मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक २ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक २ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २ Translation - भाषांतर अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोऽपि । नेशेमहि त्वतसितुं मनसांऽतरेण साक्षात्तवैव किमुताऽऽत्मसुखानुभूतेः ॥२॥सगुण सुलभ नेत्रांपुढें । प्रेम रसाचें रूपडें । सर्वेंद्रियां फावे कोडें । तैसें निवाडें अवतरलें ॥६७॥तरी याही तुझिया स्वरूपाचा । ब्रह्मादिक महिमा साचा । जाणो न शकती तेथ कैंचा । आणिकांचा प्रवेश ॥६८॥देव म्हणोनी संबोधन । स्वप्रकाशें द्योतमान । ज्याचे द्योतनें करून । आब्रह्मभुवन द्युतिमंत ॥६९॥हेंही देवा तुझें वपु । मदनुग्रहार्थ जें सकृपु । स्वजनइच्छेसारिखें रूप । सुरपादप पडिपाडें ॥७०॥देवकीवसुदेवांतें कळे । तैसें दावूनि बंदिशाळे । त्यांचे स्वेच्छेनें मोकळें । बाळलीले हें धरिलें ॥७१॥इतुका कळला असतां बोध । म्हणसी कैसेनि हें अगाध । तरी जेणें गुंतती विबुधबुध । झालों मुग्ध मी एथें ॥७२॥तें तूं ऐकें यादवराया । अयोनिसंभव तुझी हे काया । नोहे इतरां भूतमयां । तुल्य म्हणोनिया अगाध ॥७३॥अतर्क्य ऐश्वर्य हें तुझें । आपुलेनि प्रज्ञाबळें बुझें । ऐसा नसेची जेथें माझें । ज्ञान लाजे फल्गुत्वें ॥७४॥हेंचि अतर्क्य अधोक्षजा । द्विभाग जाहली कलिंदजा । पूतना पावविली सायुज्या । शोषूनि स्तनजा गरातें ॥७५॥शकट मृदुपदें भंजन । तृणावर्त प्रपातन । मेरूहूनी गरिष्ठपण । मिषें जृंभण जग दावी ॥७६॥मुखीं देखोनि ब्रह्मांडगोळ । माता व्यामोहें व्याकुळ । तिचे स्वेच्छेसारिखें केवळ । धरिलें कोमल हें वपु ॥७७॥यमलार्जुनां उन्मूळणें । नारदोक्तीपरिमार्गणें । गुह्यकाचे प्रबोधनें । हें कें करणें भूतमय ॥७८॥वत्सासुर बकासुर । मारूं आले कपटधर । त्यांचें कळलें अभ्यंतर । तें शरीर भूतमय ॥७९॥वत्सें वत्सप गिळिले अघें । स्वयेंचि त्याचे वदनीं रिघे । अक्षत स्वकीय काढूनि अवघे । मग सवेगें तो वधिला ॥८०॥त्याची विशुद्ध आत्मज्योति । पहातां अस्मदादि समस्तीं । तुझी लक्षूनि हेचि मूर्ति । समरस पावती जाहली ॥८१॥तें देखोनि पदाभिमानें । बद्ध झालों रजोगुणें । वत्सवत्सप म्यां दुर्जनें । मायिकपणें लपविले ॥८२॥तो त्वां निरसूनी दुस्तर मोहो । कृपेनें केला अनुग्रहो । जेणेंकरूनी तोचि हा देहो । नयनीं पाहो प्रत्यक्ष ॥८३॥केला अनुग्रहो मजवरी । त्या देहाची पाहतां थोरी । जन्म घेऊनि कोटीवरी । गुण निर्धारीं असमर्थ ॥८४॥अथवा विराट भूतमय । तुझें वपु म्हणों जरी ज्ञेय । तरी तेंही स्वामी अप्रमेय । विदित होय को ण्हींसी ॥८५॥आपुले आंगीं भां किति । गणनानियमें न गणिजती । मीं विराट पुरुषा तव गुण्यंति । अनियमगति अगाध ॥८६॥स्वेच्छामय किंवा विराट । याचे महिमेचा शेवट । नलगे तेथ नित्य निघोट । शुद्ध चोखट केवीं कळे ॥८७॥इयें शुद्ध सत्त्वात्मकें । मादृशस्वजनानुग्राहकें । मां ब्रह्म असिकें । केवीं कळे ॥८८॥करूनि शमादि साधन काढि । विशुद्ध मानस योगी हट्टी । त्यां हें सगुणचि न कळे कष्टीं । मां कैची गोष्टी अगुणाची ॥८९॥जें कां स्वानुभवैकगम्य । तुझें केवळ परम धाम । ब्रह्मादिकांस अति दुर्मळ । म्हणो तें रहस्य किमुत हें ॥९०॥एथ म्हणसी जनार्दना । जरी मी अप्राप्य साधना । तरी प्राकृतां अज्ञानां जनां । भवनिस्तरणा अनुपाय ॥९१॥यदर्थीं ऐकें पुरुषोत्तमा । सांडूनि जाणिवे इया श्रमा । जे अनुसरले भक्तिप्रेमा । त्यांचा महिमा परियेसीं ॥९२॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP