मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक १९ ते २० अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक १९ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १९ ते २० Translation - भाषांतर अजानतां त्वत्पदवीमनात्मन्यात्माऽऽत्मना भासि वितत्य मायाम् ।सृष्टाविवाहं जगतो विधान इव त्वमेषोंऽत इव त्रिनेत्रः ॥१९॥मियां नेणोनि तुझी पदवी । पदाभिमानता धरूनि जीवीं । तुज भुलवितां मायालाघवीं । पडली गोंवी मजमाजी ॥८७॥तोचि कैसा पदाभिमान । अनात्मप्रकृति अंगीकारून । पांघुरोनियां रजोगुण । अधिष्ठान विसरलों ॥८८॥रजोगुणाची घेतां बुंथी । विपरीत ज्ञानाची प्रवृत्ति । मी स्रष्टा हे अहंकृति । वास्तव स्मृति उमजेना ॥८९॥स्थापिलों अनात्मप्रकृति नांवें । प्रेरितां रजोवाताच्या स्वभावें । तेणें स्वकुल नोहे ठावें । पडिलों धांवे भ्रमाचे ॥३९०॥तेणें भ्रमाक्त झाले नयन । म्हणोनि नुमजे तव महिमान । तूं चिदात्मा नित्य निर्गुण । लीलें करून अवतरसी ॥९१॥मत्स्यादि अवतार धरूनि नाना । करावया धर्मसंस्थापना । न मोडतां स्वतंत्रपणा । मायावरणा पसरसी ॥९२॥मायाजाळें गुंतले जीव । भ्रमें परतंत्र झाले सर्व । तूं स्वतंत्र वासुदेव । न बाधी लाघव तुज तुझें ॥९३॥तैसाचि एथ वत्सपां वत्सां । सारिखा झालासि स्वइच्छा । अविद्याभ्रमें भ्रमितां तुच्छा । केवीं अनिच्छा तूं होसी ॥९४॥आत्मयोगें तूं चिदात्मा । अचिंत्यऐश्वर्य मायागरिमा । प्रकटूनि क्रीडसी मेघश्यामा । तें नुमजे अधमा विमुखांसी ॥३९५॥विश्वसृजनकाळीं विधि । ऐसा भाससी कृपानिधि । येणें विष्णूतें पालनसिद्धि । करिसी त्रिशुद्धि परेशा ॥९६॥प्रलयकाळीं त्र्यक्षापरी । होऊनि प्रवर्तसी संहारीं । ते हे तुझी ऐश्वर्यथोरी । आम्हीं पामरीं नेणिजे ॥९७॥नसतां जन्मासि कारण । अवतरसी तूं अकारण । सर्वकारणाकारण । गुणपरिपूर्ण चिदात्मा ॥९८॥सुरेष्वृषिष्वीश तथैव नृष्वपि तिर्यक्षु यादःस्वपि तेऽजनस्य ।जन्मासतां दुर्मदनिग्रहाय प्रभो विधातः सदनुग्रहाय च ॥२०॥विष्णु सूर्य हयग्रीव । मरीचि पावक निशाधव । वरुण वित्तप श्राद्धदेव । विभूतिअवयव हे तुझे ॥९९॥शंकर आणि पुरंदर । अजित अधोक्षजादि अपर । शक्ति गणेश तवावतार । देवकोटींत असंख्य ॥४००॥कपिल दत्तात्रेय वामन । याज्ञवल्क्य द्वैपायन । भृगु नारद नारायण । इत्यादि पूर्ण ऋषीमाजीं ॥१॥पृथु आणि भार्गवराम । मनुष्यांमाजीं नृपोत्तम । धर्मस्थापक यशस्काम । जो श्रीराम दाशरथि ॥२॥ऋषभदेव विदेही जनक । इत्यादि राजर्षि अनेक । मोहिनीमदालसाप्रमुख । हे अवतार देख तुझे प्रभु ॥३॥वराह सिंह शरभादिक । तुझे अवतार हे तिर्यक । जलचर मत्स्यकूर्मप्रमुख । अवतार विशेष पैं तुझे ॥४॥ऐसे अवतार असंख्यात । अनंत कल्पीं न लगे अंत । पूर्वींच निरोपिली हे मत । वदों किमर्थ पुनः पुनः ॥४०५॥तूं अजन्मा केवळ अजन । नसतां जन्मासि कारण । करावया धर्मसंस्थापन । लीलेंकरून अवतरसी ॥६॥सज्जनावरी अनुग्रह । दुर्मददैत्यांचा निग्रह । स्वमाया प्रकटिसी विग्रह । धर्मसंग्रह कैपक्षें ॥७॥तिर्यगादि होतां जाण । तुझें न मळे वास्तव ज्ञान । म्हणोनि ईश हें संबोधन । समर्थपण जाणोनी ॥८॥धातृसंबोधनाचा अर्थ । निष्काम कर्म जें यथार्थ । जाणोनि चारही पुरुषार्थ । देतां समर्थ नेच्छितां ॥९॥असज्जनाचें दुर्मदहरण । सज्जनाचें अनुग्रहण । फेडावया निष्काम ऋण । इतुकें कारण तव जन्मा ॥४१०॥एथ शंका करिसी हरि । जरी मी स्वइच्छा अवतारी । कुत्सित कर्म नसतां पदरीं । कुत्सिततर कां जन्मा ॥११॥मत्स्यकूर्मादि सूकर । इत्यादि योनि कुत्सिततर । नसतां पूर्वकर्मसंस्कार । केवीं स्वतंत्र अवतरे ॥१२॥वामन होऊनि मागणें भीक । कीं वनवासीं सीताशोक । कीं गोपीचा धर्षणधाक । घेऊनि निःशंक पलायन ॥१३॥तरी ऐकें गा पुरुषोत्तमा । कोण जाणे तुझा महिमा । अचिंत्य ऐश्वर्यें जन्मकर्मां । रूपनामा प्रकटिसी ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP