मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक १ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक १ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ Translation - भाषांतर ब्रह्मोवाच :- नौमीड्य तेऽभ्रवपुषे तडिदंबराय गुंजावतंसपरिपिच्छलसन्मुखाय । वन्यस्रजे कवलवेत्रविषाणवेणुलक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपांगजाय ॥१॥पशुपांगज कवळपाणि । परी हा केवळ चक्रपाणि । ऐसा निश्चय अंतःकरणीं । करूनि स्तवनीं प्रवर्तला ॥३७॥ईड्य म्हणिजे स्तवनायोग्य । तो तूं जगदात्मा श्रीरंग । येर अवघेंचि अयोग्य । अंतरंग तूं नसतां ॥३८॥अगा ईड्या नौमि तुतें । ममापराध क्षमापनार्थें । तुजकारणें तोषावयातें । स्तवनें चित्तें स्तवितों मी ॥३९॥माझिया स्तवना तूंचि अर्ह । माझा श्रेष्ठपणाचा गर्व । तुझेनि दर्शनें हरला सर्व । सुख अपूर्व मज झालें ॥४०॥म्हणोनि माझिया सद्गुरुनाथा । तूं एक ईड्य उपनिषदर्था । अर्था स्वार्था आनि परमार्था । तूं सर्वथां आश्रय ॥४१॥गगनगर्भीं सजलघन । तैसें ब्रह्मीं मायिक ध्यान । नटोनि छेदिला ममाभिमान । तो घनतनु मी नमितों ॥४२॥सजलमेघीं सौदामिनीं । तैसी चित्प्रभा सर्वां करणीं । पीतांबरीं तो परिवेष्टूनि । नटनाटका तुज नमों ॥४३॥विषयविरागें निष्काम भक्त । चिन्मात्रैक जे अनुरक्त । गुंजावतंस ते मिरवत । श्रवणासक्त श्रवणीं जें ॥४४॥चिन्मात्रप्रभा अवलोकनीं । दृष्टि मुरडोनि रमली नयनीं । जागृतीपासूनि उन्मनी - । पर्यंत चिद्धनीं समरसली ॥४५॥ते उघडेचि दिसती डोळे । दृश्यादि त्रिपुटीसि वेगळे । परमानंदाचे सोहळे । भोगितां ठेले समरसुनी ॥४६॥पंचभूतादि त्रिगुणप्रभा । सांडूनि निवडला चिन्मात्रगाथा । तयाच्या परिष्वंगलोभा । साक्षित्व शोभा फेडिली ॥४७॥ते बर्हिबर्हावरील डोळे । दृश्य न सिवोनि सोवळे । कृष्णरंगीं रंगोनि गेले । कृष्णें धरिले निजमौळीं ॥४८॥बर्हपिच्छ गुंजावतंस । तेथील मुखीं फांके प्रकाश । वाक्यश्रवणेंसी अभ्यास । जेवी दाविती न्यास वक्त्रत्वीं ॥४९॥लाल सभोग सुखाचे चाडे । फलपुष्पादि लांकडें । गुणाभिलाषें कवळिती कोडें । तें येथ न घडे निर्गुणीं ॥५०॥कस्तुरी नोहे काळेपणें । कीं रसाळ नोहे पात्रगुणें । तें मसिपात्रचि उत्तमवर्णें । जेंवी रक्षणें धनबुद्धि ॥५१॥तेवी स्वभक्ताचिया बोला । कोमल जर्वट कां वाळला । रानीचा रानट ओला पाला । परी गोविला सप्रेमें ॥५२॥आपणा देऊनि सप्रेमळां । पालटें बोलेचि घेतला । न विसंभेचि घाली गळां । ते वनमाळा श्रीकृष्ण ॥५३॥साक्षीवांचूनि अप्रमाण । म्हणोनि दावी श्रीवत्सचिन्ह । मुद्रांकित हृद्भूषण । तें गाहण स्वजनाचें ॥५४॥उघड मिरवी पुढिलांसाठीं । फुकट तुलसीचिया मुष्टि । अर्पणें माझिये सवसाटि । हे त्या गोठी कळावया ॥५५॥ब्रह्म स्वगोडी चाखावया । नटोनि आलें पशुपालया । स्वबोध दध्योदन काल्या । लांचाऊनियां लांचवी ॥५६॥तो स्वादु भावाचा कवळ करी । स्वरतांचिये वदनीं भरी । ब्रह्मा म्हणे मी अनधिकारी । कीं तो मुरारि मज नेदी ॥५७॥पशुवें गुंतलीं विषयचारीं । तीं वळोनी लावी स्वमोहरीं । तो विवेकवेत्र श्रीकृष्णाकरीं । पाहे नेत्रीं विरिंचि ॥५८॥आम्नाय माथांचें विषाण । श्रीकृष्ण स्वासानिळें धमन । करूनि बोधी स्ववृत्तगण । वन निर्गुण सेवावया ॥५९॥अकार उकार मकार । दंड कमंडलु अर्धचंद्र । सबिंदु प्रणव सप्तस्वर । धरी श्रीधर तो वेणु ॥६०॥कवल वेत्र विषाण वेणु । हृदयीं श्रीवत्सलांछन । इत्यादि लक्ष्ममंडित कृष्ण । चतुरानन अधिवंदी ॥६१॥सोहंसाक्षित्वाचें कठिण । फेडूनि मृदुतर चित्पदपूर्ण । भक्तानुग्रहविग्रहें सगुण । ते श्रीचरण श्री सेवी ॥६२॥फेडूनि द्वैताची कंचुकी । सप्रेम सुखाची अळुकी । स्तनरूप ती हे वाहे धडकी । तळवा चुचुकीं मर्दितां ॥६३॥बाळ तरणीहूनी उजवट । मृदुल रातोत्पळीचें पोट । स्मररमणीचे कोमळ ओष्ठ । त्याहूनी चोखट मृदुपद ॥६४॥नंदनंदन पशुपांगज । इत्यादि चिन्हीं तेजःपुंज । ब्रह्मत्वाची न मोडे वोज । हें जाणोनी गुज विधि वंदी ॥६५॥मग म्हणे जी जनार्दना । प्रतिज्ञापूर्वक करूनि नमना । स्तविसी स्वरूपा परिच्छिन्ना । तरी विश्वमोहना हें न म्हणा ॥६६॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP