मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक ३ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक ३ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३ Translation - भाषांतर ज्ञाने प्रयासमुदपास्य नमंत एव जीवंति सन्मुखरितां भवदीयवार्ताम् । स्थाने स्थिताः श्रुतिगतां तनुवाड्मनोभिर्ये प्रायशोऽजित जितोप्यसि तैस्त्रिलोक्याम् ॥३॥ज्ञानसाधनाचे श्रम । जिहीं जाणोनि अतिदुर्गम । सोडिला तत्प्राप्तीचा उद्यम । यत्न अणुसम न करितां ॥९३॥स्वस्थ सद्भावें आपुले सदनीं । राहिले होत्साते अनुदिनीं । तुझिया गुणवर्ता सज्जनीं । कथितां श्रवणीं ज्या पडली ॥९४॥सज्जनवेषें असज्जन । तव्गुणमिषें पाषंडकथन । हें उमजावया भाविकजन । सावधान परिसोत ॥९५॥द्रव्यलोभें गुणपाठक । केवळ कळिकाळींचे ते ठक । सोंग दावूनि ठकविती लोक । अतिदांभिक शठ दुष्ट ॥९६॥जेवीं वार्द्धूष वराटिका - । लोभें वस्तु ओपिती लोकां । तेंवी सधना सकामुकां । नाना कौतुक शंसिती ॥९७॥हरिकथा हें नाममात्र । एरव्हीं ढोढाख्याचरित्र । श्रोते वक्ते निरयपात्र । श्रोत्रवक्र वाढवितां ॥९८॥सोडूनि अन्य व्यवसाव । अवगुणींचे महानुभाव । पोटीं द्रव्याचा उपाव । वरी महत्त्व संतांचें ॥९९॥वर्णाश्रमाचारधर्म । नवांमाजीं कोण्ही प्रेम । नाहीं सन्मार्गीं नित्य नेम । बाह्यसंभ्रम पोटार्थ ॥१००॥तें अशास्त्र अनाधार । पुराणोक्त ना शिष्टोद्गार । पाखंडगाथा स्वैराचार । प्रशंसापर दुर्वक्ते ॥१॥ऐशियां असज्जनांपासून । असत्कथांचें करिती श्रवण । तेही फुकट देऊनि धन । नरकसाधन प्रयत्नें ॥२॥सुलभ सांडूनि पीयूष । मोल वेंचूनि घेती विष । प्राणहानीचा मानिती तोष । जेवीं सदोष सव्रीड ॥३॥ऐसे नव्हते ते सज्जन । जे कां सन्मार्गपरायण । नित्यनेमें भगवद्गुण । करिती कीर्तन सप्रेमें ॥४॥ज्यांचेनि मुखें जे मुदितां । तव गुणाची रसाळ वार्ता । त्यांचेनि सन्निधिमात्रें चित्ता । आनंदभरिता परिसती ॥१०५॥ऐशी तुझिया गुणाची कथा । श्रवणें नाशिजे भवव्यथा । बैसवी मोक्षाचिये माथां । जे परमार्था मूळभूमी ॥६॥असतां आपुले स्वेच्छासदनीं । सज्जनीं स्वभावें गातां वदनीं । सहज स्थितीनें पडतां कानीं । आनंद मनीं उद्बोधी ॥७॥आलिया पाषाण निजांगणीं । तो जरी सकळ चिंतामणि । झालिया तयाचे रक्षणीं । आळस कोणी न करी कीं ॥८॥तैशी अनायासें तुझी कथा । श्रवणा आली न प्रार्थितां । तिणें हरितां दुस्तर व्यथा । मग सर्वथा न त्यजिती ॥९॥कायावाचामनेंकरून । अनन्यभावें होती शरण । अभिवंदिती प्रशंसून । करिती कीर्तन सप्रेमेम ॥११०॥ऐसे श्रवण कीर्तनपर । ज्याचें जीवित निरंतर । त्याविण साधनप्रकार । जे अणुमात्र न करिती ॥११॥परी जे तव गुणांहूनी । पढियें मानूनि घेती श्रवणीं । अभिवंदिती सत्कारूनि । गाती वदनीं सप्रेमें ॥१२॥ज्यापासूनि श्रवणा रुचि । झाली उपरति मानसाची । गोडी रुचली स्वानंदाची । हे कृपा त्यांची कळली कीं ॥१३॥लोहा पालटि स्पर्शमणि । कीं चिंता पुरवी चिंतामणि । अमूल्य रत्नीं कां पाषाणीं । यांची करणी केवीं घडे ॥१४॥मलयागरें वेधती काष्ठें । कीं भस्म होती हव्यवाटें । तेवीं मिडगणें लखलखाटें । वाळुवंटें न जळती ॥११५॥तेथ उसिना रविप्रकाश । तैसा बाह्य विद्याभ्यास । नेदी स्वानुभवाचा लेश । प्रेमा ओस हृदयीं तो ॥१६॥म्हणोनि जिहीं हरिगुण । गाऊनी वेधिलें अंतःकरण । तेचि कृपाळु सज्जन । स्वानंदघना ओळखिले ॥१७॥तेथ कायावाचामनेंधनें । अवंचकता अनन्यपणें । सोडूनि येरें ज्ञानसाधनें । तव गुणश्रवणें रंगलें ॥१८॥जळावेगळा न वसे मीन । तैसें कथामृताचें श्रवण । यावज्जीवन हें जीवन । करूनि धन्य हे झाले ॥१९॥जो तूं अजिंक्य लोकत्रयीं । कोण्ही जिंकिला न वचसी कांहीं । त्या तुज आजि जिंकिलें तिहीं । बैसले ठायीं गुणश्रवणें ॥१२०॥ब्रह्मादिकां दुर्लभब भेटी । सनकादि सांडूनी वैकुंठीं । तूं प्रकटसी कोरडे काष्ठीं । वचनासाठीं तयांच्या ॥२१॥शत क्रतूंचे राबणें । देखोनी शक्रत्वास भीकणें । त्या तुज जिंकूनी आंगवणें । द्वाररक्षणें ठेविलें ॥२२॥शिवादि पादोदक मुकुटीं । धरूनी ध्याती श्मशानमठीं । त्यांतें उमरडूनी वळी थाटी । धरूनि काठी वत्सांच्या ॥२३॥स्वाधीन कैसी प्रेमचाडें । मागें अनेक देखिले गाढे । अझून होतील पुढें पुढें । कृपाउजेडें ते दिसती ॥२४॥पुंडरिक द्वारीं उभे । करील प्रेमाच्या वालभें । तेथील कीर्तनाचिया लाभें । कलि न शोभे लाजोनी ॥१२५॥प्रेमें जिंकोनी धर्म बळी । काढवी जो पत्रावळी । शब्द नुलंघवील पांचाळी । आज्ञे तळीं ठेवील ॥२६॥अर्जुनें धोवविलीं घोडीं । भीष्म युद्धाचे कडाडीं । ....................... । हारी रोकडी ओपील ॥२७॥एका गह्रीं वाहसील पाणी । एका मागें फिरसी रानीं । बैसोनि एकाचे कीर्तनीं । करिसी दाटूनी परिचर्या ॥२८॥शंख चक्र गदा पद्म । वाहतां न चले तव विक्रम । तिहीं जिंकिलासि निष्काम । काम ज्यांचें प्रेम तवगुणीं ॥२९॥त्यांसी ज्ञानाचे सायास । करणें नलगे योगाभ्यास । भक्ति सार ज्ञान भूस । तो विशेष विधि बोले ॥१३०॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP