मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक ३१ ते ३२ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक ३१ ते ३२ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३२ Translation - भाषांतर अहोऽतिधन्या व्रजगोरमण्यः स्तन्यामृतं पीतमतीव ते मुदा ।यासां विभो वत्सतरात्मजात्मना यत्तृप्तयेऽद्यापि न चालमध्वराः ॥३१॥सामान्ययोनींमाजि जन्म । भक्तिभाग्यें भगवत्प्रेम । जेथ ब्रह्माही सकाम । वर्णाग्र्यभ्रमें सांडूनी ॥७॥तेथ इतरांची अहंता । कायसी वर्णादिवरिष्ठता । जो अनुसरे भक्तिपथा । तो वंद्य तत्त्वतां विधिहरां ॥८॥परमाश्चर्यें म्हणे विधि । धन्य यांची भाग्यसमृद्धि । धन्य यांची सुकृतसिद्धि । चित्तशुद्धिपूर्वक ॥९॥धन्य व्रजींच्या गाई गोपी । ज्या अकल्प तपल्या विशुद्ध तपीं । भावें भजल्या संकल्पलोपीं । निर्विकल्पीं निष्काम ॥७१०॥ज्यांचिया वत्सांची अगवणी । तुवां घेऊनि चक्रपाणि । बळेंचि कांसेसि रिघोनी । स्तन्य पिऊनि तोषसी ॥११॥औरसा पुत्रा म्हणती आत्मा । त्याच्या मोहें पावती भ्रमा । बद्ध होऊनि हेमधामा । पडती दुर्गमा माजिवडें ॥१२॥जो तूं ब्रह्म सनातन । होऊनि गोपींचा नंदन । परमात्मा कीं संतोषोन । त्यांएं स्तन्य प्यालासी ॥१३॥म्हणसी आश्चर्ये काय येथ । तरी ब्रह्मादिकांसहित । यजितां अध्वरीं यथोचित । नोहसी तृप्त अद्यापि ॥१४॥द्रव्यतपादि याग बहुत । ज्याचे तृप्तीसि असमर्थ । तो तूं गोपींचें स्तन्यामृत । प्यालासि अद्भुत हें वाटे ॥७१५॥चतुराक्षर दोनी वार । त्यावरी पढती द्वयाक्षर । त्यावरी पढती पंचाक्षर । पुन्हा द्व्यक्षर पढताती ॥१६॥पंचप्रेषवषट्कारीं । वेदविहित यथोपचारीं । यजितां तुष्टीच्या परपारीं । कोणीं अध्वरीं न पविजे ॥१७॥त्या तुज घुरटा या गौळणी । आणि धेनु या पशुयोनि । तृप्त करिती स्तन्यपानीं । भाग्यें म्हणोनि आश्चर्यें ॥१८॥ऐसें आश्चर्य निजमानसीं । करूनि प्रेमें उकसाबुकशीं । स्फुंदे आणि व्रजौकसांसी । आनंदेंशीं स्तवितसे ॥१९॥अहो भाग्यमहो भाग्यं नंदगोपव्रजौकसाम् । यन्मित्रं परमानंदं पूर्ण ब्रह्म सनातनम् ॥३२॥परमादरें आम्रेडितीं । व्रजौकसांची भाग्यसंपत्ति । चौं वक्रींच्या चौंभारतीं । करूनि वाक्यति स्तवितसे ॥७२०॥भूमंडळीं गौळवाडे । अपार असती त्यामाजी गाढे । भाग्य नंदाचें रोकडें । वर्णी निवाडें विरिंचि ॥२१॥नंदव्रजींचे जे निवासी । त्यांच्या अगाध भाग्यराशी । न गणविती मज विधीसी । शतxxxx xxकल्यें ॥२२॥ज्याचे गांठीं नाहीं कवडी । तो एक निर्दैव बराडी । त्याहूनि सुवर्ण निष्क जोडी । सभाग्य प्रौढी तो एक ॥२३॥कोटि सुवर्ण निष्क गांठीं । राजमान्य तो सभाग्य सृष्टीं । सर्व राजयांचिये मुकुटीं । धन्य जगजेठी चक्रवर्ती ॥२४॥त्याही ऐश्वर्याचीं मोलें । वेंचूनि शक्रत्व साधिलें । त्याहूनि विरक्त जे दादुले । भाग्याथिले सभाग्य ॥७२५॥त्याही विरक्तांमाजीं शूर । सत्यवादी सदाचार । जितेंदिर्य दयापर । तो सत्यपुरनिवासी ॥२६॥तो मी सत्यलोकराणा । जेथ न सरतां साठीं तृणा । तया कैवल्या निर्गुणा । सुहृद्गणना ज्याभाग्यें ॥२७॥गाईगोपींचा म्हणों काई । तृणादि प्राणिमात्र पाहीं । महद्भाग्याची नवाई । नंदालयीं भोगिती ॥२८॥पारमेष्ठ्य पदांच्या कोटि । जेथ नसतां तृणासाठीं । व्रजौकसांची भाग्यगोठी । कोणा ओठीं वदवेल ॥२९॥ज्याचा सखा परमानंद । पूर्णब्रह्म आनंदकंद । त्याचा भाग्यमहिमा विषद । वदों वेद न शकती ॥७३०॥पुनःपुनः परमाश्चर्य । करूनि चमत्कारला होय । अनंत ब्रह्मांडांची जो भ्यो । तो ज्यांस काय खेळणें ॥३१॥असो यांची भाग्यमहिमा । न वर्णवेचि निगमां आह्मां । परी आमुची सौभाग्यसीमा । पुरुषोत्तमा अवधारीं ॥३२॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP