मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक ३४ ते ३५ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक ३४ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३४ ते ३५ Translation - भाषांतर तद्भूरिभाग्यमिह जन्म किमप्यटव्यां यद्गोकुलेऽपि कतमांघ्रिरजोऽभिषेकम् ।यज्जीवितं तु निखिलं भगवान्मुकुंदस्त्वद्यापि यत्पदरजःश्रुतिमृग्यमेव ॥३४॥तें भूरि म्हणजे विपुल भाग्य । पावावयां मी होय योग्य । ऐशिया अनुग्रहार्थ साङ्ग । मी श्रीरंग प्रार्थितों ॥७५५॥इह म्हणिजे येचि ठायीं । मनुष्यलोकीं जन्म देईं । कोणी एक रंगदेहीं । होणें पाहीं मज घडो ॥५६॥तेंही जन्म देईं वनीं । त्याही माजीं व्रजकाननीं । म्हणसी सत्यलोक सांडूनि । कां व्रजभुवनीं जन्मावें ॥५७॥व्रजकाननीं कोण लाभ । तो अवधारू पद्मनाभ । एथ पदाब्जरेणु सुलभ । जो दुर्लभ मादृशां ॥५८॥व्रजनिवासीं वनीं भुवनीं । त्यामाजीं सामान्य जीव कोणी । एकाचीही माझे मूर्ध्नीं । पडो उडोनि पदधुळी ॥५९॥उंच नीच गोकुळवासी । स्वेच्छा करिती विहारासी । पदरज उडोनियां आकाशीं । पडतीं शिरीं जे ठायीं ॥७६०॥तो पांसूंचा अभिषेक । त्यांतील मी जरी कणिका एक । लाहें तरीच भवसामर्थक । परमोत्सुक या लाभा ॥६१॥गोकुलवासी निखिल जन । काय म्हणूनि म्हणसी धन्य । तरी ज्यांचें तनु मन धन जीवन । ठेलें रंगोन मुकुंदीं ॥६२॥ज्याची वास्तव व्हावयां प्राप्ति । विचारीं प्रवर्तलिया श्रुति । व्यतिरेखमुखें नेति म्हणती । परी दर्शनावाप्ति नाद्यापि ॥६३॥तो तूं सुलभ जयांपाशीं । होऊनि तच्छंदें क्रीडसी । न जाणे त्यां काय देसी । हें मज विधीसी उमजेना ॥६४॥एषां घोषनिवासिनामुत भवान् किं देव रातेति नश्चेतो विश्वफलात्फलं त्वदपरं कुत्राप्ययन्मुह्यति । सद्वेषादिव पूतनाऽपि सकुला त्वामेव देवापिता यद्धामार्थसुहृत्प्रियात्मतनयप्राणाशयास्त्वत्कृते ॥३५॥ज्यांचे कृतार्थतेचा महिमा । वर्णावया मी असमर्थ ब्रह्मा । ऋणीं निबद्ध तूं मेघश्यामा । ज्यांच्या प्रेमास्तव गमसी ॥७६५॥म्हणसी यांचें भक्तिऋण । फेडावया असमर्थपण । माझे ठायीं देखिलें कोण । मी भगवान विश्वपति ॥६६॥तरी एतदर्थीं ऐकें हरि । पाहतां तारतम्याची परी । ऋणोत्तीर्णतेची सामग्री । तुझे घरीं मज न दिसे ॥६७॥जरी तूं आखलब्रह्मांडपति । अचिंत्यैश्वर्य तव संपत्ति । तरी तुजहूनि ते आरुती । हें मम मति विचारी ॥६८॥अनंतब्रह्मांडांची पदवी । तूं नसतां ते शून्य आघवी । सांडणें करूनि उपेक्षावी । तुझिये प्राप्तीवरूनी ॥६९॥जैसें प्राणेंवीण शरीर । जीवनेंवीण सरोवर । तुजवीण तैसें वैभव अपार । अनंतब्रह्मांडपदवीचें ॥७७०॥सर्व वैभवां वैभव । तूं परमात्मा वासुदेव । तुजवेगळी आघवी माव । भोगगौरव गा मज ॥७१॥तो तूं विश्वफळां फळ । येर आघवेंचि वोफळ । मा काय देऊनि गोकुळ - । वासी प्रेमळ गौरविसी ॥७२॥व्रजस्थीं प्रेमें बांधिलासी । त्या ऋणाच्या उत्तीर्णासी । आपणावेगळें काय देसी । हें मम मतीसि न चोजवे ॥७३॥तुजहूनि थोर पदार्थ कोण । मा तो देऊनि फेडिसी ऋण । करितां चित्तीं हें विवरण । मोह पावोन ठेलों मी ॥७४॥म्हणसी मजहूनि सर्वही गौण । तरी आपण देऊनि फेडीन ऋण । हेंही स्वामी न घडे जाण । काय म्हणून तें ऐक ॥७७५॥मातृप्रेमाची अवगणी । दावूनि पूतना लावी स्तनीं । इतुकियासाठीं ते पापिणी । आपणा देऊनि गौरविली ॥७६॥पूतने दिधलें म्यां आपणा । तरी सकुटुंबा पशुपगणा । आपणा देऊनि फेडीं ऋणा । ऐसें कृष्णा जरी म्हणसी ॥७७॥तरी पूतनाही अघबकेंशीं । आपणामाजीं मेळविसी । तैं आगळीक ते कायसी । भक्तिप्रेमासि सांग पां ॥७८॥भोगासाठीं ओपिजे त्याग । नृपगौरवा जैं तोचि योग्य । तेव्हां तारतम्याचा भाग । पावे भंग सर्वत्र ॥७९॥अमृत आणि ओखटवणी । मधुर अरोग पवित्र गुणीं । तुळणा पावती समानपणीं । ऐं सिंधुमथनीं वैयर्थ्य ॥७८०॥तैशी राक्षसी पापराशि । स्तन दे कपटमातृवेशीं । इतुकेनि मानूनि ते माउशी । स्वसमरसीं मेळविली ॥८१॥आणि जे शरीरें वित्तें चित्तें । प्रेमें सौहार्दें जीवितें । प्राणें करणें प्रिय पदार्थें । स्वार्थें परमार्थें त्वत्पर ॥८२॥पुत्रें कलत्रें वृत्तिक्षेत्रें । आप्तस्वजनादि कुलगोत्रें । कर्माकर्में इहामुत्रें । चेष्टामात्रें त्वदर्थ ॥८३॥तव सान्निध्यें रात्रिदिवस । नेणती पाहोनि क्रीडाविशेष । विसरोनि आपुल्या स्वकर्मास । तव प्रेमास वेधलीं ॥८४॥कळवळूनि देती स्तन्य । पालकीं इजविती हालवून । अभ्यंगादि उद्वर्तन । अन्नपानें अर्पिती ॥७८५॥ये रे कृष्णा कमलनयना । मेघश्यामा मनमोहना । ऐशीं घेती नामें नाना । भववेदना विसरोनि ॥८६॥कृष्णवियोग न साहती । कृष्ण अनिमेषें पाहती । कृष्णीं रंगोनि राहती । सर्व साहती कृष्णार्थ ॥८७॥कृष्णालागीं शुचिष्मंत । कृष्णालागीं भवीं विरक्त । कृष्णालागीं कर्मासक्त । जे अनुरक्त श्रीकृष्णीं ॥८८॥कृष्णालागीं कामधाम । कृष्णालागीं नित्यनेम । कृष्णालागीं ज्यांचें प्रेम । भवसंभ्रम विसरले ॥८९॥ज्यांसि कृष्ण मागें पुढें । कृष्णप्रेमें झाले वेडे । कृष्णाविण ज्यां नावडे । गाती पवाडे कृष्णाचे ॥७९०॥कृष्णरूपें रंगले नयन । कृष्णध्यानें मन उन्मन । कृष्णवेधें अंतःकरण । उपरमोन समरसे ॥९१॥कृष्णालागीं शौचाचार । कृष्णालागीं पदसंचार । कृष्णप्रेमें ज्यांचे कर । कर्मी तत्पर सर्वदा ॥९२॥कृष्णप्रेमें कृष्णगुण । गाती कृष्णात्मक होऊन । कृष्णक्रीडांचें गायन । करिती कथन परस्परें ॥९३॥ज्यां सांगतें कृष्ण जेवी । कृष्ण ज्यांतें कवळ भरवी । कृष्णहस्तींची कवळचवी । घेती शैशवीं सस्निग्ध ॥९४॥कृष्णस्वादें कृष्णमुखा । चुंबूनि भोगिती चित्सुखा । हुंगिती कृष्णाच्या मस्तका । सामान्य तोकासारिखें ॥७९५॥कृष्णरूपीं बांधले नयन । न येती मागुते परतोन । ठेली प्रपंच ओळखण । जे कृष्णावीण न देखती ॥९६॥ज्यांचें कृष्णीं आलिंगन । कृष्णस्पर्शें निवती पूर्ण । कृष्ण ज्यांचे प्राशी स्तन । शयनीं रिघोन स्वानंदें ॥९७॥एके देशीं स्पर्शमणि । लोहासि लागतां एके क्षणीं । सुवर्ण करी तेचि क्षणीं । नोहे परतोनि मग लोहो ॥९८॥तूं श्रीकृष्ण चैतन्यमूर्ति । सर्वदा सर्वांगीं जे स्पर्शती । त्यांसि देईन आत्मप्राप्ति । म्हणतां मम मति मोहित ॥९९॥तव संस्पर्शें चैतन्य झालें । तें काय आत्मत्वावेगळें । त्यावरी आत्मत्व देणें उरलें । कोणतें न कळे मजलागीं ॥८००॥तव भाषणें ज्यांचे श्रवण । पूर्ण निवती आनंदोन । तव गुणकीर्तिश्रवणाहून । समाधि कोण मज न कळे ॥१॥तुझेनि वेधें वेधले प्राण । तव वियोगें गतप्राण । तवात्मकत्वें ज्यां अभिमान । माझा कृष्ण हे ममता ॥२॥कृष्णाचा मी पिता भ्राता । इत्यादि सुहृदत्वें अहंता । कृष्ण आमुचा ऐशी ममता । त्यां भवकथा कें उरली ॥३॥ज्यांचें कृष्णीं अनुसंधान । चित्ता श्रीकृष्णचिंतन । स्मृति सबाह्य कृष्णस्मरण । श्रीकृष्णध्यान मानसा ॥४॥कृष्णीं विराल्या संकल्प । अंतःकरण जें निर्विकल्प । कृष्णवेधें घेती झोंप । तेही चिद्रूप कृष्णमय ॥८०५॥ऐसा सबाह्य ज्यां श्रीकृष्ण । अवस्थामात्रीं चैतन्यघन । त्यांसही राक्षसीच समान । आपणा देऊन गौरपणें ॥६॥तरी भक्तीची विशेषता । कायसी एथ सर्वज्ञनाथा । ऐसें बोलोनि विधाता । म्हणे अच्युता अवधारीं ॥७॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP