मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक ३८ ते ४५ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक ३८ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३८ ते ४५ Translation - भाषांतर जानन्त एव जानन्तु किं बहूक्त्या न मे प्रभो । मनसो वपुषो वाचो वैभवं तव गोचरः ॥३८॥कोण्ही मिरविती जाणपण । त्या उपहासें म्हणे द्रुहिण । जाणते जाणोत तव महिमान । परी मजलागून दुर्ज्ञेय ॥८४०॥काय बोलों बहु चावटी । तव महिमेची अचिंत्य गोठी । काया मनें कां वाक्पटीं । नेणें कोटि जन्मीं मी ॥४१॥मनबुद्ध्यादि अंतःकरणा । तुझिया अचिंत्य ऐश्वर्यगुणा । असमर्थ मी परिज्ञाना । वृथा वल्गना कां करूं ॥४२॥आतां विनति जनार्दना । मज लेंकुरा निजांघ्रिशरणा । नाठवूनियां दुष्टाचरणा । कीजे करुणा कारुण्यें ॥४३॥अनुजानीहि मां कृष्ण सर्वं त्वं वेत्सि सर्वदृक् । त्वमेव जगतां नाथो जगदेतत्तवार्पितम् ॥३९॥सृष्टिकर्ता मी जगत्पति । हे अहंता टाकूनि परती । विनीत होऊनि करीं विनति । म्हणे श्रीपति अवधारीं ॥४४॥आपुला किंकर ऐसा मातें । पूर्ण जाणावें कृपावंतें । देहाभिमान म्यां अर्पिला तूंतें । श्रीअनंतें जाणिजे ॥८४५॥अचिंत्यैश्वर्य तुझा महिमा । तूंचि जाणसि पुरुषोत्तमा । आम्हां पामरांची ही गरिमा । सर्वोत्तमा तुज विदित ॥४६॥आम्हां अवघियां नियोगवंता । ज्ञानबळादि ऐश्वर्य सत्ता । तुझीच ऐसें तूं जाणता । कीं सर्ववेत्ता सर्वदृक् ॥४७॥समुद्राचिये वाळवंटीं । विहिरी वेगळाल्या देखिल्या दृष्टी । परी जलोद्गमादि राहाटी । सिंधुपोटीं अवधी ती ॥४८॥माझिया विराट देहा आंत । जगें नांदती स्वगुणांसहित । त्यां सर्वांचा तूंचि नाथ । हें झालें विदित मज आतां ॥४९॥जगत्पति मी सृष्टिकर्ता । ऐशी होती पृथग्ममता । ते तुज अर्पिली जगन्नाथा । कृपावंता जगदीशा ॥८५०॥निष्कपट मी अनन्य शरण । हें तूं जाणसी सर्वज्ञ । माझे अपराध क्षमा करून । प्रस्थापन करवावें ॥५१॥ऐसें विनवूनि परमेष्ठी । कृष्णचरणीं तैशीच दिठी । पदरज वंदी चहूं मुकुटीं । प्रेमा पोटीं न समाये ॥५२॥पुढती दुर्लभ मज हें ध्यान । म्हणोनि अश्रु ढाळिती नयन । माझा जळो हा पदाभिमान । मजहूनि धन्य व्रजवासी ॥५३॥मग आदरें नमस्कारी । संबोधूनि सन्मुख करी । तया संबोधनाची परी । सावध चतुरीं परिसावी ॥५४॥श्रीकृष्ण वृष्णिकुलपुष्करजोषदायिन् क्ष्मानिर्जरद्विजपशूदधिवृद्धिकारिन् । उद्धर्मशार्वरहर क्षितिराक्षसध्रुगाकल्पमार्कमर्हन्भगवन्नमस्ते ॥४०॥मायायुक्ता भो श्रीकृष्णा । वृष्णिकुलाऽब्जवनतोषणा । तुज उपमितां चंडकिरणा । वाटे मम मना गौणत्व ॥८५५॥परी ज्यामाजीं असे जितुकें ज्ञान । तितुकेन बोधें तो संपन्न । यालागें माझ्या उपमा गौण । परी हें स्तवन प्रेमाचें ॥५६॥नापिततनयें रायासि जनक । म्हणतां नुपमावा नापिक । जीवन उपमे पातळ उदक । परी प्रेमा अधिक लक्षावा ॥५७॥पृथ्वी पशु आणि द्विजादि अमर । हेचि चारी चतुःसागर । निज उदयें यां वृद्धिकर । तरी तूं चंद्र श्रीकृष्णा ॥५८॥उद्धर्म म्हणिजे उत्पथगामी । केवळ ज्यांसि उपमा तमीं । त्यांचा नाशक स्वधर्मव्योमीं । रविशशिनामीं प्रकटोनी ॥५९॥ भूमंडळीं जे राक्षस । जिहीं रात्रीचा केला दिवस । वरिवरी दिसती विविध वेष । केशी कंस इत्यादि ॥८६०॥स्वधर्मदिवसाची करूनि रजनी । अविधि प्रवर्तले हिंसाचरणीं । त्यांतें द्रोहिता तूं प्रतापतरणि । स्वधर्मकिरणीं प्रकटतां ॥६१॥अग्निद्रोहक जैसें नीर । किंवा हिमतमारि भास्कर । तैसा तुझा हा अवतार । द्रोहकर दुष्टांतें ॥६२॥पुढील कार्यार्थसूचने । रविशशिउपमा संबोधनें । संबोधूनियां चतुराननें । पुढती निजमनें विवरिलें ॥६३॥रविशशिउपमा कनिष्ठ तर । मानूनि म्हणे तूं सर्वेश्वर । रविशशींचें अभ्यंतर । व्यापक स्वतंत्र तूं पूज्य ॥६४॥सर्वेश्वरा तूं सर्वपूज्या । जगद्रूपा जगद्वीजा । षड्गुणैश्वर्यें सुतेजा । गरुडध्वजा तुज नमो ॥८६५॥आकल्प माझा देह जों आहे । तंव तव पदीं मौळ राहे । ऐसें माझें नमन आहे । प्रभूनें स्नेहें पाळावें ॥६६॥शुकासि म्हणे परीक्षिति । चंद्रसूर्य उपमायुक्ति । विधीनें बोलिला श्रीपति । किमर्थ मजप्रति तें सांगा ॥६७॥शुक म्हणे गा विचक्षणा । करावी धर्मसंस्थापना । प्रतिपाळावें गोब्राह्मणा । पृथ्वीसुरगणा रक्षावें ॥६८॥वृष्णिकुलासि द्यावा तोष । हरावे अधर्मी सदोष । आणि त्रासावे क्षितिराक्षस । दैत्यांचा नाश करावा ॥६९॥इतुक्या कार्याच्या उद्देशें । आज्ञा करितां प्रभुत्व दिसे । म्हणोनि संबोधनाच्या मिषें । कार्यें अशेषें सुचविलीं ॥८७०॥पूर्वीं स्तविला व्यापकपणें । झणें राहिला बोधें तेणें । अवतारकार्यसंबोधनें । म्हणोनि सूचने दाविलें ॥७१॥वत्सें आणि वत्सप सखे । यांचें मोक्षण करूनि कौतुकें । स्वपुत्रमोदाकारणें हरिखें । अवघ्या वेखें अवतरला ॥७२॥अद्भुत दावूनि विरिंचीसी । मंगलकर्ता व्रजौकसांसी । तोचि श्रोतयां वक्तयांसी । अभीष्टासी मेळवी ॥७३॥श्रीशुक उवाच - इत्यभिष्टूय भूमानं त्रिः परिक्रम्य पादयोः । नत्वाऽभीष्टं जगद्धाता स्वधाम प्रत्यपद्यत ॥४१॥सर्वैश्वर्यसंपन्नाते । जाणोनि विधीनें श्रीकृष्णातें । स्तवन केलें तें राया तूंतें । परिसविलें शुक म्हणे ॥७४॥ऐसा स्तवूनि श्रीभगवान । त्रिवार प्रदक्षिणा करून । पुनः पुनः करूनि नमन । ब्रह्मा प्रयाण आदरी ॥८७५॥श्रीकृष्णाचे चरण दोन्ही । तेथ ठेऊनि चार्ही मूर्ध्नि । आपुले अभीष्ट प्रयाणीं । पद्मयोनि प्रवर्तला ॥७६॥अभीष्ट स्वधाम तें सत्यभुवन । जें सर्वपूज्य परम पावन । आपणा अभीष्ट तत्प्रयाण । आज्ञा घेऊनि आदरी ॥७७॥संबोधोनि कार्यार्थसंज्ञा । घेऊनि कृष्णाची अनुज्ञा । विश्वपूज्या अभीष्ट सदना । सत्यभुवना विधि गेला ॥७८॥ततोऽनुज्ञाप्य भगवान् स्वभुवं प्रागवस्थितान् । वत्सान् पुलिनमानिन्ये यथापूर्वसखं स्वकम् ॥४२॥ब्रह्मयातें विसर्जून । त्यानंतरें श्रीभगवान । पूर्ववत्सें पुरस्करून । आणिता झाला पुलिनातें ॥७९॥कैसें पुलिन तें म्हणाल । तरी जेथ स्वसखयांचा मेळ । यथापूर्व भोजनशीळ । आला गोपाळ त्यांमाजीं ॥८८०॥एकस्मिन्नपि यातेऽब्दे प्राणेशं चान्तराऽऽत्मनः । कृष्णमायाहता राजन् क्षणार्धं मेनिरेऽर्भकाः ॥४३॥म्हणाल पुलिनीं संवत्सर - । पर्यंत कैसे होते स्थिर । क्षुधातृषादि दुर्निवार । केवीं कुमार विसरले ॥८१॥तरी जें पढियें प्राणांहून । त्याच्या वियोगाचा क्षण । बाधी कोटियुगांसमान । तेवीं युगही क्षण प्रियसंगें ॥८२॥ऐशी अगाध हरीची माया । त्या श्रीकृष्णें मोहितां गडियां । अब्द क्षणार्धा परी राया । मानूनियां विसरले ॥८३॥किं किं न विस्मरन्तीह मायामोहितचेतसः । यन्मोहितं जगत्सर्वमभीक्ष्णं विस्मृतात्मकम् ॥४४॥मायामोहित ज्यांचें चित्त । ते काय न विसरति एथ । जिच्या मोहें विश्व समस्त । आपआपणांतें विसरले ॥८४॥ऊचुश्च सुहृदः कृष्णं तेऽतिरंहसा । नैकोऽप्यभोजि कवल एहीतः साधु भुज्यताम् ॥४५॥मायेनें मोहिलें म्हणोन । वत्सप नेणती हरिविंदान । म्हणती कृष्णा त्वरेंकरून । तुझें आगमन जाहलें ॥८८५॥आम्ही तुजवेगळें पाहीं । एकही ग्रास जेविलों नाहीं । आतां वत्सांची शंका कांहीं । नसेचि तूंही जेवीं ये ॥८६॥वत्सें आणिलीं त्वां समीप । तेणें निरसला विक्षेप । आतां जेवूं ये सुखरूप । अवघे वत्सप मिळोनि ॥८७॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP