मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक ५ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५ Translation - भाषांतर पुरेह भूमन्बहवोऽपि योगिनस्त्वदर्पितेहा निजकर्मलब्धया । विबुद्ध्य भक्त्यैव कथोपनीतया प्रपेदिरेंऽजोऽच्युत ते गतिं पराम् ॥५॥भूमन् म्हणिजे सर्वात्मका । अपरिछिन्न विश्वपालका । ब्रह्मा म्हणे भजनविमुखां । ज्ञानसाधकां न लभसी ॥१९०॥पूर्वीं येचि लोकीं फार । कर्मयोगादि साधनें घोर । करूनि सिणतां योगीश्वर । नाहीं परपार पावले ॥९१॥योगीश्वरही पावले शीण । तेथें सामान्या पुसे कोण । मग जाणोनि भक्तीचें महिमान । जाहले शरण सप्रेमें ॥९२॥उष्णें तापल्या कळे छाया । कीं दुष्काळीं निवडे दया । तेंवि आले भजनालया । कष्टोनियां बहु योगी ॥९३॥मरतां घडे अमृतपान । पुरीं बुडतां नौकाग्रहण । तैसे योगी पावले शीण । त्या श्रीपादभजन जोडलें ॥९४॥ब्रह्मा म्हणे जी कवळपाणि । केंवि त्या प्रेमा श्रीपादभजनीं । ऐशिये शंकेच्या निरसनीं । माझी वाणी निरूपी ॥१९५॥ज्ञानसाधनीं पावतां शीण । भाग्यें सत्संग जोडला पूर्ण । तेथें होतां कथाश्रवण । कळलें महिमान चरणांचें ॥९६॥न होतां अनन्यभावें शरण । सहसा न चुके जन्ममरण । सत्संगें हे खळलें जाण । कथाश्रवणप्रसंगें ॥९७॥शाखेवरूनि चंद्रापाशीं । पावविती जेंवि दृष्टीसी । तेंवि कथाश्रवणें हृषीकेशी । चरणापाशीं पावविलें ॥९८॥विषयासक्त होतें मन । स्वर्गांगना स्रक्चंदन । तदभिलाषें कर्माचरण । तें परतोन उमजविलें ॥९९॥विषोक्त पक्कान्नें रुचिकर । जाणोनि बुभुक्षु भक्षणपर । त्यासि कळल्या अभ्य़ंतर । सांडी आदर तेथींच ॥२००॥जेणें त्यातें उमजविलें । तेणें मरणौनि परतविलें । अमरणातें भेटविलें । तेंवि हें केलें कथाश्रवणें ॥१॥सज्जनमुखें स्वाभाविक । सत्कथाश्रवण सद्विवेक । उमजतांचि पादोन्मुख । प्रेमा निष्टंक उपजला ॥२॥मग ईहा म्हणिजे चेष्टाजात । कायवाङ्मनोव्यापारजनित । आणि कर्में जे जे यथोचित । ते करिती त्वदर्पित सप्रेमेम ॥३॥वर्णाश्रमाचारवंत । होऊनि आराधितां भगवंत । अनुग्रहूनि कैवल्य देत । हा वृत्तांत स्मृतीचा ॥४॥भक्तीवांचूनि वर्णाश्रम । करणें तो तो वृथाश्रम । भक्तिपूर्वक जो स्वधर्म । भजनप्रेम तें अवघें ॥२०५॥तेंचि ईहादि सर्व कर्म । तुज अर्पिती जे सप्रेम । तो अपणानुक्रम । सोपा परम हरिभजनीं ॥६॥ईहा म्हणिजे चेष्टाजात । सहज स्थितिसंकल्पसहित । शिंक जांभई अकस्मात । खोकला उचकी स्पंदन ॥७॥तेही नामस्मरणात्मक । तुज अर्पिती नैसर्गिक । जागृत्स्वप्नसुषुप्त्यात्मक । ईहा सम्यक अर्पणें ॥८॥कर्म म्हणिजे वेदोदित । गुरूपदिष्ट यथा विहित । नित्यनैमित्तिककामनारहित । चित्तशुद्ध्यर्थ सप्रेमें ॥९॥अभेदभजनाधिकारसिद्धि । लक्षूनि इच्छिजे चित्तशुद्धि । ओतप्रोत भगवद्बुद्धि । ज्ञान अविरोधि तें कर्म ॥२१०॥कृष्णप्रीत्यर्थ हा संकल्प । क्रियाकलाप कृष्णरूप । कृष्णीं प्रेमा निर्विकल्प । हें चिद्रूप कर्मफळ ॥११॥ऐसें ईहादि कर्माचरं । सप्रेम करितां त्वदर्पण । चौथी भक्ति जें वास्तवज्ञान । प्रकटे आपण तव कृपा ॥१२॥सद्भावेंसी सत्सेवन । सत्संगति सत्कथाश्रवण । श्रवणें प्रकटे अभेदभजन । भजनें ज्ञान प्रकाशे ॥१३॥तये ज्ञानभक्तींकरून । अभेद आत्मा श्रीभगवान । अपरोक्षबोधें समरसोन । तव निर्वाण पावले ॥१४॥मायानियंता कैवल्यपति । त्या तुझी परमनिर्वाणगति । निर्विकार ब्रह्मस्थिति । अभेदभक्ति पातले ॥२१५॥कार्या स्वकारणेंचि प्राप्ति । तेचि त्यांची परमगति । तुज परमात्म्याची परमगति । ते दुर्लभ प्रपति तव भजन ॥१६॥जें कां दुर्लभ तपःसाधनीं । शास्त्राभ्यसनीं यज्ञाचरणीं । अंजः म्हणिजे सुलभपणीं । अभेदभजनीं ते प्राप्ति ॥१७॥एवं पंचमश्लोकावधि । संबोधूनि वदला विधि । तो अशेषार्थ यथाविधि । कुशलबुद्धि परिसोत ॥१८॥यथादृष्ट वर्णूनि ध्यान । संबोधूनि केलें नमन । प्रथम श्लोकीं हें व्याख्यान । वदला दुहिण तैसेंची ॥१९॥याही रूपाचा संपूर्ण महिमा । जाणों न शकेंचि मी ब्रह्मा । तेथ निर्गुण निरुपमा । कोण गरिम्या जाणाया ॥२२०॥तृतीय श्लोकींएं विवरण । सज्जनीं वर्णितां तव गुण । तोषती स्वस्थानीं ऐकोन । ते तुजलागून जिंकिती ॥२१॥चतुर्थ श्लोकींची व्युत्पत्ति । उपेक्षूनी अभेदभक्ति । ज्ञानसाधनीं क्लेश करिती । त्यांसि अंतीं क्लेशफळ ॥२२॥पंचम श्लोकार्थ केवळ । भक्तीविण ज्ञान विफळ । सर्वार्पणें सप्रेमळ । सुखें कैवल्य पावलें ॥२३॥एवं भक्तीचें वैशिष्ट्य । विपरीत साधक पावती कष्ट । सगुणनिर्गुणरूपें स्पष्ट । जाणणें दुर्घट विधि वदला ॥२४॥हरिगुनकथाश्रवणेंचि करून । हरिपद पावती भाविक जन । वांचून सगुण कीं निर्गुण । दुर्बोध जाण सर्वांसी ॥२२५॥ऐसा बोलोनि विचार । त्यामाजि सगुणचि दुर्बोधतर । तो दो श्लोकीं निर्धार । करी अतःपर परमेष्ठी ॥२६॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP