कृष्णांघ्रिभजनप्रेमा । अगाध म्हणोनि वांछी ब्रह्मा । तो समासें कथिला महिमा । कुरुसत्तमा तुजलागीं ॥६७॥एतत्ते सर्वमाख्यातं यत्पृष्टोऽहमिह त्वया । यत्कौमारे हरिकृतं पौगंडे परिकीर्तितम् ॥५९॥कृष्णक्रीडानिरूपणीं । जें त्वां पुशिलें आशंकोनी । तें म्यां सर्व तुझ्या श्रवणीं । विवळ करूनि घातलें ॥६८॥कुमारपणीं जे क्रीडा केली । ते पौगंडीं व्रजीं कथिली । ते तव आशंका निरसिली । कीं कांहीं उरली सांग पां ॥६९॥ऐसें कौरवा हरिचरित्र । शुक वर्णूनि पवित्र । ज्याचें सेवील श्रोत्रवक्त्र । त्याचें विचित्र फळ वर्णी ॥९७०॥एतत्सुहृद्भिश्चरितं मुरोरेरघार्दनं शाद्वलजेमनं च । व्यक्ते तरदूपमजोर्वभिष्टवं श्रृण्वन् गृणन्नेति नरोऽखिलार्थान् ॥६०॥सुहृद म्हणिजे गोपकुमार । जे देवांऋषींचे अवतार । अपार सुकृताचे सागर । तेणें सहचर कृषाण्चे ॥७१॥तिहींशीं जे वत्सपक्रीडा । एक धांवती एकापुढां । लपविती जाळिया घोंगड्या । लाविती मेढां एकमेकां ॥७२॥इत्यादि कौमारक्रीडन । यथोक्त अघासुरमर्दन । पुलिनीं तृणावरी भोजन । आणि विंदान विधीचें ॥७३॥वत्सें वत्सप होऊनि कृष्ण । मायामोहें ठकिला द्रूहिण । त्यासि दाविलें चैतन्यघन । व्यक्तीहून निजरूप ॥७४॥व्यक्त म्हणिजे जड प्रपंच । त्याहूनि शुद्धसत्त्वात्मक साच । तेणें रूपें वत्सप वत्स । होऊनि तुच्छ विधि केला ॥९७५॥शेवटीं चिद्विलास अचोज । स्वप्रकाश तेजःपुंज । होऊनि ब्रह्म्यासि लाविली वोज । न वदतां निज गुज बोधूनी ॥७६॥त्या ब्रह्म्यानें उत्क्रांतमति । उरु म्हणिजे जे उत्कृष्ट स्तुति । केली ते हें आख्यान गाती । कीं ऐकती सप्रेमें ॥७७॥कीं अनुग्रहीती अर्थोपदेशें । मनीं ध्याती जे प्रेमोत्कर्षें । मननें आणि निदिध्यासें । अनुभवदशे जे आणिती ॥७८॥त्यांसि सर्वही पुरुषार्थ । अर्थ स्वार्थ आणि परमार्थ । ओपी श्रीहरि यथार्थ । हा श्लोकार्थ शुक वदला ॥७९॥कृष्ण संस्थापी त्यांचा धर्म । कृष्णात्मकचि त्यांचा काम । अर्थ स्वार्थ हेम धाम । पुरुषोत्तम स्वयें त्यांचें ॥९८०॥घेऊनि शंख चक्र गदा । करीत शत्रूच्या वधा । त्यांच्या नासूनि भवदुर्मदा । ओपी संपदा स्वसुखाची ॥८१॥ब्रह्मादि होती वश्यवर्तीं । तेथ कायसे चक्रवर्ती । उशनाप्रमुख वाचस्पति । त्यांतें स्तविती संतोषें ॥८२॥सनकादिकां ब्रह्मवृंदा । सेव्य होती ते संवादा । कीं ते आवडती गोविंदा । निज स्वानंदासारिखे ॥८३॥असो त्यांची अगाध प्राप्ति । एक्या मुखें मी वर्णूं किती । संतति संपत्ति सत्संगति । ते लाहती कें नवल ॥८४॥इहामुत्रार्थ तया जोगें । ना त्या ओळगिजे अपवर्गें । नवल नोहे ज्यांपुढें मागें । स्वयें श्रीरंगें तिष्ठतां ॥९८५॥ऐसा महिमा श्रवणीं पठणीं । एथ वदला द्वैपायनि । कौमारक्रीडाउपसंहरणीं । संक्षेपवाणी वदतसे ॥८६॥एवं विहारैः कौमारैः कौमारं जहतुर्व्रजे । निलायनैः सेतुबंधैर्मर्कटोत्प्लवनादिभिः ॥६१॥ऐसे विहार नानापरी । कौमारवयीं जे लेंकुरीं । क्रीडिजती ते ते हरि । वत्सपाकारीं क्रीडला ॥८७॥डोळेझांकणी लपंडाई । सेतुबंधनें ठायीं ठायीं । कपिउत्प्लवनाची नवाई । मर्कटचेष्टा अनेका ॥८८॥निंबु तिंबु हेटिमेटी । चुंबाचुंभीं भोवरगांठी । तोवा खेळती वाळवंटीं । भोंवती घिरटी देऊनी ॥८९॥कवडे भिंगोरियांच्या परी । जाळिया विणिती परोपरी । वेणुविषाणीं नागस्वरीं । आणिती हारीं परस्परें ॥९९०॥ऐशा अनेक कौमारलीला । शारदा वदों न शके सकळा । त्या त्या क्रीडोनि क्रमिलें काळा । वत्सपाळां समसाम्य ॥९१॥इतुकी कथा चतुर्दशीं । शुकें सांगोनि कुरुवरासी । पौगंडलीला परिसावयासी । म्हणे मानसीं सावध ॥९२॥पौगंडवयसेमाजीं हरि । गोपवेषें धेनु चारी । रिघोनि तालवनामाझारीं । धेनुक मारी श्रीकृष्ण ॥९३॥पंचदशीं हें चरित्र । कृष्णलीलामृत पवित्र । सांठवणेंसि सभाग्य श्रोत्र । श्रोतयांचें सत्पुण्यें ॥९४॥श्रीएकनाथ सुधासिंधु । प्रकटी गोविंद चित्सुख इंदु । कृपाउदयें करितां बोधु । प्रेमा अगाध दयार्णवीं ॥९९५॥इति श्रीमद्भागवत । अठरा सहस्र परमामृत । परमहंसाचा एकांत । श्रोता जेथ परीक्षिति ॥९६॥वक्ता श्रीशुक आत्मविद । त्याहीमाजीं दशम स्कंद । त्यामाजीं ब्रह्मस्तुति अगाध । तो अध्याय प्रसिद्ध चौदावा ॥९७॥गोविंदकृपेच्या उजीवडें । बाळभावें लाडें लाडें । पदापदाचे देऊनि झाडे । संतांपुढें उपलाविला ॥९८॥एथ गर्व करूं कां वृथा । ब्रह्मस्तुतीचें व्याख्यान करितां । शास्त्रज्ञाही पडे गुंता । तेथ कायसी कथा अबलांची ॥९९॥तथापि संतांच्या सहाकारें । सद्गुरूचे वरद करें । बोबडीं महाराष्ट्र उत्तरें । दयार्णववक्त्रें वदविलीं ॥१०००॥इच्या श्रवणपठणें मननें । श्रोतीं सायुज्य साधणें । एथ साह्य कीजेल कृष्णें । सप्रेम खुणे जाणोनि ॥१००१॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहरूयां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां कौमारलीलायां ब्रह्मस्तुतिर्नाम चतुर्दशोऽध्यायः ॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥६१॥ टीका ॥१००१॥ एवं संख्या ॥१०६२॥ ( चौदावा अध्याय मिळून ओवीसंख्या ॥८६६२॥ ) चौदावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP